26/09/2025
द्रोणा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राची गरूड झेप
GCM कॉन्व्हेंट स्कूल खेतला (पंजाब) येथे दिनांक 20 ते 25 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय धनुर्विध्या स्पर्धेमध्ये (CBSE) द्रोणा धनुर्विध्या प्रशिक्षण केंद्र विटा च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले
सदर स्पर्धेमधुन कु. ईश्वरी सुहास तळेकर हिने 19 वर्षा खालील इंडियन प्रकारा मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून तिची शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या (SGFI)स्पर्धे साठी निवड झाली
त्याच बरोबर विराज प्रतापराव पवार ,
साईराज विकास जाधव, आयुष संभाजी कदम यांनी 14 वर्षा खालील इंडियन प्रकारामध्ये सांघिक ब्रॉन्झ मेडल मिळवले. सर्व खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे विटा आणि आसपास च्या परिसरामध्ये द्रोणा धनुर्विध्या प्रशिक्षण केंद्राचा नावलौकिक वाढला असून येणाऱ्या भविष्य काळात द्रोणा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रामधून राष्टीय व आंतर राष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास लोकांकडून व्यक्त केला जात आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना बळवंत कॉलेज चे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवनकर सर,सांगली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रल्हाद जाधव सर, तेजस (भैया) लेंगरे व द्रोणा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे राष्ट्रीय प्रशिक्षक अरबाज इनामदार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे कॉलेज व प्रशिक्षण केंद्रा कडून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.🏹💐✌🏻