Via Ferrata Adventure Solutions

Call Directions Website Contact the business

Via Ferrata Adventure Solutions We are a team of Adventure Enthusiasts who came together to help the fellow adventurers to explore the world without any worries.

28/10/2026

नेहमीच्या वाटांच्या पलीकडेही एक Sahyadri आहे… 🌿

Some new places, a fresh perspective on familiar destinations, and lesser-known trails — bringing together History, Nature & the joy of Exploration!

याच अनुभवांसाठी घेऊन येत आहोत एक नवी भटकंती मालिका…

⛰️ वेगळ्या वाटा — Beyond the Usual

इथे फक्त शिखर गाठायचं नाही… तर वाटेवरचा इतिहास जाणून घ्यायचा, निसर्ग अनुभवायचा आणि काहीतरी नवीन शिकून, अनुभव घेऊन परतायचं आहे!

Whether you’re an experienced trekker, planning your very first trek, or getting back to trekking after a break — there’s something for you too!

💬 Which trail or destination would you like to explore differently? Comment below and let us know!

📲 Want to join us on our upcoming explorations? Contact us on 8551999299.

ही Reel तुमच्या trekking buddies सोबत Share करा आणि अशा खास experiences साठी Prawasvede Outdoor Ventures | P.O.V ला Follow करा!

#वेगळ्यावाटा #प्रवासवेडे MaharashtraTrekking ResponsibleTravel

19/09/2026

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात एक नाव… ज्याची कथा केवळ गणपतीच्या मिरवणुकीपुरती मर्यादित नाही. 🙏

१८९२ मध्ये सुरू झालेला हा उत्सव, भाऊसाहेब रंगारींची दूरदृष्टी आणि त्या काळातील पुण्याच्या सामाजिक वातावरणाशी जोडलेली एक महत्त्वाची ऐतिहासिक कहाणी…

हा आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती — पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय.

पण या गणपतीची मूर्ती वेगळी का होती?
आणि भाऊसाहेब रंगारींच्या गणपतीला मिरवणुकीत एक विशेष भूमिका का मिळाली?

ही कथा जाणून घ्या या भागात.

📍 भाऊसाहेब रंगारी गणपती, पुणे
📜 Pune Ganeshotsav | Bhau Rangari Ganpati | Public Ganeshotsav History

17/09/2026

तुळजाभवानीच्या मंदिरावर दिसणारा शारदा गजानन… पुण्याच्या मंडईत कसा अवतरला? 🙏

१८९०च्या दशकात सुरू झालेली ही परंपरा आजही मंडईच्या गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख आहे.

शारदेसोबत विराजमान होणारा गणपती, दर तीन वर्षांनी होणारा झोपाळ्याचा सोहळा, मंडईतील हमालांचं ढोल-लेझीम पथक आणि काळानुसार बदलत गेलेली मिरवणुकीची परंपरा…

या सगळ्यामागची कथा जाणून घेऊया — Episode 5 | श्री शारदा गजानन, अखिल मंडई मंडळ.

पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासातील अशाच कथा आणि परंपरांसाठी Prawasvede सोबत राहा.

16/09/2026

योगदान तर आपण ऐकलंय… पण त्यांनी स्वतः सुरू केलेला गणेशोत्सव आजही सुरू आहे, हे माहिती होतं का?

श्री केसरीवाडा गणपती — मानाचा पाचवा गणपती. 🙏

विंचूरकर वाड्यातील Law Class पासून सुरू झालेला हा गणेशोत्सव पुढे गायकवाड वाड्यात आला… आणि हाच वाडा पुढे केसरीवाडा म्हणून ओळखला जाऊ लागला.

आजही गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत इथे परंपरा, समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वारसा जपला जातो.

आणि या गणपतीची एक खास गोष्ट म्हणजे — सहा हातांची चांदीची भरीव गणेशमूर्ती, जिचं दर्शन आता वर्षभर घेता येतं.

