24/05/2022
खासदार क्रीडा महोत्सवात लक्ष्मी लाईफ ॲक्वाटिक ग्रुपच्या जलतरणपटूंची रोमहर्षक कामगिरी
डॉ आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वैशाली नगर येथील जलतरण तलावात खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत जलतरण स्पर्धेचे आयोजन दि. २१/०५/२०२२व २२/०५/२०२२ रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धेत लक्ष्मी लाईफ ॲक्वाटिक ग्रुपच्या २४ जलतरण पटींनी सहभाग घेतला होता. खासदार चषक स्पर्धांमध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपुर या सहा जिल्ह्यातील जवळपास २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली.
१७ते३५ मुले या वयोगटात साहील तराळे १००मी व २००मी ब्रेस्ट स्टोक या प्रकारात सिल्वर व ब्रांझ मेडल प्राप्त केले.सन्मय रुईकर यांनी २००मी ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले. १७ वर्षाखालील मुले वयोगटात अनघ वानखडे याने १००मी ब्रेस्ट स्ट्रोक, १००मी बटरफ्लाय व २००मी फ्रिस्टाईल या प्रकारात अनुक्रमे सिल्वर , ब्रांझ, व ब्राझ मेडल प्राप्त केले. तसेच शंतनू आंबटकर याने १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कास्य पदक प्राप्त केले.
१४ वर्षाखालील मुली मध्ये ईशा पुजारी हीने १००,२००मी ब्रेस्ट स्ट्रोक व १००मी बटरफ्लाय या प्रकारात अनुक्रमे रजत व कास्य पदके प्राप्तकेले क्रुतिका भांदककर ने २००मी फ्रीस्टाइल मध्ये कास्य पदक जिंकले. अनुष्का हेडाऊ ने २००मी ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कास्य पदक जिंकले. तसेच निर्मिती वानखडे हिने १००मी ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये कास्य पदक प्राप्त केले.
११ वर्षाखालील मुले या या वयोगटात गार्गी देवढगले हिला 100 मीटर ब्रेस्ट रोग या प्रकारात सुवर्ण पदक व 50 मीटर ब्रेस्ट व 50 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात कास्य पदक प्राप्त झाले प्राप्त केले .
नऊ वर्षाखालील मुले वयोगटात उर्विर कोरडे यांस 100 मीटर बे स्टॉक मध्ये सुवर्णपदक व 50 मीटर बेस्ट ऑफ मध्ये रजत पदक प्राप्त झाले याच गटातील मुलींमध्ये तानिया लोहबरे हिला 50 मीटर फ्री स्टाइल मध्ये सुवर्णपदक व 100 मीटर फ्री स्टाइल मध्ये रजत पदक प्राप्त केले असे एकूण २०पदके लक्ष्मी लाईव्ह एक्वेटिक ग्रुपच्या सर्व खेळाडूंनी पदके प्राप्त केली. आजपर्यंत च्या काळातील वर्धेकरिता ही उत्कृष्ट अशी कामगिरी ठरली आहे. वरील पदक प्राप्त सर्व खेळाडू हे लक्ष्मी लाइफ एक्वेटिक ग्रुपमध्ये नियमित सराव करीत असतात सर्व खेळाडूंचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शक असलेल्या रंजना वानखडे एन आय एस कोच तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.