Eklavya Athletics Club

Eklavya Athletics Club kids fitness and Athletics training
age group 04 to 25 Year

महाराष्ट्र राज्य सब जुनियर स्पर्धेमध्ये एकलव्य  ॲथलेटिक्स क्लबचे यश 2026
10/03/2026

महाराष्ट्र राज्य सब जुनियर स्पर्धेमध्ये एकलव्य ॲथलेटिक्स क्लबचे यश 2026

एकलव्य ॲथलेटिक्स क्लब -चॅम्पियनशिप 2026द पूना डिस्ट्रिक्ट अ‍ॅमॅच्युअर अथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने दि. 30 जानेवारी व...
10/02/2026

एकलव्य ॲथलेटिक्स क्लब -
चॅम्पियनशिप 2026

द पूना डिस्ट्रिक्ट अ‍ॅमॅच्युअर अथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने दि. 30 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकलव्य ॲथलेटिक्स क्लब यांना पुणे जिल्हा चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

सलग तीन वर्षे 2024,2025,2026 चॅम्पियनशिपचा किताब एकलव्य ॲथलेटिक्स क्लबला प्राप्त होत असल्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. खेळाडूंचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, नियमित उपस्थिती तसेच वेळेचे काटेकोर पालन व शिस्तबद्ध सराव यामुळेच हे यश आज आम्हाला मिळाले आहे.

अनेक खेळाडू दररोज मैदानावर सरावासाठी येतात. *विशेष बाब म्हणजे यावर्षी दहा वर्षांखालील खेळाडूंना सणस मैदानात प्रवेश बंद करण्यात आला*.विविध स्तरांवर प्रयत्न करूनही काही कारणांमुळे लहान मुलांसाठी मैदान उपलब्ध होऊ शकले नाही. तरीसुद्धा या अडचणींवर मात करत आमच्या खेळाडूंनी पुणे जिल्ह्यात आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली.

तसेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमच्या क्लबच्या दोन खेळाडूंनी कांस्यपदक मिळवून नवे यश संपादन केले, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. 🙏💐

01/01/2026
01/01/2026

एकलव्य ॲथलेटिक्स क्लब

वर्धापन दिन व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपल्या क्लबचा ६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
या वर्षभरामध्ये अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. काहींना विजय मिळाला, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला; परंतु विजय-पराभवापेक्षा शिकणे आणि पुढे जाणे हेच खरे यश आहे.
नवीन गोष्टी सतत करत राहणे, स्वतःला सुधारत राहणे आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव सज्ज असणे, हीच आपली खरी तळमळ असली पाहिजे. आम्ही आमचे कार्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून काही चुका होत असतील, तर त्या सुधारत आम्हीही पुढे जात आहोत.
तुम्हीही आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्याच्या बळावर पुढे जात राहा. एक दिवस नक्कीच तुमचे उज्वल भविष्य तुमची वाट पाहत असेल.
या आनंदाच्या प्रसंगी सर्व खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि हितचिंतकांना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद.
🙏आपला क्लब —
एकलव्य ॲथलेटिक्स क्लब

एकलव्य ऍथलेटिक्स क्लब  खासदार क्रीडा महोत्सव 2025, खूप मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐...
15/11/2025

एकलव्य ऍथलेटिक्स क्लब खासदार क्रीडा महोत्सव 2025, खूप मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

एकलव्य अ‍ॅथलेटिक्स क्लब आमदार सौ. उमाताई खापरेयांच्या सौजन्याने  सब- ज्युनियर मैदानी स्पर्धा मध्ये घवघवीत यश संपादन झाले...
10/03/2025

एकलव्य अ‍ॅथलेटिक्स क्लब आमदार सौ. उमाताई खापरे
यांच्या सौजन्याने सब- ज्युनियर मैदानी स्पर्धा मध्ये घवघवीत यश संपादन झाले...
ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल व ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प आयोजित आमदार सौ. उमाताई खापरे ( विधानसभा परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या सौजन्याने सब- ज्युनियर मैदानी स्पर्धा दिनांक 8 व 9 मार्च रोजी निगडी येथे घेण्यात आल्या आहेत. यशस्वी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन

पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्य...
07/02/2025

पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये आपल्याला घवघवीत यश मिळाले आहे ते खालील प्रमाणे...

🥇1) कु.काव्या कोल्हाटकर- 100मी व 50मी धावणे - सुवर्णपदक

🥇 50मी धावणे - सुवर्णपदक

🥇2)कु.मानस गोतारणे- लांब उडी- सुवर्णपदक

🥇3)कु.अर्णवी पुजारी- लांब उडी- सुवर्णपदक

🥈4)कु. अरिनी यादव-50मी धावणे - रौप्यपदक

🥈5)कु. ओजस जाधव- गोळा फेक - रौप्यपदक

🥈6)कु. समर्थ कर्वे- स्टँडिंग लांब उडी - रौप्यपदक

🥉7)कु. आरव जगदाळे- 50मी धावणे - कांस्यपदक

🥉8)कु. मृगया जरांडे- 50मी धावणे - कांस्यपदक

🥉9)कु. स्वरा देशमुख- गोळा फेक - कांस्यपदक

जे खेळाडू जिंकले आहेत त्यांची राज्यस्तरीयसाठी निवड झालेली आहे.🥇🥈🥉💐

💪तसेच आपल्या क्लबचे 10 खेळाडूंना चौथ्या व पाचव्या नंबर वरती समाधान मानावे लागले. स्पर्धा म्हणली तर कोण जिंकणार कोण हरणार हे तर होणारच आहे पण आपण कसे खेळलो हे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे अजून सराव करावा लागेल व तुम्हीच विजेते होणार आहात हे निश्चित आहे.🥇🥈🥉💐

💐तसेच 12 वर्षाखालील मुले व मुलींचे -विजेतेपद🏆💪

💐तसेच 10 वर्षाखालील मुले व मुलींचे -विजेतेपद🏆💪

💐 या स्पर्धेमध्ये आपल्या क्लबला सर्वसाधारण विजेतेपद मिळालेले आहे.🏆💪💐

सहभागी खेळाडूंचे व विजयी खेळाडूंचे व पालकांचे मनःपूर्वक आभार व खूप साऱ्या शुभेच्छा💐💐

धन्यवाद
आपला क्लब
एकलव्य ॲथलेटिक्स क्लब

Address

Swargate

Telephone

+919623303244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eklavya Athletics Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category