26/11/2025
🌟 एक अविस्मरणीय क्षण — देवाभाऊंसोबत! 🌟
आज दिनांक 23-11-2025 रोजी माननीय श्री सुधाकराजी कोहळे यांचा चिरंजीव श्री वेदांत कोहळे यांच्या लग्नसमारंभात देवाभाऊंची भेट झाली.
मी देवाभाऊंना विनंती केली होती —
“दिव्यांग क्षेत्रात मी केलेल्या कार्यावरील माझ्या लिखित पुस्तकाचे तुमच्या हस्ते लोकार्पण येथे होऊ शकते का?”
देवाभाऊंनी हसतच उत्तर दिले — “हो.”
पण आजूबाजूला अनेक मान्यवर होते…
मी दिव्यांग असल्यामुळे गर्दीत पडण्याची भीती होती…
म्हणून मी हलकेच मागे सरकलो, आणि मनात वाटलं —
कदाचित आज माझं स्वप्न पूर्ण होणार नाही…
देवाभाऊंच्या व्यस्ततेत ते पुढे निघून गेले…
आणि मीही शांत उभा राहिलो.
पण अचानक —
त्या प्रचंड गर्दीतून देवाभाऊ मोठ्याने म्हणाले — “अम्मोल कुठे आहे? अम्मोलला बोलवा!”
आणि पुढच्या क्षणी झालं —
माझ्या पुस्तकाचं लोकार्पन देवाभाऊंच्या हस्ते!
या क्षणी मी फक्त पुस्तक दिलं नाही…
तर देवाभाऊंनी माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीवर दाखवलेलं प्रेम, श्रद्धा आणि कळकळ ही आयुष्यभर जपण्यासारखी संपत्ती मिळाली.
मन अचानक भारावून गेले…
डोळ्यांत अश्रू आले…
कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आजही छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतात…
दिव्यांगांच्या भावना समजून घेतात… आणि त्यांना सन्मानाची वागणूक देतात.
आजच्या या प्रसंगातून
दिव्यांग समाजात देवाभाऊंबद्दलचा सन्मान आणि प्रेम अमाप वाढले आहे.
🙏 खूप खूप धन्यवाद देवाभाऊ…
माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीवर प्रेम आणि कृपादृष्टी दाखवल्याबद्दल.
ही आठवण माझ्या हृदयात सदैव जिवंत राहील… 💖