Manoj Chess Academy, Shirpur

Manoj Chess Academy, Shirpur Manoj Chess Academy and Shirpur Chess Club

From passion… to dedication… to global recognition! 🌍♟️Our Academy Founder, Manoj Borase Sir, has been awarded the FIDE ...
21/11/2025

From passion… to dedication… to global recognition! 🌍♟️
Our Academy Founder, Manoj Borase Sir, has been awarded the FIDE National Instructor Title today.
This is not just an achievement — it is a milestone for every student, parent, and supporter of MCA Shirpur. 🙏✨

Congratulations Sir! You make Shirpur proud. ❤️🔥

🎉 Heartiest Congratulations to Our Head Coach – Manoj Borase Sir! 🎉Manoj Borase We are thrilled to announce that our Hea...
21/10/2025

🎉 Heartiest Congratulations to Our Head Coach – Manoj Borase Sir! 🎉
Manoj Borase

We are thrilled to announce that our Head Coach, Mr. Manoj Borase, has been officially awarded the prestigious FIDE National Instructor Title 🏆 by FIDE (World Chess Federation)!

He achieved this milestone after successfully completing the FIDE Trainers’ Seminar held in Pune, Maharashtra (19–21 September 2025) — organized by AICF (All India Chess Federation) with the support of MYAS (Ministry of Youth Affairs and Sports), under the supervision of the FIDE Trainers’ Commission.

This seminar was conducted under the expert guidance of
♟ FIDE Senior Trainer – Grandmaster Abhijit Kunte Sir, and
♟ FIDE Trainer – International Master N.K. Mishra Sir.

💐 This is a moment of immense pride for the entire Manoj Chess Academy family, including our Shirpur headquarters and all branch teams!

🌟 What This Achievement Means to Us:

✅ It officially recognizes our academy’s coaching standards at an international level.
✅ It opens doors for our players and students to access world-class training methods and structured learning.
✅ It reflects the dedication, discipline, and passion that our academy stands for.
✅ It inspires our entire team to continue raising the bar in chess education and player development.

💫 Congratulations once again, Manoj Borase Sir for this remarkable achievement!
Your dedication to empowering players and promoting chess excellence continues to make us all proud. ♟❤️
Manoj Chess Academy, Shirpur team

11/07/2025

खेळातल्या चुकणाऱ्या चालींपेक्षा गोंधळलेली मनं महत्त्वाची!
बुद्धिबळ शिकवताना लक्षात आलेली मुलांची भीती, गोंधळ, पालकांच्या अपेक्षा आणि संवादाचा अभाव – हे सगळं समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.

प्रिय पालकांनो,
माझ्या अकॅडमीमध्ये आम्ही केवळ बुद्धिबळ शिकवत नाही, तर वाढत्या वयातील मुलांचा मनोवैज्ञानिक विकास हाही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मुलांना शिकवण्याच्या अनुभवातून काही गोष्टी शेअर करू इच्छितो — आमच्याकडे काही खेळाडू येतात जे अजून एकाग्रतेत, शिस्तीत किंवा संवादात स्थिर नाहीत. प्रशिक्षक म्हणून आमचं काम फक्त चाली शिकवणं नाही, तर त्या मुलांचं मानसिक व बौद्धिक बळही वाढवणं आहे — पण हे काम शंभर टक्के फक्त अकॅडमीमध्ये शक्य नाही. यासाठी घरातूनही मदतीची गरज असते. हे प्रत्यक्षात ५०/५० भागीदारीचं नातं असायला हवं. कारण रोज प्रशिक्षण देतांना जाणवतं की, शिकवणं फक्त कोचिंग क्लासपुरतं मर्यादित नसतं; ते घर, मन, आणि मुलांच्या अतिशय गुंतागुंतीच्या अनुभवांशी जोडलेलं असतं. हा लेख मी प्रशिक्षक म्हणून आलेल्या अनुभवांतून आणि पालकांशी संवादातून मांडतोय ज्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला समजून घेता येईल.

