02/11/2020
पिलीव पोलिस खात्याकडून राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
पिलीव येथे लाॅकडाउनच्या अगोदरच पोलिस उपनिरीक्षक पदी रूजू झालेले आदिनाथ महारनवर यांनी गावातील सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारीवर आळा बसवला .परंतु याच बरोबर त्यांनी लाॅकडाउनच्या काळात गावातील सर्व वयोगटातील लोकांना व्यायाम व खेळाकडे प्रवृत्त केले. खेळ व व्यायामाचे महत्व पटवून दिले. त्यासाठी त्यांनी स्वतः व गावातील डाॅ. दिलीप पवार, चंद्रकांत दसाडे, नेमबाजी प्रशिक्षक आकाश गुजरे यांना सोबत घेऊन सायकलिंग व हाप मॅरेथॉन यासारख्या ऑनलाईन स्पर्धांच्या माध्यमातून युवक व लहानमुलांना ट्रॅक वर आणले . त्याचबरोबर गावातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आर्यमान रायफल शूटिंग क्लब च्या वैष्णवी खटावकर ( राष्ट्रीय खेळाडू ) , वैष्णवी तांबवे , सई देशमुख ( राज्यस्तरीय खेळाडू ) चा सत्कार करून गावातील मुलींना खेळाकडे प्रोत्साहीत केले. या वेळी जिल्हाक्रिडाधिकारी मा.नितीन तारळकर,पिलीव पोलिस उपनिरीक्षक मा.आदिनाथ महारनवर,पोलिस कॉन्सटेबल कोकाटे, शिवराज पुकळे, प्रशिक्षक आकाश गुजरे, समस्त पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाक्रीडाधिकारी मा. नितीन तारळकर यांनी पोलिस खात्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पिलीव सारख्या ग्रामीण भागात आर्यमान रायफल शूटिंग क्लबच्या माध्यमातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज घडतील. या खेळाडून मधून देशाला नम्र, धाडसी, कर्तृत्वान,प्रामाणिक व खेळातील सरावा प्रमाणेच मेहनती अधिकारी मिळतील.पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महारनवर यांनी गावातील खेळाडूंना मार्गदर्शन करनार असल्याचे सांगितले. प्रशिक्षक आकाश गुजरे यांनी सर्वांचे आभार मानले.