16/07/2026
Heartiest congratulations to Neel Warke and Rudra Karandikar from Pune, and Shlok Dudulkar from Nagpur on being selected to represent India at the prestigious World Youth Climbing Championships 2026 to be held in Italy.
Through years of dedication, perseverance, and outstanding performances in mountaineering and sport climbing from a young age, these three talented athletes from Maharashtra have earned the honour of representing India on the international stage. This is a proud and inspiring moment for the entire state of Maharashtra.
Wishing all three athletes the very best for the championship. May they scale new heights of success with their talent and determination, and make the nation proud by flying the Indian tricolour high on the global stage.
पुणे शहरातील नील वारके आणि रुद्र करंदीकर, तसेच नागपूर येथील श्लोक डुडुळकर यांची इटली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या "वर्ल्ड युथ क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२६" या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
लहानपणापासूनच गिर्यारोहण व स्पोर्ट क्लाइंबिंगमध्ये सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या या तिन्ही युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
या तिन्ही खेळाडूंना स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय मंचावर दिमाखात फडकवावा, हीच सदिच्छा.
World Climbing