कधी एखादं मूल बिनधास्तपणे, आत्मविश्वासाने चाल खेळते तर काही मुलं अशी असतात, की त्यांना चाल खेळण्याआधीच स्वतःवरचा विश्वास ढवळून टाकणारा असतो. त्यांची चाल चुकते आणि ते थरथरतं - हातापायांनी नाही, तर मनाने....
मुलं चुकतात, विसरतात, कधी म्हणतात, "मला जमणार नाही." पण त्याच वेळी एखादा खेळाडू १० वेळा तीच चूक करूनही हसत राहतो. ह्याचं कारण केवळ बुद्धिमत्ता नसते, ह्याचं मूळ त्या मुलाच्या मानसिकतेत, त्याला मिळालेल्या वातावरणात, आणि त्याच्यावर असलेल्या अपेक्षांमध्ये असतं.
कधी कधी एखादं मूल सतत चुळबुळ करतं, चिडचिड करतं, लक्ष देत नाही, फोकस करत नाही, किंवा सर सांगत असलेलं ऐकतही नाही. आपल्याला वाटतं, "हा मुलगा शिकेल की नाही?" मी एक प्रशिक्षक म्हणून सांगतो – प्रत्येक मूल शिकू शकतं. "मुलं शिकताना अडखळतात का?" हो, आणि ते स्वाभाविक आहे! मुलं शिकताना अडखळतात कारण त्यांचा मेंदू अजून विशिष्ट पातळीवर परिपक्व झालेला नसतो. सततचा स्क्रीन टाइम त्यांचं लक्ष वेधून घेतो. घरातील तणाव, शाळेचा अभ्यास, स्पर्धेचा दबाव – हे सर्व खेळातही परिणाम करतात. त्यांना चुका करायची भीती वाटते, म्हणून ते पुढे सरसावतच नाहीत. आपण जेव्हा त्यांच्या अडखळण्याला "नालायकपणा" समजतो, तेव्हा आपण त्यांच्या स्वतःच्या मनाशी सुरू असलेल्या संघर्षाला दुर्लक्षित करतो. आज मुलांची मानसिक घडण अधिक संवेदनशील आहे.

काही मुले खूप गोंधळ करतात तर काही मुले खूपच शांत असतात. आपण अनेक वेळा म्हणतो, “माझं मूल शांत आहे” – आणि हो, संयम असणं हे नक्कीच गुण आहे. पण कायमच शांत राहणं हे लक्षण असू शकतं की त्या मुलामध्ये काही भावना दडल्या जात आहेत? असा मला कधी कधी प्रश्न पडतो कारण मुलं बोलत नाहीत, पण त्यांचं अंतर्मन बोलत असतं. खेळतांना त्यांनी केलेल्या चुका, त्या चुकांवर त्यांची प्रतिक्रिया, किंवा त्यांचा खेळातील आत्मविश्वास हे त्याचे संकेत असतात. म्हणूनच मी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघतो की मुलं बोलतायत ना!!... मला असं वाटतं की मुलांचा खेळ सुधारवणं हे तर महत्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं काय असेल तर मुलांच्या मनाचा विश्वास मिळवणं. हो की नाही? एवढं करूनही मुलांच्या अश्या वागण्यातले बदलांमागे काही वैज्ञानिक करणे देखील असू शकतील असे मला सतत वाटत राहते. जसे मेंदूच्या एका विशिष्ट भागाचा विकास अजून पूर्ण न झालेला असतो, झोप कमी असते, आहार असंतुलित असतो, सतत स्क्रीन टाईममुळे मेंदूला धीम्या शिकवणीचा कंटाळा येतो, भीती, अपयश, घरातील ताण यामुळे मूल अडथळा निर्माण करतं आणि कधी कधी त्यांना ‘चुकू नये’ याची इतकी भीती असते, की त्यातूनच लक्षच जातं. म्हणून ह्या टप्प्यात आल्यावर मला जाणवते कि आता पालकांशी संवाद करायला हवा.

बरं माझ्या अकॅडमीत येणाऱ्या पालकांशी संवाद साधतांना एक गोष्ट लक्षात येते ती ही की पालक म्हणतात, “अरे सर क्या बताएं परेशान करके रखा हैं घर पे, कही अटका रहें इसलिए चेस लगा रहें हैं” पालक म्हणून पालकांची चिंता ही रास्त असते पण मुलं अशी वागतात किंवा ते तसे असतात ह्यामागे खोल कारणं असू शकतात. सततचा मोबाईल वापर, फास्ट मनोरंजनामुळे मेंदूला धीम्या शिकवणुकीत रस वाटत नाही. (ह्याबाबतीत brain rot असा शब्द सध्या प्रचलित होत आहे)
घरातील तणाव, भांडणं ह्यामुळे त्या मुलाला/मुलीला असुरक्षित वाटतं आणि शिकणं ही त्यांच्यासाठी दुय्यम बाब बनते. मागील वयातील अनुभव – अपयश, अपमान, शारीरिक शिक्षा, भीती यांचे खोल परिणाम मुलांच्या बालमनावर होत असतात, अति अपेक्षा – “तू इतरांपेक्षा कमी का खेळतोस?” असं वारंवार ऐकल्याने मूल भीतीत वावरतं. शिकताना प्रेमाऐवजी फक्त शिस्तीचा वापर, अश्याने आत्मविश्वास हरवतो

