Dapoli Cycling Club

Dapoli Cycling Club !! दापोली सायकलिंग क्लब !! Dapoli Cycling Club… A cycling group in Konkan region. Friendly daily rides.

All are welcome. 🚴🚴
Dapoli, Ratnagiri, Maharastra, India, 415712.

‼️ दापोली सायकलिंग क्लब ‼️
सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लब बनला आहे. क्लबमार्फत विनामूल्यपणे अनेक सामाजिक उपक्रम, सायकल राईड, स्पर्धा, सायकल दुरुस्ती- खरेदी मार्गदर्शन शिबीर, दर महिन्याला सायकल फेरी आयोजित केली जाते. यामध्ये सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि इतरांनाही स

ायकल चालवण्यासाठी प्रेरीत करा.

सायकल चालवूया, प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपुया, तंदुरुस्त राहूया, मानसिक ताणतणाव घालवूया, प्रतिकारशक्ती वाढवूया आणि रोगमुक्त होऊया !😊🚴🚴

Follow us:
https://www.instagram.com/dapoli_cycling_club
https://www.strava.com/clubs/dapoli_cycling_club


दापोली समर सायक्लोथॉन 2026, सिझन 9 🚴🗓️ शनिवार-रविवार, 9-10 मे 2026📍 सोहनी विद्यामंदिर मैदान, दापोली🚴‍♂‍कोस्टल सिनिक रुट:...
01/05/2026

दापोली समर सायक्लोथॉन 2026, सिझन 9 🚴
🗓️ शनिवार-रविवार, 9-10 मे 2026
📍 सोहनी विद्यामंदिर मैदान, दापोली

🚴‍♂‍कोस्टल सिनिक रुट: 50 किमी
🌇शॉर्ट सिटी लूप: 4, 8, 12, 16, 20.. किमी
🤡फन राईड: 1, 2 किमी (विनामूल्य)

🧃राईड मार्गावर हायड्रेशन पॉईंट, स्वयंसेवक असतील. सोबत पाणी, एनर्जी ड्रिंक, केळी, रिफ्रेशमेंट्स, बॅकअप गाडी, ऍम्ब्युलन्स मेडिकल मदत 🥗🍽️🚑
🥇स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र आणि बरंच काही..

🕖 शनिवार 9 मे 2026, सकाळी 5 वाजता
🚴‍♂‍कोस्टल सिनिक रुट: 50 किमी
🛣️मार्ग: सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली- गिम्हवणे- वणंद- आसूद- सालदुरे- पाळंदे- बायपास रोड- आंजर्ले पूल- पाजपंढरी- हर्णै बंदर- दापोली

🕖 रविवार 10 मे 2026, सकाळी 6 वाजता
🌇शॉर्ट सिटी लूप: 4, 8, 12, 16, 20.. किमी
🛣️मार्ग: सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली- बुरोंडी नाका- लाल कट्टा- पांगारवाडी- नर्सरी रोड- सोहनी विद्यामंदिर (4 किमी) (5 लॅप= 20 किमी)

🤡 फन राईड विनामूल्य असेल, ती रविवार सकाळी 7:00 वाजता सुरु होईल. त्यासाठी नोंदणी, बिब नंबर, मेडल, बक्षिस नसेल.

🧩ऑनलाईन नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/R57968Ku68DacTfJ7

💰शॉर्ट सिटी लूप नोंदणी शुल्क: ₹200

🎫🎟️ नोंदणी केलेल्यांनी सायकलसाठी बिब नंबर घेण्याचे ठिकाण:
📍सोहनी विद्यामंदिर हॉल, दापोली
🗓️ शुक्रवार-शनिवार 8-9 मे 2026
🕗सायंकाळी 5:00 ते 8:00
🛑 सायक्लोथॉनच्या दिवशी कोणालाही बिब नंबर मिळणार नाहीत.

📱संपर्क नंबर:
अंबरीश गुरव: 8655874486, प्रशांत पालवणकर: 8767285827, राजेशकुमार कदम: 9028741595

🎯सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. आपणही दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया. सर्वांनी मिळून सायकल संस्कृती जपूया, वाढवूया..

