KLVSP Boxing Club Pune

KLVSP Boxing Club Pune Here we create and nurture athletes which will bring glory to Pune,Maharashtra and India in field of Also we have an experinced Chief Coach Shri.Vijay Gujar.

Our Boxing Club was founded in 1991, at Gen.ArunKumar Vaidya Stadium Bhawani Peth Pune by Hon.MLA.Rameshdada Bagwe. Due to his Continous efforts and hardwork of our boxer KLVSP BOXING CLUB has created many boxers who have represented Maharashtra and India. Currently our Boxing Club is presided by Shri.Avinash Bagwe. Also we are the only club in INDIA who own a stadium of ourself which includes ind

oor boxing competition arena having capacity of 500spectators. Also we have a well equipped audio visual library, gymnasium and up to date training facility.

 #राष्ट्रीय_क्रीडा_दिवस_२९_ऑगस्ट_२०२६ #हॉकीचे_महान_खेळाडू_भारताचे_क्रीडा_प्रेरणास्थान  #मेजर_ध्यानचंद_यांच्या_जयंतीनिमित...
29/08/2026

#राष्ट्रीय_क्रीडा_दिवस_२९_ऑगस्ट_२०२६
#हॉकीचे_महान_खेळाडू_भारताचे_क्रीडा_प्रेरणास्थान #मेजर_ध्यानचंद_यांच्या_जयंतीनिमित्त_त्यांना_
#विनम्र_अभिवादन!

रिंगमध्ये उतरणारा बॉक्सर केवळ प्रतिस्पर्ध्याशी लढत नसतो, तो स्वतःच्या मर्यादांशीही दोन हात करत असतो. प्रत्येक ‘पंच’मागे असते मेहनत, प्रत्येक हालचालीमागे असते तांत्रिक तयारी आणि प्रत्येक विजयामागे असतो प्रशिक्षक, पालक व संपूर्ण क्रीडा व्यवस्थेचा हात.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कर्तृत्वातून भारतीय क्रीडा क्षेत्राला जगभरात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांची जिद्द, शिस्त, समर्पण आणि देशासाठी खेळण्याची भावना आजही प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पुणे शहरानेही अनेक वर्षांच्या क्रीडा परंपरेतून गुणवंत खेळाडू घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे.

पुणे शहराने गेल्या अनेक वर्षांत अशाच जिद्दी बॉक्सरना घडवत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बॉक्सिंग नकाशावर आपले नाव ठळकपणे उमटवले आहे. पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या २४ वर्षांच्या वाटचालीत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले हजारो खेळाडू ही या समृद्ध परंपरेची मोठी साक्ष आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिवस हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नसून, खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा, पालकांचा, क्रीडा संघटनांचा आणि खेळासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे.

या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त पुणे शहरातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पालक, क्रीडा संघटना आणि क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा!

“खेळा, जिंका आणि देशाचा गौरव वाढवा!”
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

श्री. अविनाश रमेशदादा बागवे
अध्यक्ष, पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन
उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन

विजय गुजर
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक
सेक्रेटरी, पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन

21/08/2026

🥊🇮🇳 विशेष सन्मान व अभिमानाचा क्षण! 🇮🇳🥊

😊🏆 पुणे शहरातील नामांकित बॉक्सर तसेच क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित श्री. रेनॉल्ड राफेल जोसेफ यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष सन्मान प्राप्त झाला. 🇮🇳✨

😊🎖️ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी श्री. रेनॉल्ड जोसेफ यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्यात आली होती. 🇮🇳

😊🇮🇳 या मानाच्या प्रसंगी श्री. रेनॉल्ड जोसेफ यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. हा क्षण त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आणि योगदानाचा गौरव करणारा ठरला. 🫡🏆

😊🥊 त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची आणि योगदानाची दखल घेत जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्यांना हा बहुमान दिला, ही संपूर्ण पुणे शहर बॉक्सिंग परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. ❤️🇮🇳

👏😊 हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🥊🏆🇮🇳

05/08/2026
27/07/2026

🇮🇳 lndia dominates in the Ring 🥊

Indian continued its impressive run in boxing at Commonwealth Games Glasgow 2026 as jadumani delivered a dominates performance
against pakistan.