शाळेतील वातावरणही विचारात घ्यायला हवं, स्पर्धा, टार्गेट, निकाल, तुलनात्मक अपेक्षा — हे सर्व शाळांमध्ये सर्रास चालू असतं. त्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या खेळावर आणि भावनिक संतुलनावर होतो. शाळेतील स्पर्धा, तुलना, अभ्यासाचा भार हे सुद्धा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात.
त्यावरही पालक, शिक्षक, आणि कोच मिळून चर्चा करणं आणि सोपा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. बुद्धिबळासारख्या खेळांमुळे मुलांचं मन अधिक खोल आणि स्थिर होतं. पण त्या स्थैर्याला धोका पोहोचतो जेव्हा:शाळेत सतत तुलना केली जाते, घरी सतत अपेक्षा लादल्या जातात आणि मुलांना त्यांचं मन मोकळं करण्याची संधी दिली जात नाही.
म्हणूनच या विषयावर शाळा, घर आणि कोच यांचं एकत्र काम करणं – ही काळाची गरज आहे. पालकांनी दररोज थोडा वेळ नुसता “असणं” मुलांसोबत घालवावा. कोणती चूक झाली, किती गुण मिळाले यापेक्षा – "काय वाटलं?" "काय नवीन केलं?" असा संवाद महत्त्वाचा आहे.

पालक आणि प्रशिक्षक हे मुलाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे आधारस्तंभ. या दोघांमध्ये संवाद असेल, आदर असेल आणि एकमेकांची मर्यादा समजून घेणं असेल, तर मुलं त्या आधारावर नक्कीच उभी राहतील.
“मी शिकवतो, तुम्ही पैसे देता” एवढाच संबंध असेल तर तो तोट्याचा आहे. “मी प्रशिक्षण देतो, आणि त्याला तुम्ही साथ देता” – हेच नातं मुलांचं भविष्य घडवू शकतं.

मग यासाठी पालक काय करू शकतात? घरात मुलांशी प्रेमाने संवाद करा. “सर ओरडतात का?” याऐवजी “सर काय शिकवत होते?” असं विचारा. अर्धा तास मोबाईल-फ्री वेळ ठरवा, ज्यात तुम्ही मुलासोबत शांतपणे वेळ घालवाल. अकॅडमीतील सूचनांकडे सहकार्याने बघा.
एखादा प्रशिक्षक पालकांना काही सांगतो, तेव्हा तो दोष देत नाही, तर मार्गदर्शन करत असतो.
वर्तनावर रागावण्याऐवजी विचार करा – हे असं का घडतंय? कदाचित मूल तुमचं लक्ष वेधतंय! पालकांनीही वेळ काढून मनोविज्ञान विषयक वाचन करावं, मुलांशी दररोज शांत संवाद ठेवावा. "तू खेळ जिंकलास का?" याऐवजी, "तुला काय नव्याने शिकायला मिळालं?" असं विचारावं. मुलं मोबाईलवर काय बघतात, यापेक्षा पालक काय वाचतात, काय बोलतात, आणि कसे संवाद साधतात, हे अधिक महत्त्वाचं आहे. रोजच्या धावपळीत १५ मिनिटंही तुम्ही मुलांसोबत 'मोबाईलविना' घालवलेत, तर ते त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठं बक्षीस ठरतं.

मनोज चेस अकॅडमीत आम्ही प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देतो (प्रयत्न तर तोच आहे). एकाच गोष्टीसाठी अनेक पद्धती वापरून शिकवायचा प्रयत्न असतो. समजून घेणं आणि समजावणं यामधली जागा जपतो. बुद्धिबळाचा मानसिक, भावनिक निर्णयांशी ह्याचा थेट संबध येते असल्यामुळे बाल मानसोपचार तज्ञांचं सल्लाही घेतो, जेणेकरून प्रत्येक मुलाचं वर्तन ‘का’ असं आहे, आणि त्यासाठी कोच म्हणून मी काय करू शकतो? वागण्यात, शिकवण्यात, अकॅडमीच्या एकूणच वातावरणात काय बदल करू शकतो, हे नीट समजू शकेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एक प्रशिक्षक, पालक आणि शाळा एकत्र आले, संवाद साधला, थोडा वेळ दिला — तर हे लहानसे खेळाडू पटावरच नाही तर आयुष्यातही मजबूत चाल खेळू लागतील.

