Amol Buchade Sport Foundation

Amol Buchade Sport Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Buchade Sport Foundation, Sports, Pune.

खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी वचनबद्ध – नवनिर्वाचित क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांची ग्वाही.आपल्या देशात क्...
04/09/2017

खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी वचनबद्ध – नवनिर्वाचित क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांची ग्वाही.
आपल्या देशात क्रीडा क्षेत्रासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. हे लक्षात घेता भारत हा क्रीडासत्ता बनवण्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे नवे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी अ‍ॅथेन्स येथे २००४मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक मिळवले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात विजय गोयल यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक खाते राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे.
Committed To Give Players Best Facilities Says Rajyavardhan Singh Rathore.

तयार आहे महाराष्ट्र आता ऑलिम्पिकमध्ये वाजवायला कुस्तीचा डंका. रंगणार कुस्तीचा नवा फड. 6 संघात विभागलेत महाराष्ट्रातील 35...
02/09/2017

तयार आहे महाराष्ट्र आता ऑलिम्पिकमध्ये वाजवायला कुस्तीचा डंका. रंगणार कुस्तीचा नवा फड. 6 संघात विभागलेत महाराष्ट्रातील 35 जिल्हे. कोण करणार चित आणि कोण होणार पट. तीच माती अन तिच हवा, आता असेल फक्त जोश नवा. लाल मातीतल्या कुस्तीला सुवर्ण झळाळी देण्यासाठी पुष्कर केळकर, स्वप्नील सबनीस, ललित लांडगे आणि शेखर शिंदे घेऊन येतायेत MWCL अर्थात महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीग 2017.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
http://www.mwcl.co.in

MWCL is trying and getting that talent into main stream. Making them live like a sportsman.

नाबाद" धोनी...आपल्या कारकिर्दीचा ३०० वा वन-डे सामना खेळत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आज आणखी एका विक्रमाची नोंद...
31/08/2017

नाबाद" धोनी...
आपल्या कारकिर्दीचा ३०० वा वन-डे सामना खेळत असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आज आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. वन-डे सामन्यात सर्वाधीक नाबाद राहण्याचा विक्रम धोनीच्या नावे झाला आहे. धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि श्रीलंकेच्या चमिंडा वास या खेळाडूंना मागे टाकलं आहे. ३०० वा वन-डे सामना खेळणारा महेंद्रसिंह धोनी हा सहावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे.
India Tour Of Sri Lanka 2017 Ms Dhoni Bags Record Of Most Number Of Unbeaten Batsman In Odi Cricket.

‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार रोहन मोरेला प्रदानदेशातील साहसी खेळासाठी दिला जाणारा ‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय ज...
31/08/2017

‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार रोहन मोरेला प्रदान
देशातील साहसी खेळासाठी दिला जाणारा ‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे याला मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देशातील सागरी जलतरण, गिर्यारोहण आणि हवाई साहसी खेळ यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्यास दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वेळी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या ३१ वर्षीय रोहनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, प्रतिमा आणि ब्लेजर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रोशनने १९९६मध्ये म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किलोमीटर (सागरी) अंतर पार केले होते. त्यानंतर त्याने इंग्लिश खाडी, अमेरिकेतील कॅटलिना खाडी, मोलिकोई खाडी, न्यूयॉर्कमधील मॅनहंटन बेटाजवळील ४५ किलोमीटरची खाडी, आयर्लंड-स्कॉटलंडमधील आयरीश खाडी, जपानमधील त्सगरू खाडी आणि स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर खाडी यशस्वीरित्या पार केली आहे.

गुणवंतांचा गुणगौरव...मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमीत्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमीत्ताने रा...
30/08/2017

गुणवंतांचा गुणगौरव...
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमीत्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमीत्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील निवडक खेळाडूंचा सत्कार केला आहे. हॉकीपटू सरदार सिंह आणि पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झाजरियाचा मानाच्या खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आज हा सोहळा पार पडला. याव्यतिरीक्त १७ क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पीकपटू मरिअप्पन थंगवेलू, वरुण भाटी, एसएसपी. चौरसिया, साकेथ मायनेई, खुशबीर कौर, आरोक्य राजीव, प्रशांती सिंह, एसव्ही सुनील, सत्यव्रत कादियान, अँथोनी अमालराज, पीएन प्रकाश, ज्योती सुरेखा वेन्नम, जसवीर सिंह, देवेंद्रो सिंह, बेंमबेम देवी या क्रिडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. याव्यतिरीक्त विविध क्रिडाप्रकारांमध्ये प्रशिक्षणाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. याव्यतिरीक्त निता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात आलं.
Hockey Star Sardar Singh Para Olympic Star Devendra Jhajariya Received Khelratna Award From President Ramnath Kovind.

हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच.पराजयाच्या वाटेवर अस...
29/08/2017

हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते. त्यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच.
पराजयाच्या वाटेवर असणार्‍या ०-२ अशा संघातर्फे खेळत ४ गोल करत संघाला जिंकवणा-या ध्यानचंदला १६ व्या वर्षीच सैन्यात शिपाई म्हणून भरती होण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या ४ मिनिटात ३ गोल करत ०-२ च्या पिचाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. १९२६ च्या नुझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचा हिरो होता ध्यानचंद. १९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकल. हिटरने त्यांच्या सैन्यात वरच्या हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी स्वाभिमानाने आणि देशप्रेमामुळे नाकारली. ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा भारतात खेल दिन ( National Sport Day ) म्हणून साजरा होतो.

