24/07/2026
पुणे 10K ग्रँड रन
एक शहर - एक रन आणि अविस्मरणीय अनुभव
भुरभुरत्या पावसात आणि पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात धावणे, हा वेगळाच आनंद असतो. जेव्हा विविध वयोगटातील हजारो धावपटू एकत्र धावतात, तेव्हा हा आनंद द्विगुणित होतो. हा अनोखा आनंद अनुभविण्याची संधी पुणेकरांना ‘पुणे 10K ग्रँड रन’मध्ये मिळणार आहे. हा ‘रन’ एकाच कॅटेगरीमध्ये म्हणजे फक्त १० किलोमीटर अंतरातच होणार आहे.
या रनमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही कसलेले धावपटू असले पाहिजे, असे काही बंधन नाही. तुमच्यात फक्त उत्साह पाहिजे. वय काहीही असो, हजारो पावलांबरोबर जेव्हा तुमचे पाऊल पडते तेव्हा तुम्ही १० किलोमीटरचे अंतर कधी पूर्ण कराल, हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही. या रनमध्ये प्रख्यात धावपटूंबरोबरच विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी फिटनेसप्रेमी सगळेच सहभागी होणार आहेत. स्टार्ट लाईनवरून सगळेच सारखे अंतर धावतील आणि फिनिश लाईनवर पोचतील.
या रनचे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यभागातून सुरू होणारी ही शर्यत बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज आदी प्रख्यात रस्त्यांवरून जाणार आहे. म्हणजेच जुन्या पुण्याबरोबरच बदलत्या पुण्यातूनही धावण्याची संधी या रनमध्ये आहे. शिवाय धावपटूंचे शारिरीक बल वाढविण्यासाठी जागोजागी पाणी, संत्री, खजूर, एनर्जी ड्रिंक आदी खुराक असलेले स्टॉल्सही असतील. त्यामुळे तुम्ही मित्र-मैत्रिणींसह, कुटुंबासह या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा आणि अविस्मरणीय अनुभव घ्या !
(महत्त्वाचे ः नोंदणी करणाऱ्या सर्व धावपटूंना अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रशिक्षण मिळणार आहे)
- मॅरेथॉनमध्ये नोंदणीसाठी - www.bluebrigade.club या वेबसाईटवर क्लिक करा
- प्रशिक्षण आणि अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६६३ ५३३३७