14/01/2026
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची यशस्वी झेप
दिल्ली ऑलिंपिक असोसिएशन व नीती आयोग, भारत सरकार मान्यताप्राप्त टोंग इल मू डो या खेळाच्या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील कर्नल सिंह स्टेडियम येथे यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत भारतातील ११ राज्यांतील एकूण ५३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या राष्ट्रीय स्पर्धेत दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे २६ खेळाडू सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली.
सुवर्णपदक विजेते:
समृद्धी कांबळे, कार्तिक सीतापराव, ओम सुपेकर, अनुराधा निकम
रौप्यपदक विजेते:
ज्ञानेश्वरी मुळीक, सोनाक्षी खिल्लारे, स्वराज मुळीक, सुकशांत हंगरगे, आदित्य बनकर, समृद्धी गायकवाड, अंश यादव, कांचन नेवसे, प्रनीती दुधाळ, ऋत्विक कुंभार
कास्यपदक विजेते:
रोशनी हजारे, विनायक दुरगे, प्रतिक हंगरगे, ईश्वर ओव्हाळ, सार्थक गायकवाड, मुग्धा सोनवणे, प्रज्योती कड, करण बालटे, क्षितिज कुंभार, दीर्घ पोखर, स्वरा शेळके, वैष्णवी नवसुपे
या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र टोंग इल मू डो असोसिएशनचे महासचिव प्रविण होले सर, अध्यक्ष यश बारवकर, तसेच टोंग इल मू डो पुणे ग्रामीणचे अध्यक्ष समाधान दाणे, महाराष्ट्र टोंग इल मू डो असोसिएशनचे उपाध्यक्ष व ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश घुगे सर, आकाश कसबे सर, साक्षी बेसन, कांचन नेवसे, आर्यन शेलार व अनुराधा निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रियांका दाणे, खुशनंदन सक्करवार यांच्यासह संपूर्ण दौंड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.