आनंदाच "नवक्षितिज"...आज मारूंजी येथील मतिमंद व्यक्तिंसाठी कार्यरत असणार्‍या "नवक्षितिज" या संस्थेच्या बाप्पाची आरती करण्...
28/08/2017

आनंदाच "नवक्षितिज"...
आज मारूंजी येथील मतिमंद व्यक्तिंसाठी कार्यरत असणार्‍या "नवक्षितिज" या संस्थेच्या बाप्पाची आरती करण्याची संधी मिळाली. या विशेष प्राविण्य असणार्‍या मित्रांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो. या भेटीत संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांबरोबर चर्चा करून संस्थेबद्दल माहिती घेतली. संस्थेच हे समाजोपयोगी कार्य खरचं वाखण्याजोग आहे. संस्थेबद्दल अधिक माहिती www.navksh*tij.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सुवर्ण स्वप्न भंग" पण सायनाची कांस्य तर सिंधूची रौप्य पदकाची कमाई...स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक...
28/08/2017

सुवर्ण स्वप्न भंग" पण सायनाची कांस्य तर सिंधूची रौप्य पदकाची कमाई...
स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव केला. काल सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. रियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या जपानच्या नोझोमी ओकुहाराने सायनाचा १२-२१, २१-१७, २१-१० असा पराभव केला.
World Badminton Championship 2017 Glasgow P V Sindhu Lost The Final Game From Japans Nozomi Okuhara Will Get Silver Medal.

संजीवनीची "रौप्य" कमाई...भारताची उदयोन्मुख अ‍ॅथलेटिक्सपटू संजीवनी जाधवने २९व्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील महिला...
25/08/2017

संजीवनीची "रौप्य" कमाई...
भारताची उदयोन्मुख अ‍ॅथलेटिक्सपटू संजीवनी जाधवने २९व्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली आहे.
नाशिकची २० वर्षीय धावपटू संजीवनीने भुवनेश्वरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. जागतिक शालेय ऑलिम्पियाड स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या संजीवनीच्या कारकीर्दीतील हे दुसरे महत्त्वाचे पदक आहे.
Sanjivani Jadhav Indias Silver Lining In Taipei Games.

अभिमन्यूने भेदला 64 घरांचा चक्रव्यूह...अभिमन्यू पुराणिकने अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर कित...
23/08/2017

अभिमन्यूने भेदला 64 घरांचा चक्रव्यूह...
अभिमन्यू पुराणिकने अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर किताबावर मोहोर उमटवली. हा किताब मिळवणारा तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण खेळाडू आहे. अभिमन्यूने या स्पर्धेतील नवव्या फेरीनंतर साडेपाच गुणांची कमाई करीत ग्रँडमास्टर किताब निश्चित केला. त्याने नऊ फे ऱ्यांमध्ये प्रत्युषा बोड्डा, गुओ झिआओबिंग, इंडेजिक अ‍ॅलेक्झांडर यांच्यावर मात केली तर लुपुलेस्कू, अन्तोन कोरोबोव्ह, विरिदोव व्हॅलेरी, इदानी पौउया, लुका पाईचादेझ या ग्रँडमास्टर खेळाडूंविरुद्ध बरोबरी केली. त्याला मिर्का पार्लिग्रासविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. नवव्या फेरीत त्याने हा डाव गमावला तरीही त्याचे ग्रँडमास्टर निश्चित झाले. अभिमन्यूचे १७ वर्षे ६ महिने वय असून यापूर्वी नाशिकच्या विदित गुजराथीने १८व्या वर्षी हा किताब मिळवला होता. ग्रँडमास्टर किताब मिळविणारा अभिमन्यू हा महाराष्ट्राचा सातवा व पुण्याचा तिसरा खेळाडू आहे.


जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपट्टूचा पहिला दिवस निराशजनक...        पॅरिस येथे अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली...
21/08/2017

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपट्टूचा पहिला दिवस निराशजनक...
पॅरिस येथे अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या योगेश, गुरप्रीत सिंह, रविंदर खत्री आणि हरदीप या चारही मल्लांना ग्रेको-रोमन प्रकारात पराभूत व्हावं लागलं. ७१ किलो वजनी गटात योगेशला जपानच्या तकाशी इझुमीने ३-१ अशी मात दिली. तर ७५ किलो वजनी गटात गुरप्रीत सिंहला जॉर्जियाच्या मिंडीया तुसलुकित्झ ने ५-१ असं हरवलं. याव्यतिरीक्त ८५ किलो वजनी गटातही भारताच्या रविंदर खत्रीला हंगेरीच्या व्हिक्टोर लोरिनीकाने ८-० असं पराजित केलं. हा सामना इतका एकतर्फी झाला की व्हिक्टोरच्या खेळापुढे रविंदर खत्रीचा निभावच लागला नाही. तर हरदीपला लिथुनियाच्या विलीयस लाओरीनैतीसकडून ५-२ अशी हार पत्करावी लागली.
पहिल्याच दिवशी भारताच्या चारही कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भारतीयांच्या पदकाच्या आशा अजून संपलेल्या नाहीयेत. भारतीयांना हरवणाऱ्या मल्लांपैकी एकही मल्ल जर अंतिम फेरीत पोहचला तर त्याच्या प्रतिस्पर्धी भारतीय मल्लाला रेपीचाज प्रकारात कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळणार आहे.

आजपासून रंगणार जागतिक कुस्ती स्पर्धेचा थरार...साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या कामगिरीवर भारतीयांच्या आशा.          ...
21/08/2017

आजपासून रंगणार जागतिक कुस्ती स्पर्धेचा थरार...
साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या कामगिरीवर भारतीयांच्या आशा.


Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Buchade Sport Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category