30/08/2023
*बहुप्रतिक्षित गरवारे वाई मॅरेथॉन 26 नोव्हेंबरला, रजिस्ट्रेशनला आज पासून सुरवात*
॥ *सन्मान संविधानाचा ध्यास आरोग्याचा* ॥
ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वाई शहरात *टिम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन व मांढरदेवी अँथलेटिक्स फाउंडेशन* यांच्या संयुक्त विदयमाने गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी आयोजित केलेल्या तिन्ही वर्षीच्या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी चौथे पर्व आम्ही घेऊन येत आहोत.
*राष्ट्रीय क्रीडा दिनाचे* औचित्य साधून आज पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरूवात होत आहे.
दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी वाई हाफ मॅरेथॉनला डेक्कन एज्यु. सोसायटीच्या *द्रविड हायस्कुल वाई* येथुन सुरूवात होईल. दरम्यान महागणपती वाई , मराठी विश्वकोष कार्यालय, नाना फडणवीस वाडा व कृष्णा घाट मेणवली, धोम धरण व जलाशय, पांडवगड, कमळगड अशा ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंचे दर्शन घडवित हिरव्यागार निसर्गरम्य परीसरात सकाळच्या कोवळ्या ऊनात धावण्याचा आनंद अविस्मरणीय असेल.
विविध गटात विभागलेल्या या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न बघता उदयाच्या तंदुरूस्तीसाठी आजची सुरवात समजा.
मग वाट कसली पाहता खाली दिलेल्या लिंकवर आजच आपली नोंदणी करा आणि गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचा भाग बना.
*TEAM WAI*
👍👍👍👍👍👍👍👍
Online event Registration & ticketing page of Garware Wai Half Marathon 2023. Buy Tickets for this Wai Event organized by Team Wai Marathon.