ही फक्त एक गणेशमूर्ती नाही…
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासाचा एक जिवंत अध्याय आहे.

ही होती आपल्या मालिकेतील मानाचा पाचवा गणपती — श्री केसरीवाडा गणपती.

आता पुढचा प्रवास पुण्याच्या अष्टविनायकांकडे…

📍 केसरीवाडा, गायकवाड वाडा, सदाशिव पेठ, पुणे

#केसरीवाडा #केसरीवाडागणपती #मानाचापाचवागणपती #पुणेगणेशोत्सव

14/09/2026

🙏 पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या गणपतीची गोष्ट!

१८८७ मध्ये एका तालमीतून सुरू झालेला उत्सव…

हिंदू-मुस्लिम वस्तादांच्या सहभागातून उभी राहिलेली परंपरा…

६००–७०० किलोची शाडू मातीची आगळीवेगळी मूर्ती…

आणि विसर्जन मिरवणुकीतला दिमाखदार रथ आणि गुलालाची उधळण!

ही आहे श्री गुरुजी तालीम मंडळाची — पुण्याच्या राजाची गोष्ट! ❤️

आपल्या Pune Ganeshotsav Series मधला तिसरा भाग आता पाहा 👇

🔗 Reel Link:
[LINK HERE]

पाहा, आवडलं तर आपल्या पुण्याच्या इतिहासात रस असलेल्या मित्र-मैत्रिणींना नक्की share करा.

पुढच्या भागात — मानाचा चौथा, श्री तुळशीबाग गणपती! 🙏

13/09/2026

आफ्रिकन हत्तीसारखं रूप, मोठे कान आणि रुबाबदार सोंड… 🐘

पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या गणपतीची — श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची ही ओळख फक्त त्याच्या देखण्या मूर्तीपुरती मर्यादित नाही.

इ.स. १५४५ मध्ये बेंद्रे कुटुंबीयांनी स्थापन केलेलं तांबडी जोगेश्वरी मंदिर, पेशव्यांशी असलेला त्याचा संबंध आणि १८९३ पासून सुरू असलेला सार्वजनिक गणेशोत्सव — या सगळ्याची सांगड या गणपतीच्या कथेत दिसते.

दरवर्षी शाडूच्या मातीपासून, कोणताही साचा न वापरता, पूर्णपणे हाताने घडवली जाणारी गणेशमूर्ती ही या उत्सवाची खास परंपरा. गंजिफा खेळातील गणेशाच्या चित्रणातून प्रेरणा घेतलेली ही मूर्ती घडवायला तब्बल तीन महिने लागतात.

आणि हो… उत्सवातील एका दिवसाचं संपूर्ण व्यवस्थापन महिला सभासद पाहतात, हीदेखील या मंडळाची सुंदर परंपरा आहे.

ही आहे Punyache Ashta Vinayak मालिकेतील तिसरी कथा.
📍 श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, पुणे

पुण्याचा इतिहास, वारसा आणि गणेशोत्सवाच्या मागच्या कथा �

12/09/2026

पुण्याच्या मानाचा पहिला गणपती — श्री कसबा गणपती. 🙏

पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा श्री कसबा गणपती हा केवळ एक गणपती नाही; तो पुण्याच्या इतिहास, श्रद्धा आणि जिवंत परंपरांचा अविभाज्य भाग आहे.

शतकांची परंपरा, मांसाहेब जिजाऊ आणि शिवबा राजांच्या काळाशी जोडलेली श्रद्धा, १८९३ पासूनचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि आजही अनेक पिढ्यांनी जपलेल्या परंपरा — या सगळ्यांनी मिळून घडतो कसबा गणपतीचा इतिहास.

मंदिरातील मूळ तांदळा स्वरूपातील गणपती, दरवर्षी तयार होणारी उत्सवमूर्ती, १९८३ पासून बंद केलेला गुलाल आणि त्याऐवजी होणारी सुगंधी अष्टगंधाची उधळण… प्रत्येक परंपरेमागे एक वेगळी गोष्ट आहे.