-दापोली सायकलिंग क्लब

🏖️🌊🌴🌾🏞️🐬🦀🦪⚓🏝️🏆

लाडघर बीच सायकल स्पर्धा, वर्ष 59 वे 🚴दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर आयोजित लाडघर बीच सायकल स्पर्धा रविवार 7 डिसेंबर 2025 रोज...
09/12/2025

लाडघर बीच सायकल स्पर्धा, वर्ष 59 वे 🚴

दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर आयोजित लाडघर बीच सायकल स्पर्धा रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाली. हे स्पर्धेचे 59 वे वर्ष होते. सायकल शर्यतीचे अंतर 2 किमी असते, परंतु लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे हे आव्हानात्मक असते. या सायकल स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे:
🏆 प्रथम क्रमांक: प्रशांत प्रकाश पालवणकर
🏆 द्वितीय क्रमांक: केतन प्रकाश पालवणकर
🏆 तृतीय क्रमांक: अक्षय गणपती मंडपे

सहभागी स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन 💐🚴

लाडघर बीच सायकल स्पर्धा, वर्ष ५९ वे 🚴🗓️ रविवार, ७ डिसेंबर २०२५, सायंकाळी ४ वाजता   📍स्थळ: लाडघर चौपाटी, दापोली  सायंकाळी...
05/12/2025

लाडघर बीच सायकल स्पर्धा, वर्ष ५९ वे 🚴
🗓️ रविवार, ७ डिसेंबर २०२५, सायंकाळी ४ वाजता
📍स्थळ: लाडघर चौपाटी, दापोली

सायंकाळी ४ वाजता: धावणे (खुला गट), सायकल स्पर्धा (खुला गट)
सायंकाळी ५ वाजता: बैलगाडी शर्यत

🏆तीन विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक
💰यासाठी कोणतीही नोंदणी फी नसून नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

🎯दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर आयोजित या स्पर्धेचे हे ५९ वे वर्ष आहे. सायकल शर्यतीचे अंतर २ किमी आहे, परंतु लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे हे आव्हानात्मक असते.

📱अधिक माहितीसाठी संपर्क नंबर:
अभिनय कर्देकर 7767075352,
वृषाल सुर्वे 7350489287

🌊🚴🏖️🌴🦀🐡🐚🏝️🐬🚴🏆

Get ready to pedal your way on Kingfisher Scenic Route with Dapoli Winter Cyclothon 2025 Season VIII, on 26th Oct, 2025....
11/10/2025

Get ready to pedal your way on Kingfisher Scenic Route with Dapoli Winter Cyclothon 2025 Season VIII, on 26th Oct, 2025. 🚴🚴‍♀‍

🌿A golden opportunity to explore Pristine Beaches, Quiet Backwaters, Fascinating Wildlife, Historical Monuments, Kokani Culture and much more.. 🌊🌎

🌊दिवाळीच्या सुट्टीत कोकणातील हिरवळ, गुलाबी थंडी अनुभवत, समुद्रकिनाऱ्यावरील मार्गावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत मनसोक्त सायकल चालवण्याची संधी..🚴🚴‍♀

🚴Registration Link:
https://www.townscript.com/e/dwc8

दापोली सायकलिंग क्लब 🚴‍♂


🏖🌊🌴🌾🏞🐬🦀🦪⚓🏝

18/04/2025
सायकल वाटप उपक्रम 🚴🔥दापोली तालुक्यातील श्रीमान मथुराभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे दापोलीचे आमदार आ...
29/03/2025

सायकल वाटप उपक्रम 🚴🔥

दापोली तालुक्यातील श्रीमान मथुराभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सहकार्याने व उद्योजक श्री शैलेश कदम यांच्या माध्यमातून ५० सायकलचे वाटप करण्यात आले. या शाळेतील अनेक मुलींना शिक्षणासाठी तब्बल ५-७ किमीचा प्रवास करावा लागतो. शिक्षणाच्या प्रवासात त्यांना यामुळे नक्कीच मोठा आधार मिळेल.

Address

Dapoli
Ratnagiri
415712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dapoli Cycling Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dapoli Cycling Club:

Share