27/04/2023
*व्यायाम आणि हार्ट अटॅक*
मैदानावर असो कि जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅकमुळे मृत्यू अशा बातम्या आपणांस अलीकडे वारंवार ऐकायला मिळते आहेत. दहा-बारा दिवसांपूर्वीच आपल्या सांगलीमध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली. साहजिकच जिममधील व्यायामावरती बोट ठेवण्यात येत आहे. आणि थोडाफार नकारात्मक सूरही उमटला. खरेतर यात आपला दोष नाही. कोणतीही घटना घडली की कोणत्यातरी जवळच्या कारणाशी ती जोडणे हे स्वाभाविक आहे, असते याबाबतही तेच होतेय. अगदी हाच नियम असेल तर आपण वाहने घेऊन रस्त्यावर व आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जायला धजावलो नसतो, कारण तिथेही धोका आहेच ना! याचाच अर्थ इतर सर्व गोष्टींप्रमाणे काही नियम सांभाळून व्यायाम हाही सुरळीत सुरु राहीला पाहिजे हे नक्की !
*आपण दैनंदिन व्यायाम करताना मग तो कोणत्याही स्वरुपाचा असो, कोणती काळजी घेतली पाहिजे*
*जेणेकरून धोका निर्माण होणार नाही हे पाहता येईल, याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे:-*
१) व्यायाम-पूर्व तपासणी (Pre-Exercise Screening) व्यायाम सुरू करण्याआधी तुमच्या शरीराची सध्याची अवस्था म्हणजेच 'हेल्थ स्टेटस' तपासून पाहणे, विशेषतः मेडिकल हिस्ट्री, तसेच पस्तिशी-चाळीशी पार केलेल्या मंडळींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. परदेशात तर तुमच्याकडून 'Physical Activity Clearance Certificate ' घेतल्याशिवाय तुम्हाला व्यायाम करू दिला जात नाही. अगदी १५ वर्षांवरील सर्वांसाठी ते बंधनकारक असते. आपल्याकडेही जिममध्ये या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. शारिरीक तपासण्यांमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईडस, सी-रिऑक्टिव्ह प्रोटीन, होमोसिस्टिन आदी गरजेच्या असतात, याबाबत डॉक्टरांचे मत घ्यायला हवे.
(2) पुढचा महत्त्वाचा भाग हा 'Exercise Programming' 'चा आहे. आपली जीवनशैली, वय, मेडिकल हिस्ट्री, वेगवेगळया सवयी उदा: धुम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल याबाबतची सर्व माहिती आपल्या ट्रेनरला असावी, तरच तो तुमच्यासाठी शास्त्रशुद्ध प्रोग्रॅम बनवू शकेल. अशी माहिती लपवल्यास कालांतराने आपणच अडचणीत येऊ शकतो.
(३) व्यायामाची तीव्रता आणि वेळ ही सावकाश वाढवणे गरजेचे असते. पूर्वी व्यायाम केलेल्या मंडळींनी तसेच कोणत्याही आजारानंतर व्यायाम सुरू करताना अगदी पुन्हा शून्यातून तो सुरू केला पाहिजे. नव्याने व्यायाम करणाऱ्यांनी सुरवातीस आठवडयातून तीन ते चार दिवस आणि रोज वीसएक मिनिटे व्यायाम करणे मुरेसे असते.
४) व्यायाम करत असताना श्वास घेणे आणि सोडणे म्हणजेच
कोणताही 'Breathing Techniques' शिकून घ्या. खास कोंडून व्यायामप्रकार करू नये. व्यायामाच्या दोन सेट्समध्ये- सुद्धा योग्य अंतर ठेवून खोलवर श्वास घेत रहावे. जेणेकरून
शरीराला जास्तीत-जोस्त ऑक्सिजन मिळत राहील. ५) व्यायामाच्या या प्रवासात आपले उद्दिष्ट निश्चित असले तरी ती गोष्ट काराम लवचिक असू द्यावी. प्रत्येक प्रवासात चढउतार हे असतातच. प्रसंगी दोन पावले मागे घ्यायची तयारीसुद्धा ठेवावी. असे पाहा, एखाद्या अॅथलिटलासुद्धा त्याच्या खेळामध्ये एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. काही दिवसात किंवा महीन्यात काहीही घडत नाही. मग घाई कशाला ? म्हणतात ना, 'अति घाई संकटात नेई।'
६) इतरांशी तुलना करू नये. अमुक करतो म्हणून मी करतो असे नको. आपल्यातील शारिरीक बदल हा आपण आतून बाहेर पहायला शिकले पाहिजे, कोणाला काहीएक राखवायला व्यायाम नको. तुमचे Visible Results-दृश्य परिणाम हे शेवटी लोकांना दिसणार आहेतच. त्यासाठी वेळ दया आणि ट्रेनरच्या सूचना पाळा.
(७) आपला अनुभव किंवा अभ्यास कितीही असला तरी कायम नवशिक्याच्या भूमिकेत राहावे आणि मगच पुढे जावे. व्यायामाच्या तंत्राचा वारंवार सराव करावा, चौकरीता आळस व कमीपणा वाटू देऊ नये, नवीन आणि अधिक तीव्रतेचे व्यायाम
करताना याचा उपयोग होईल,
८) पुष्ककदा जिममध्ये अगदी अंगतोड किंवा घामाघूम होईपर्यंत व्यायाम करण्यावर बऱ्याच जणांचा भर असतो. जास्त व्यायाम म्हणजे जास्त रिझल्टस हा गैरसमज आहे. तसे न करता शरीराको ऐकावे. एखादावेळी शरीर नेहमीसारखे परफॉर्म करत नसेल आणि थकवा वाटत असेल तर व्यायाम त्वरित थांबवावा. विनाकारण स्वत:ला पुश करू नये. अशावेळी जास्तीची विश्रांती नि झोप घेऊन शरीरावरचा व मनावरचा (Central Neevous System) थकवा, तणाव दूर करावा. विश्रांती हासुद्धा तुमच्या व्यायामाच्या प्रोग्रॅमचाच एक भाग आहे. नव्या जोमाने काम करण्यासाठी ब्रेक तर हवाच.
९) सातत्य (Consistency) ही गोष्टही फार गरजेची आहे. व्यायामातील सततची अनियमितता किंवा खंड हा अपायकारक ठरू शकतो. शक्य असल्यास आपला प्रोग्रेस तपासा, त्याची नोंद ठेवा. त्याचा उपयोग तुम्हाला पुढील प्रोग्रॅम आखताना होईल.
(१०) व्यायामशाळेत किंवा मैदानावर व्यायाम झाल्यावर फार 'वेळ रेंगाळत राहू नये. व्यायाम झाला की तडक घर गाठावे व आमला योग्य तो आहार घ्यावा, कारण व्यायामानंतर शरीर हे कमकुवत बनलेले असते. थोडक्यात काय तर संयम ठेवावा,
स्वतःवर प्रेम करावे, आपण वाटचाल करत असलेल्या या प्रवासावर व स्वतःवर विश्वास ठेवून व्यायामाचे मूलभूत नियम न मोडता हळूहळू पुढे जावे. आधी किमान आपण व्यवस्थित चालायला तुरे शिकूया नंतर पढायला आणि गगनभरारी मारायला मैदान मोकळे आहेच ना!
*लहानपणी ऐकलेल्या ससा आणि कासवाच्या शर्यतीतील आपण कासव बनूया*
*Rot- Slow and steady wing the race."*
*प्रणत वसंतराव पाटील*
सांगली.
MO : 9822903092