आम्ही मनापासून प्रयत्न करतो, पण मी काही व्यावसायिक बालमानसशास्रज्ञ नाही म्हणून कधी कधी संवाद चुकतो (मिसकम्युनिकेशन), किंवा भावना नीट पोहोचत नाहीत (मिसअंडरस्टँडिंग) – त्यावेळी तुम्ही आम्हाला सुसंवादाने ते कळवलंत, तर आम्हालाही सुधारायला मदत होईल. बुद्धिबळात राजा एकटाच खेळत नाही, त्याचं रक्षण करणारे अनेक घटक असतात — तसंच एक मूल घडवताना, पालक, शिक्षक, प्रशिक्षक, सामाजिक वातावरण हे सर्वच घटक आवश्यक आहेत. तुम्ही आम्हाला वेळेवर काही गोष्टी सांगितल्या, किंवा आमच्या सूचना ऐकल्या, तर आम्ही अधिक नेमकं मार्गदर्शन करू शकतो.

शेवटी...
प्रत्येक मूल शिकू शकतं. पण त्याचं शिकणं हे पटावर चालणाऱ्या सोंगट्यांइतकं सोपं नसतं. ते मनाच्या खोल गुंतागुंतीतून येतं. त्या गुंत्यात प्रशिक्षक हात देतो, पण पालकांनीही मन द्यावं लागतं. शिकवणं ही टीमवर्क आहे – आणि त्या टीमचा भाग मी अभिमानाने आहे.
आपला मनोज सर,
मनोज चेस अकॅडमी, शिरपूर
मोबाईल: 098228 28143

Unlock Your Chess Potential! Discover a vibrant community at Manoj Chess Academy, Shirpur, where you can learn, grow, an...
06/07/2025

Unlock Your Chess Potential! Discover a vibrant community at Manoj Chess Academy, Shirpur, where you can learn, grow, and thrive. Make lifelong friends, elevate your chess skills, and enjoy a journey of competitive growth and fun! Whether you're just starting out or striving for championship greatness, your path to success begins here. Join us today and become part of our dynamic chess family! 🎉 🎊👏💪

"Every grandmaster was once a beginner — and these young minds are already showing incredible promise. Training this ama...
21/06/2025

"Every grandmaster was once a beginner — and these young minds are already showing incredible promise. Training this amazing beginners’ group has been nothing short of inspiring.” ♟️

🎓♟️ Group Coaching at Manoj Chess Academy, Shirpur ♟️🎓Here's a glimpse of our beginner-level batch in action! At our aca...
11/06/2025

🎓♟️ Group Coaching at Manoj Chess Academy, Shirpur ♟️🎓
Here's a glimpse of our beginner-level batch in action! At our academy, we don’t just teach chess — we live it. Every session is filled with heart, focus, and a genuine love for the game.
We believe in building strong foundations, one move at a time. 💪
Because when passion meets purpose, excellence is inevitable.

The buzz of learning and discovery at our academy! So much excitement and concentration packed into one chessboard. This...
07/06/2025

The buzz of learning and discovery at our academy! So much excitement and concentration packed into one chessboard. This is where champions are made!

MANOJ CHESS ACADEMY, SHIRPUR ♟️Building champions with expert coaching by International Coaches & FIDE Arbiters (15+ yrs...
07/06/2025

MANOJ CHESS ACADEMY, SHIRPUR
♟️Building champions with expert coaching by International Coaches & FIDE Arbiters (15+ yrs experience).
✔️ Online & In-Person Classes
✔️ Personalised Training for Every Player
✔️ 1-on-1 Coaching & GM/IM Masterclasses
✔️ Weekly Tournaments & FIDE Rated Events
✔️ Safe, Modern Facilities with CCTV
✔️ Supportive Programs for Parents
🛍️ Chess Store Onsite – Boards, Clocks, Books
🎉 Free Play Sessions Every Weekend
📍 Join our growing chess community & level up your game!

♟️ ♟️ ♟️ ♟️ Summer Camp for Chess Training Beginner & Advanced Level Date: 20th April to 20th May 2025.📍 Manoj Chess Aca...
02/04/2025

♟️ ♟️ ♟️ ♟️
Summer Camp for Chess Training
Beginner & Advanced Level
Date: 20th April to 20th May 2025.
📍 Manoj Chess Academy, Shirpur
9822828143
♟️♟️ ♟️

https://maps.app.goo.gl/83mvfR4pP3RjQbCn6

♟️ *५वी संडे रॅपिड चेस खुल्या बुद्धिबळ स्पर्धा २०२५* ♟️  *आयोजक:* मनोज चेस अकॅडमी, शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र 📅 *स्पर...
14/03/2025

