माझा क्रिकेट कट्टा

  • Home
  • India
  • Pune
  • माझा क्रिकेट कट्टा

माझा क्रिकेट कट्टा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझा क्रिकेट कट्टा, Sports, Pune.

"माझा क्रिकेट कट्टा" च्या माध्यमातून मराठी क्रिकेट रसिकांसाठी खास क्रिकेटविषयी च्या पोस्ट केल्या जातात. या पेज च्या माध्यमातून क्रिकेट विषयी च्या नवीन पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे👍जय महाराष्ट्र🇮🇳💪🏏

चक दे इंडिया! 🇮🇳🏆भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करून विजयश्री खेचून आण...
29/09/2025

चक दे इंडिया! 🇮🇳🏆

भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करून विजयश्री खेचून आणली आहे.
सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानची चांगलीच धूळ चारली.

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉👏

🏏 भारत – पाकिस्तान आज अंतिम सामन्यात भिडणार! 🇮🇳🇵🇰आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमन...
28/09/2025

🏏 भारत – पाकिस्तान आज अंतिम सामन्यात भिडणार! 🇮🇳🇵🇰

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला असला, तरी आजच्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

👉 तुम्हाला काय वाटतं, आज कोणता संघ विजयी ठरेल?

पाकड्यांचा आगाऊपणा"कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच" अशी एक म्हण आहे.आशिया कप स्पर्धेतील सुपर फोर मधील पहिला सामना टीम इ...
22/09/2025

पाकड्यांचा आगाऊपणा

"कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच" अशी एक म्हण आहे.
आशिया कप स्पर्धेतील सुपर फोर मधील पहिला सामना टीम इंडियाने जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.

आधीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, या मुद्द्याला चांगलाच गवगवा मिळाल्यानंतर पाकिस्तानने आपली रडारड सुरू केली होती.
दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानच्या खेळाडूंनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकचा सलामीवीर खेळाडू साहिबजादा फरहान याने 'गन सेलिब्रेशन' करून पुन्हा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला.

पण शेवटी भारतीय संघाने खेळावर लक्ष केंद्रित करत दमदार विजय मिळवला.

चक दे इंडिया🇮🇳

एशिया कपमध्ये विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे.या साम...
15/09/2025

एशिया कपमध्ये विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे.
या सामन्यापूर्वीच अनेक क्रिकेट रसिकांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला होता.

🤔 आता प्रश्न असा निर्माण होतो की,
👉 टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न करणं योग्य होतं का?
👉 की खेळ ही एक भावना असून खेळाडूंनी खेळाडूपण जपायला हवं होतं?

तुमचं मत काय आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आज रात्री ८ पासून रंगणार आहे.🇮🇳🇦🇮🇵🇰सांगा बर कोण जिंकेल?💪
14/09/2025

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आज रात्री ८ पासून रंगणार आहे.🇮🇳🇦🇮🇵🇰

सांगा बर कोण जिंकेल?💪

🇮🇳🏏 भारत विरुद्ध पाकिस्तान💥आशिया चषकातील दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगणार आहे.पेहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही दे...
13/09/2025

🇮🇳🏏 भारत विरुद्ध पाकिस्तान💥

आशिया चषकातील दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगणार आहे.
पेहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले असले तरी मैदानावर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ मैदानावर भिडणार आहेत.💪

👉 अनेक माजी क्रिकेट खेळाडूंनी या सामन्याला विरोध केला असून अनेकजण बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

👉 भारताची भिडंत पाकिस्तानशी होणार असून, प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीला या सामन्याची आतुरता आहे.

💬 तुमच्या मते हा सामना खेळला जावा का नाही?
कमेंटमध्ये आपलं मत नक्की कळवा!

इंग्लंडचा आफ्रिकेला तडाखा आणि  ऐतिहासिक विजय💥🏏🇬🇧इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेतील दुसऱ...
13/09/2025

इंग्लंडचा आफ्रिकेला तडाखा आणि ऐतिहासिक विजय💥🏏🇬🇧

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने प्रथमतः फलंदाजी करताना ३०० धावांचा टप्पा पार करत तब्बल १४६ धावांनी मोठा विजय मिळवला आहे.

सलामीवीर फिल सॉल्टने धडाकेबाज खेळ करत तब्बल १४६ धावा ठोकल्या व इंग्लंड संघाला टी२० क्रिकेटमध्ये प्रथमच तिहेरी धावसंख्या गाठून दिली आहे.


🌟 टिम इंडियाची विजयी सलामी 🌟दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत 🇮🇳पहिल्याच सामन्यात UAE संघाचा पराभव करून टिम इंडियान...
10/09/2025

🌟 टिम इंडियाची विजयी सलामी 🌟

दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत 🇮🇳
पहिल्याच सामन्यात UAE संघाचा पराभव करून टिम इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. 👏🔥

🎯 कुलदीप यादवच्या फिरकी जादूने UAE फलंदाजांना चांगलंच गुंतवलं, तर
💥 अभिषेक शर्माच्या फटकेबाजीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. 🙌

आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत टिम इंडियाच्या पुढील सामन्याकडे, जो होणार आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध. 🇮🇳 vs 🇵🇰
तो सामना पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत आहेत! 🏏🔥

👉 तुम्हाला काय वाटतं, भारत vs पाकिस्तान चा सामना कोण जिंकेल? 💭

🏏🇮🇳 टीम इंडिया ची नवी सुरुवात! 🇮🇳🏏आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना आज UAE विरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडमधील दमदार कामगिरीनं...
10/09/2025

🏏🇮🇳 टीम इंडिया ची नवी सुरुवात! 🇮🇳🏏

आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना आज UAE विरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडमधील दमदार कामगिरीनंतर आता टीम इंडिया नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

T20 प्रकारातील हा सामना रंगतदार ठरणार असून भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत.

✨सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार असून संघाची कामगिरी कशी होते हे पाहायला क्रिकेट रसिक उत्सुक असतील.

सांगा बर आज कोण जिंकेल💪

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा आज वाढदिवस 🎂🎉शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने नुकताच इंग्लंडमध्ये क...
08/09/2025

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा आज वाढदिवस 🎂🎉

शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने नुकताच इंग्लंडमध्ये कसोटी सामने जिंकून मोठा पराक्रम केला आहे 🏆🇮🇳

आपण सगळ्यांनी मिळून शुभमनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत 🎊💐

👉 “हॅपी बर्थडे कॅप्टन शुभमन गिल” 🎂🎂

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा क्रिकेट कट्टा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category