आणि कदाचित म्हणूनच कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजे केवळ एक मिरवणूक नाही.

ती आहे — पुण्याच्या परंपरांची चालती-बोलती साक्ष.

ही होती पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची कथा.

आता पुढची कथा —
मानाचा दुसरा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी.

📍 कसबा पेठ, पु�

पुण्याचे अष्टविनायक८ दिवस • ८ गणपती • पुण्याच्या इतिहासाच्या ८ कथागणपती आपण सगळेच पाहतो…पण या गणपतींच्या मागची गोष्ट आपल...
02/09/2026

पुण्याचे अष्टविनायक

८ दिवस • ८ गणपती • पुण्याच्या इतिहासाच्या ८ कथा

गणपती आपण सगळेच पाहतो…
पण या गणपतींच्या मागची गोष्ट आपल्याला किती माहिती आहे?

कसबा असो, तांबडी जोगेश्वरी असो,
गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा
किंवा दगडूशेठ, मंडई आणि भाऊसाहेब रंगारी…

या प्रत्येक गणपतीची एक वेगळी कथा, एक वेगळा इतिहास आणि काही रंजक गोष्टी आहेत.

म्हणूनच…

१४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर

आम्ही घेऊन येतोय —

८ दिवसांत पुण्याचे ८ गणपती!

स्थापना कधी झाली?
ही परंपरा कशी सुरू झाली?
या गणपतीला हा मान कसा मिळाला?
आणि इतिहासात दडलेली अजून कोणती रंजक माहिती आहे?

हे सगळं जाणून घेऊया
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या या छोट्याशा ऐतिहासिक प्रवासात.

Prawasvede × Warasa Punyacha

📍 फक्त Instagram वर
📅 १४ — २१ सप्टेंबर

एक गणपती. एक दिवस. एक नवी गोष्ट.

21/07/2026

🚩 Back by Popular Demand!

Our Javali Mohim received an overwhelming response, and the previous batch was completely full. ❤️

Many of you couldn’t join us then… so here it is!

🌿 Radtondi Ghat – Pratapgad
The Forgotten Gateway

Walk the historic Radtondi Ghat trail through the evergreen forests of Javali, understand the strategic importance of the region, explore Pratapgad Fort, and experience the fascinating story of the Battle of Pratapgad—right where history unfolded.

This isn’t just a trek.

It’s a journey through history, geography, nature, and storytelling.

📅 26 July 2026 (Departure on 25 July Night)

📍 Boarding:
• Mahabaleshwar – ₹1259
• Pune – ₹1659
• Mumbai – ₹2259

💬 Comment “जावळी” and we’ll send you the complete itinerary instantly.

🎟️ Limited seats available.

Every Journey is a New Story.

There is a rhythm to the Sahyadris.Sometimes the mountains welcome us.Sometimes, they ask us to wait.At प्रवासवेडे, we’v...
06/07/2026

There is a rhythm to the Sahyadris.

Sometimes the mountains welcome us.
Sometimes, they ask us to wait.

At प्रवासवेडे, we’ve never believed in chasing the monsoon—we believe in travelling with it.

That’s why our Monsoon Explorations begin from 19th July, when the journey can be safer, more enjoyable, and truly worth remembering.

This carousel isn’t just about our upcoming events.

It’s about how we think, how we plan, and why we choose patience over unnecessary risks.

Have a look through, and let us know which thought resonated with you the most.

Every Journey is a New Story.

ExploreMaharashtra EveryJourneyIsANewStory

Address

1420, First Floor, Joshi Wada, Sadashiv Peth, Pune/
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm

Telephone

+918551999299

Alerts

Be the first to know and let us send you an email when Via Ferrata Adventure Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Via Ferrata Adventure Solutions:

Shortcuts

Share

Nearby gyms & sports facilities