03/08/2021
Story time...
एका construction कंपनीचा मालक त्याच्या मॅनेजरला म्हणाला कि माझं नवीन घर तू तयार करावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तुला एक योजना देतो. सगळं काही त्या योजने प्रमाणेच झाले पाहिजे तर मी तुला विशेष बक्षीस देईन.
मॅनेजर ने ती योजना पाहिली आणि मनातल्या मनात म्हणाला अरे बापरे! याला तर ६ महिने लागतील , मी तर ३ महिन्यात कामावरून निवृत्त होणार आहे. पण त्या विशेष बक्षिसाच्या अपेक्षेपोटी तो ते घर बनवण्यास तयार झाला .
घर बनवण्याचे काम सुरु केले . घर बांधायला ६ महिने लागणार होते पण त्याने ते ३ महिन्यात तयार करण्याचे ठरवले.
काम लवकर संपवण्यासाठी त्याने घराचे खांब अतिशय निष्काळजी पणाने उभारण्यास सुरवात केली. प्रत्येक ठिकाणी त्याने कमी दर्जाचे सामान वापरले. मालकाला हे कळू नये म्हणून फक्त बाहेरून एकदम सुंदर दिसेल यावर महत्व दिले . कामाच्या गुणवतेवर त्याने अजिबात लक्ष दिले नाही . घर लवकर बांधून व्हावे यावरच भर दिला .
घर तयार झाले . मॅनेजरच्या कंपनीचा मालक घर बघण्यासाठी आला . घर पाहून तो फार खुश झाला. त्याला घर फार आवडले .
मॅनेजरने मनातल्या मनात म्हटले सुटलो एकदाचा .
मालक मॅनेजर कडे बघू लागले , त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले हि घे या घराची किल्ली !
हे तुझे बक्षीस आहे . तू इतके वर्षे या कंपनीसाठी काम केले .... हे घर तुझ्यासाठी कंपनीकडून .
हे ऐकल्यावर मॅनेजरला काय वाटले असावे याची तुम्ही कल्पना करा .
त्याने जे पेरले तेच उगवले .
Conclusion - जे काही कराल ते अतिशय मन लावून प्रेमाने करा. कोणालाही दुखवू नका . Set a good example .
Give your best and you will get the best ...