Chatrapati Pratapsinhraje Bhonsle Cricket Trophy

Chatrapati Pratapsinhraje Bhonsle Cricket Trophy Cricket Tournament, Day-Night Tennis Ball Tournament

This is one of the most popular Tournament in Maharashtra in which more than 200 Teams are participating from all over Maharashtra. The venue of the Tournament is Shrimant Chhatrapati Shahu Stadium, Satara, between 1st to 23rd February 2023. This tournament is organized by Shrimant Chhatrapati Udayanraje Bhonsle, Mitra Mandal, Satara with the Co-operation of all Sports Lovers & Reputed Prominent Cricket Players of Satara District.

05/02/2024

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (दादा महाराज) भोंसले स्मृती चषक - २०२४आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संप...
27/01/2024

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (दादा महाराज) भोंसले स्मृती चषक - २०२४
आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा दिलेल्या लिंक वर ऑनलाईन फॉर्म भरून आपली माहिती सेंड करा. आमचे प्रतिनिधी पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला संपर्क करतील.
🔗 लिंक - https://bitly.ws/3aI6o

13/01/2024

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे (दादा महाराज) भोसले स्मृती चषक - फेब्रुवारी २०२४
पुढील माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराजयांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.मनाचा मुजरा..!श्रीमंत छत्रपती उदयन...
04/03/2023

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज
यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
मनाचा मुजरा..!
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले मित्र मंडळ, सातारा

04/03/2023
🏆स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - २०२३🏆दुर्गामाता क्रीकेट क्लब...
26/02/2023

🏆स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - २०२३🏆

दुर्गामाता क्रीकेट क्लबचा शानदार विजय.. दत्तपरिवार, वाढे संघाला उपविजेतेपद..
दिनांक 24/02/2024
सातारा येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळातर्फे आयोजीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज चषक दिवस-रात्र टेनिस चेंडू क्रीकेट स्पर्धेत दुर्गामाता क्रीकेट क्लब, वाढे, संघाने दत्त परिवार, वाढे संघावर ८ गडी राखून शानदार विजय नोंदवत रोख रुपये १ लाख रुपयांचे पारितोषिक व मानाचा स्व. दादा महाराज चषक पटकावला. दत्त परिवार, वाढे संघाला उपविजेतेपदासह रोख रुपये ८५ हजार रुपयांचे पारितोषिकावर समाधान मानावे लागले.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सुरु झालेला अंतिम सामना, दुर्गामाता क्लब, वाढे आणि दत्त परिवार वाढे या सातारा तालुक्यातील एकाच वाढे गावातील संघामध्ये झाला. दत्तपरिवार संघाने प्रथम फलंदाजी करुन १० षटकात नऊ गडयांच्या मोबदल्यात ९३ धावा केल्या. दत्त परिवाराच्या वासिम व कृष्णा या सलामीच्या जोडीला भूषण गोळेने बाद केल्यावर दत्तपरिवाराची फलंदाजी ढेपाळली. तरी सुध्दा ९.३ धावांची सरासरी गाठण्याचे उदिष्ट दुर्गामाता संघापुढे होते.
दुर्गामाता क्लबच्या जयदिप आणि सौरभ या जोडीने ६३ धावांची सलीमी देवून, आपल्या संघाचा विजय दृष्टीक्षेपात आणला. नंतर भूषण व अक्षय जोडीने राहीलेले उदिष्ट पूर्ण केले आणि स्व. दादामहाराज चषकावर आपले नांव कोरले.
कोडोलीच्या जयविजय क्रीकेट क्लब व प्रतिक आबा मोहिते मित्र समुह ब या संघात तृतीय क्रमांकाचा सामना रंगला. मोहिते मित्र समुहाने हा सामना जिंकून रोख रुपये ५० हजारांचे पारितोषिक पटकावले. तर जयविजय क्रीकेट क्लब चौथ्या स्थानावर राहीला.
अंतिम सामन्यात सुमारे १५ हजारांहून अधिक क्रीकेट रसिकांनी गर्दी केलेल्या या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मोठया उत्साहात आणि फॅन्सी फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपस्थित क्रीडा प्रेमीसमोर छोटेखानी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज यांनी शिक्षणाइतकेच विविध क्रीडा प्रकारांना नेहमीच उत्तेजन दिलेले आहे. त्यांचीच परंपरा आम्ही पुढे चालवत असून, सुमारे १७ वर्षापेक्षा जास्त काळ सातत्य राखत दरवर्षी होणारी स्व. दादामहाराज डे-नाईट क्रीकेट स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेतील विजयी संघांसह, भाग घेतलेल्या संघातील प्रत्येक खेळाडुंना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो,
नजीकच्या काळात, सातारच्या खेळाडुंनी महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि बहुचर्चित आयपीएल संघात आपले स्थान मिळवून, सातारा जिल्हयाचे नांव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले, दादामहाराज चषकाचे मुख्य संयोजक अमोल पाटुकले, जिल्हा क्रीकेट असोसिएशनचे सचिव ईर्षाद बागवान, यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला अलोट गर्दी जमली होती. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा सौ.स्मिता घोडके, माजी उपनगराध्यक्ष अँड. डी.जी. बनकर, जितेंद्रसिंह खानविलकर, काकासाहेब धुमाळ, शिरिष चिटणीस, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मयुर कांबळे, संग्राम बर्गे, प्रणव लेवे, चकोर देशमुख, योगेश पाटील, निलेश जाधव, धनंजय पाटील, आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी प्रचंड मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश साधले आणि सुत्रसंचालन शिरिष चिटणीस यांनी केले.

स्पर्धेला आपण सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादा बद्दल धन्यवाद! पारितोषिक वितरण सोहळ्याची काही क्षणचित्रे..
26/02/2023

स्पर्धेला आपण सर्वांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादा बद्दल धन्यवाद! पारितोषिक वितरण सोहळ्याची काही क्षणचित्रे..

26/02/2023

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (दादा महाराज) चषक 2023
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम निकाल
१) प्रथम क्रमांक - दुर्गा माता क्रिकेट क्लब वाढे
100001/- व चषक

२) व्दितीय क्रमांक - श्रीदत्त परिवार वाढे
75001/- व चषक

३) तृतीय क्रमांक - प्रतीक आबा मोहिते मित्र समूह - ब
50001/- व चषक

४) चतुर्थ क्रमांक - जय विजय क्रिकेट क्लब कोडोली
फक्त चषक

विजेत्या संघांचे तसेच सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.

Live action begins..
23/02/2023

Live action begins..

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे ( दादा महाराज ) भोसले स्मृती चषक - 2023 सातारा

फायनल मॅच दिनांक आज गुरुवार, २३/०२/२०२३ रात्री ९.०० वाजता सुरु होईल.त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा तसेच मा. खासदार श्रीम...
23/02/2023

फायनल मॅच दिनांक आज गुरुवार, २३/०२/२०२३ रात्री ९.०० वाजता सुरु होईल.
त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा तसेच मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सातारकर नागरीक व क्रीडाप्रेमींच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ साजरा करण्यात येईल.
तरी सर्व क्रीडाप्रेमी व सातारकरांनी सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे.
ही नम्र विनंती,
निमंत्रक
श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळ, सातारा
स्थळ - श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा

Address

Sakhargad Infra, Hotel Pride Executive, Near Bombay Restaurant Chowk
Satara
415001

Telephone

+919823377100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chatrapati Pratapsinhraje Bhonsle Cricket Trophy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chatrapati Pratapsinhraje Bhonsle Cricket Trophy:

Share

Category