06/06/2020
श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
फेसळणाऱ्या सागरानेही दिल्या असतील असंख्य टकरा पण चिऱ्या तील तसूभरही शिसे हलले नाही. ती किनाऱ्याच्या आतच फेसाळण्याची सागराची मर्यादा नव्हती तर या तख्तावर उभा असलेल्या मराठ्यांच्या मनगटातील ताकद होती. स्वराज्याच्या सीमारेषा वाढतच राहणार होत्या दर वेळी. कारण शत्रूच्या रक्ताने आखल्या गेलेल्या सीमारेषा पुसण्याचे काम केवळ मराठ्यांच्या तलवारीच करू शकत होत्या. या तलवारीच्या मागची ताकद निर्माण करणाऱ्या राजाला सिंहासनाधिश्वर करण्याचे व्रत हाती घेतलेल्या असंख्य मावळ्यांच्या त्यागाने राजधानी रायगड ची उंची गगनाला भिडत जात होती. उघड्यावर पडलेल्या देवता मंदिरात आणि वेशीवर गेलेली स्त्रियांची अब्रू घरात सुरक्षित करणाऱ्या सह्येश्र्वर छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वी आठवत होते ते वीर जे स्वराज्यावरील संकट परतावताना या सह्याद्रीच्या वाटेवर मातीत मिळाले. पण त्यांचं मातीत मिसळने मातीमोल नव्हते तर प्रत्येकाचा त्याग हा केवळ शिवरायांच्या गळ्यातील कवड्याच्या माळे एवढा पवित्र होता. आजही आहे.
#निरांकुश
#शिवराज्याभिषेक