♟️ *५वी संडे रॅपिड चेस खुल्या बुद्धिबळ स्पर्धा २०२५* ♟️
*आयोजक:* मनोज चेस अकॅडमी, शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र
📅 *स्पर्धा तारीख:* रविवार, २० एप्रिल २०२५
📍 *ठिकाण:* मनोज चेस अकॅडमी, शिरपूर (धुळे )
🕗 *हजेरी वेळ:* सकाळी ८:००
🕙 *पहिल्या फेरीची सुरुवात:* सकाळी १०:००
⏳ *वेळ नियंत्रण:* १० मिनिटे + प्रत्येक चालीसाठी ५ सेकंद वाढ
🔥 *राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत स्पर्धा करा आणि आकर्षक रोख पारितोषिक जिंका!* 🔥
________________________________________

💰 *एकूण पारितोषिक राशी:* ₹२०,००२
💰 *नोंदणी शुल्क:* फक्त ₹२००
🏆 *पुरस्कार:*
- *एकूण पहिल्या ३ विजेत्यांना ट्रॉफी*
- *सर्व वयोगट विजेत्यांना ट्रॉफी*
- *एकूण पहिल्या १५ विजेत्यांना पारितोषिक (₹१४,२००)*

*पारितोषिक तपशील:*
1️⃣ *प्रथम स्थान:* ₹३,१०० 🏆 आणि ट्रॉफी
2️⃣ *द्वितीय स्थान:* ₹२,५०० 🏆 आणि ट्रॉफी
3️⃣ *तृतीय स्थान:* ₹२,००० 🏆 आणि ट्रॉफी
4️⃣ *चौथे स्थान:* ₹१,५००
5️⃣ *पाचवे स्थान:* ₹१,२००
6️⃣ *सहावे स्थान:* ₹१,०००
7️⃣ *सातवे स्थान:* ₹८००
8️⃣ *आठवे स्थान:* ₹७००
9️⃣ *नववे स्थान:* ₹६००
🔟 *दहावे स्थान:* ₹५००
1️⃣1️⃣ *अकरावे स्थान:* ₹३००
1️⃣2️⃣ *बारावे स्थान:* ₹३००
1️⃣3️⃣ *तेरावे स्थान:* ₹३००
1️⃣4️⃣ *चौदावे स्थान:* ₹३००
1️⃣5️⃣ *पंधरावे स्थान:* ₹३००

________________________________________

🎖️ *वयोगट व इतर पुरस्कार (₹५,८०२):*
👦👧 *वयोगट (U9, U11, U13):* प्रत्येक वयोगटासाठी ₹१,२००
- *विजेता:* ₹५०० + 🏆 ट्रॉफी
- *उपविजेता:* ₹३०० + 🏆 ट्रॉफी

👴 *व्हेटरन्स (५०+ वर्षे):* ₹१,२००
- *विजेता:*₹७००
- *उपविजेता:* ₹५००

👩 *सर्वोत्तम महिला खेळाडू:*₹१,००२
- *विजेता:* ₹१,००२ + ट्रॉफी 🏆किंवा🥇 मेडल

⭐ *शिरपूरमधील सर्वोत्तम खेळाडू:* पदक

________________________________________

📌 *अतिरिक्त वैशिष्ट्ये:*
✅ *एकूण पहिल्या ३ विजेत्यांना ट्रॉफी*
✅ *राज्यस्तरीय खेळाडूंसोबत स्पर्धेची संधी*
✅ *मनोज चेस अकॅडमीमध्ये साप्ताहिक रोख पारितोषिक स्पर्धा*
✅ *भारतातील सर्वोत्तम चेस क्लबपैकी एक, आधुनिक सुविधांसह*

🔥 *तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि मोठे पारितोषिक जिंकण्याची ही एक उत्तम संधी आहे! गमावू नका!* 🔥

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मनोज चेस अकॅडमी, शिरपूर - 9822828143

खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही नाव नोंदणी करू शकता:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvhQS-nkZZqLmQkg5ZMnzhbtvwrfKNcTRwc6x5zwZ51yOOVA/viewform

बुद्धिबळ अकॅडमी चे गुगल मॅप लोकेशन
https://maps.app.goo.gl/gSzEe2pArYk215Ru6

Address

Plot No. 32, Chandrabhan Nagar, Shahada Road, Ankaleshwar/Burhanpur Highway, National Highway 753BE, Near Central Bank Of India, Naka, Karwand
Shirpur
425405

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Sunday 11am - 7pm

Telephone

9970915981

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Chess Academy, Shirpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share