पुणे महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा – 2026 यशस्वीरीत्या संपन्न..!!पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “पुणे महापौर चषक बॉक्स...
16/03/2026

पुणे महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा – 2026 यशस्वीरीत्या संपन्न..!!

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “पुणे महापौर चषक बॉक्सिंग स्पर्धा – 2026” ही स्पर्धा दि. 12 ते 15 मार्च 2026 या कालावधीत जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पुणे शहर ॲमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन यांच्याकडे सोपविण्यात आली होती, व पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक नगरसेविका सौ. अर्चनाताई पाटील यांची स्पर्धेच्या समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अत्यंत कमी कालावधीत उत्कृष्ट नियोजन करून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेमध्ये सुमारे 350 मुला-मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेसाठी खेळाडूंचे वजन मोजणी, वैद्यकीय तपासणी व ड्रॉ (भाग्यपत्रिका) दि. 12 मार्च 2026 रोजी घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता स्थानिक नगरसेविका सौ. अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहर ॲमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्री. अविनाश बागवे, तसेच श्री. तुषार पाटील आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री. भरतकुमार व्हावळ, महाराष्ट्र शासनाचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्टीय बॉक्सर श्री. सलमान शेख, मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी दयानंद अडागळे, सुनील जी बावकर, आदित्य जी गायकवाड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे श्री. राहुल जी चिंधम, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हुसेनभाई शेख, व ईतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता पार पडला. या कार्यक्रमात पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अविनाश बागवे तसेच श्री. तुषार पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री. भरतकुमार व्हावळ, शिवम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश रेणुसे, तसेच पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. अशोक मेमजादे, श्री. सुरेश कुमार गायकवाड आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव श्री. अभिमन्यू सूर्यवंशी व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. कृष्णदेव क्षीरसागर , पुणे शहर संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर हे मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी व रिंग ऑफिशियल म्हणून प्रदीप वाघे, कुणाल पालकर, मनोज यादव, मंगेश यादव, आसिफ शेख आणि विनोद कुंजीर, राकेश भानू, योगेश भोरे, अमोल शर्मा, यांनी उत्कृष्टरीत्या काम पाहिले.

या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान यांनी 32 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुळशी तालुका संघाने 24 गुणांसह उपविजेतेपद मिळविले.

तसेच मुलींच्या गटात पुरंदर तालुका संघाने 36 गुणांसह सांघिक विजेतेपद मिळविले, तर क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांनी 27 गुणांसह उपविजेतेपद मिळविले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट: मुले

▪️बेस्ट बॉक्सर: बोर्डन डाइमर (एस.एस.पी.एम एस)
▪️मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर: आयुष दातार (महाराणा वॉरियर)
▪️बेस्ट चॅलेंजर: अरिंजय वाघे (KLVSP)
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट: मुली
▪️बेस्ट बॉक्सर: समीक्षा महाडिक (पुरंदर तालुका)
▪️मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर: आरोही तानपुरे (आदिनाथ अकॅडमी )
▪️बेस्ट चॅलेंजर: प्रणाली लोखंडे (एक्स सर्विसेस)
▪️ बेस्ट रेफरी: सनी परदेशी (पुणे शहर)
▪️ बेस्ट जज: रवी गायकवाड (मुळशी)

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मा. रमेशदादा बागवे
मा. गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र - राज्य
──────✧❁✧──────
अविनाश रमेशदादा बागवे
नगरसेवक, पुणे मनपा
कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य
──────✧❁✧──────
सौ. इंदिरा अविनाश बागवे
अध्यक्ष, मुक्ता फाउंडेशन

नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या९व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजि...
28/12/2025

नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या
९व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड जाहीर झाली असून,
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानचे खेळाडू
४८–५१ किलो वजन गटात: कु. हर्षदा लोहाट
७५–८० किलो वजन गटात: कु. सई डावखर
या दोन्ही खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान तर्फे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, हीच सदिच्छा.

#शुभेच्छुक
श्री. अविनाश रमेशदादा बागवे
अध्यक्ष,क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान
प्रशिक्षक
विजय गुजर, राम जगताप, विशाल गव्हाणे

20/11/2025

Address

Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when KLVSP Boxing Club Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KLVSP Boxing Club Pune:

Shortcuts

Share

Category