Trek Wake Click

Trek Wake Click Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Trek Wake Click, Pune.

बरेच दिवसांनी खरं तर वर्षांनी ट्रेक केला,म्हणून सुरुवात पण सोप्प्या ट्रेक ने केली.तो म्हणजे नाणेघाट .ट्रेक जरी सोप्पा अस...
23/08/2026

बरेच दिवसांनी खरं तर वर्षांनी ट्रेक केला,म्हणून सुरुवात पण सोप्प्या ट्रेक ने केली.तो म्हणजे नाणेघाट .ट्रेक जरी सोप्पा असला तरी आधी केलेल्या ट्रेक ची उर्मी आणि आत्ता ही वेगळी होती,आधीच्या ट्रेक मुळे खाल्लेले फटके आणि त्यामुळे मनात बसलेली भीती ही काहीही झालं तरी काढायची होती,कारण एकच मनापासून ट्रेक करायची आवड आणि पावसाळ्यात खास करून श्रावणात सजणारा सुंदर सह्याद्री पहायची हौस.
बरेच वर्षांनी खरा योग जुळून आला आणि तो GTribe मुळे माझ्यासारख्या बऱ्याच जणी आणि मेन म्हणजे सगळ्या अनोळखी होत्या अश्या सगळ्यांसोबत नाणेघाट ट्रेक ला सुरुवात झाली.सकाळी 5.45 la deccan इथून बस होती,आम्ही जुन्नर मार्गे नाणेघाटात पोहोचलो, लौकर उठून निघाल्यामुळे प्रचंड भूक लागली होती त्यामुळे गरमगरम पोह्यांवर ताव मारला,(पोहे हा राष्ट्रिय नाश्ता चा पदार्थ आहे) आता सगळ्या बायका असल्यामुळे पहिले photoseseion हे अनिवार्य होत,ते झाल्यावर आम्ही नाणेघाट पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि इतकावेळ दडी मारून बसलेल्या पावसाला धो धो सुरुवात झाली.
उतरताना मला पडलेला प्रश्न की ह्याला नाणेघाट का म्हणतात मग सगळी माहिती कळली की नाणे' म्हणजे पैसा (टोल) आणि 'घाट' म्हणजे मार्ग.
प्राचीन काळी या मार्गाने जाणारी व्यापारी सामग्री आणि जनावरांवर कर (टोल) गोळा करण्याचे ठिकाण म्हणून याचा वापर होई.

हा घाट इ.स.पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकात सातवाहन राजांच्या काळात भरभराटीस आला. कोकणातील कल्याण व सोपारा बंदरांना पैठण आणि जुन्नर सारख्या बाजारपेठांशी जोडणारा हा मुख्य मार्ग होता.
प्रवाशांना, सैनिकांना व व्यापाऱ्यांना राहण्यासाठी आणि विसावा घेण्यासाठी या डोंगरात कृत्रिम गुहा किंवा लेणी खोदण्यात आली.

येथील मुख्य गुहेमध्ये प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीमध्ये कोरीव लेख आहेत. यात सातवाहन घराण्यातील राजे, राणी नागणिका आणि राजा सातकर्णी यांच्याविषयी माहिती मिळते.

घाटामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी किंवा जनावरांना पिण्यासाठी वापरला जाणारा एक भलामोठा दगडी रांजण (टाके) आहे, खर तर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
पण त्याच्या आजूबाजूला उभे राहून सगळे आपला फोटो काढण्यात मग्न होतात.

लेण्यांच्या भिंतींवर एकेकाळी राजांच्या कोरलेल्या मूर्ती होत्या, ज्यांचे आता फक्त काही अवशेष उरले आहेत.

हे सगळे बघून आम्ही पावसात वरती चढून आलो.पाऊस भरपूर असल्यामुळे आपापले फोटो काढायला खूप जणींना थांबता आले नाही त्यामुळे खूप लौकर वरती चढून आलो.
मग तिथून साधारण 20-25 मिनिटे चालत रिव्हर्स waterfall बघायला गेलो,वाट अतिशय सुंदर होती,त्या वाटेने जाताना समोर जीवधन किल्ला दिसत होता आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे तो अतिशय सुंदर दिसत होता.तो बघत बघत आम्ही
रिव्हर्स वॉटरफॉल (उलटा धबधबा) बघायला पोहोचलो हा धबधबा महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये २,८०० फूट उंचीवर आहे. येथे तीव्र वाऱ्याच्या दाबामुळे पाण्याचे लोट खाली न पडता आकाशाच्या दिशेने वर उडतात आणि ते बघायला कमाल वाटतात.मस्त उलट्या धबधब्या मध्ये भिजायला अजून मजा येते. हे निसर्गसौंदर्य कॅमेरामध्ये कैद केल्याचा मोह अजिबात आवरत नाही.
हा सगळा निसर्ग मनात साठवून परत निघालो येताना परत जोरात पावसाने झोडपले आणि त्यामुळे गरम गरम पिठलं भाकरी,भाजी,आमटी भात आणि गरम गरम जिलब्यांवरती ताव मारला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो,परत येताना ,जाताना असणारी भीती ही पळून गेली होती,आणि पुढचा ट्रेक आता लौकरच करूया हे मनात नक्की केलं.

प्राजक्ता
23.08.26

Address

Pune
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trek Wake Click posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trek Wake Click:

Shortcuts

Share