South Solapur Apte Group Cricket Academy

South Solapur Apte Group Cricket Academy Sports

"साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब च्या वतीने, टॅलेंट हब प्रशिक्षण शिबिर...सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी सु...
23/03/2026

"साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब च्या वतीने, टॅलेंट हब प्रशिक्षण शिबिर...

सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी सुवर्णसंधी, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की सोलापूरच्या इतिहासात प्रथमच साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब च्या वतीने टॅलेंट क्रिकेटर सर्च मोहीम सुरू केली आहे या मोहिमे अंतर्गत सोलापुरातील सर्व पालकांना सुचित करण्यात येते की जर आपल्या पाल्याचे जन्मसाल २०१० ते २०१६ च्या दरम्यान असेल तर आपल्याला दिनांक ५ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान दुपारी ठीक ४ वाजता निवड चाचणीसाठी इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क स्टेडियम) येथे उपस्थित राहायचे आहे.
सदर खेळाडू हा गुणवत्तापूर्ण असल्यास त्याचा एक वर्षाचा संपूर्ण खर्च हे साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब करणार आहे. एकूण २० खेळाडूंची निवड होणार आहे.
तरी या सुवर्णसंधीचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा...

या निवड प्रक्रियेसाठी ५०० रुपये फी आकारण्यात येणार आहे.
जे २० होतकरू खेळाडू यामध्ये सिलेक्ट होतील त्यांना पूर्ण वर्षभर क्लब कडून सर्व साहित्य पुरवले जातील व कोणतीही फी आकारली जाणार नाही तसेच या सर्व खेळाडूंना रणजीपट्टू प्रवीण देशेट्टी ,बाळकृष्ण काशीद , रोहन ढेपे , यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील ज्या क्रिकेट खेळाडूंना या शिबिरामध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी प्रवीण देशट्टी 9850009431, रोहन ढेपे 8975188181, मंदार काळे 9168003345, अतुल चौधरी 6393757498 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्लबचे संस्थापक अशोक टिळक व अध्यक्ष विनय आपटे यांनी केले आहे तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा उपयोग करून घ्यावा.

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब चे खेळाडू चंदन कोतापल्ली यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती...
15/10/2025

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लब चे खेळाडू चंदन कोतापल्ली यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...🙏

#भावपूर्ण_श्रद्धांजली

 #साऊथ सोलापूर ग्रुप क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा संस्थापक आदरणीय श्री अशोक टिळक सर यांचा आज वाढदिवस आहे, १९७० पासून सोलापू...
10/08/2025

#साऊथ सोलापूर ग्रुप क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा संस्थापक आदरणीय श्री अशोक टिळक सर यांचा आज वाढदिवस आहे, १९७० पासून सोलापूर मध्ये अनेक नामवंत क्रिकेट खेळाडू घडवले, आज सुध्दा मैदानावर सर्व खेळाडू, कोच यांच्या अगोदर येतात, मार्गदर्शन करतात. सरांचे सोलापूरच्या क्रिकेट साठी खुप मोठे योगदान आहे. अशा सोलापूरच्या क्रिकेटमहर्षींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, आपटे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री विनय आपटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्...
07/08/2025

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, आपटे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री विनय आपटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

#विनयआपटे

 #साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री.अशोक टिळक सर यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा द...
10/07/2025

#साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री.अशोक टिळक सर यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यात आले...💐

 #साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबने नॅशनल T–20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात शहर पोलिस संघास पराभूत करत विजेतेपद ...
02/07/2025

#साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबने नॅशनल T–20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात शहर पोलिस संघास पराभूत करत विजेतेपद पटकावले...🏏

...

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे कोच, आमचे सहकारी मित्र श्री. Amol Angadi यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा......
31/05/2025

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे कोच, आमचे सहकारी मित्र श्री. Amol Angadi यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे खेळाडू बाळकृष्ण काशीद आणि आदर्श मनुरे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्य...
17/04/2025

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे खेळाडू बाळकृष्ण काशीद आणि आदर्श मनुरे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या #महाराष्ट्र_प्रीमियर_लीग स्पर्धेत मध्ये ाशिक_टायटन्स या टीमने ऑक्शन मध्ये आपल्या संघात सामील करून घेतले त्याबद्दल दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...💐

Rohit Rajendra Pawar Ranjitsinh Mohite Patil Dhairyasheel Mohite Patil

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरसोलापूर:- साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे प्रती वर्...
04/04/2025

साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

सोलापूर:- साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे प्रती वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर १० एप्रिल ते १० जुन असे घेण्यात येणार आहे. साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबची स्थापना १९७० रोजी करण्यात आली आहे. या क्लबला ५५ वर्षाची समृद्ध अशी परंपरा आहे. ह्या क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षण देण्यात येते तसेच शारिरीक तंदरुस्ती वर अधिक भर दिला जातो ह्या शिबिरामध्ये सात वर्षा वरील मुला मुलींना सहभाग घेता येणार आहे. फलंदाजी गोलंदाजीचा सराव एस्ट्रो टर्फ च्या सुसज्ज खेळपट्ट्यांवर स्वतंत्र नेट मध्ये घेतला जाईल. अधिकाधिक अनुभव वाढवण्यासाठी सराव सामने खेळण्यात येतील. ह्या शिबिरामध्ये महाराष्ट्र रणजी खेळाडू, विद्यापीठ खेळाडू हे प्रशिक्षण देणार आहेत. हे शिबिर सोलापूर मधिल दोन मैदानावर घेतले जाणार आहे
नंबर १- इंदिरा गांधी स्टेडियम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर
नंबर २- स्व. लिंगराज वल्याळ मैदान कर्णिक नगर, सोलापूर
वेळ सकाळी - ६:४५ ते ९:००
सायंकाळी - ३:४५ ते ६:३०
ह्या शिबिरामध्ये ज्या मुला मुलींना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी अमोल अंगडी ९७६७८८६७६८, बाळकृष्ण काशीद ८६६९०१३८९३, राहुल टिळक ९८५०२९७७०२, प्रवीण देशेट्टी ९८५०००९४३१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ह्या क्रिकेट क्लबचे संस्थापक अशोक टिळक व अध्यक्ष विनय आपटे यांनी केले आहे...

साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य श्री अशोक टिळक सर यांचा क्रिकेट मधील 55 वर्षाच्य...
28/02/2024

साउथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य श्री अशोक टिळक सर यांचा क्रिकेट मधील 55 वर्षाच्या अखंड अतुलनीय योगदानाबद्दल मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला......🙏
SMART Sports

Address

Solapur
413004

Telephone

+919730811601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when South Solapur Apte Group Cricket Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category