BetterFly Counseling Centre

BetterFly Counseling Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BetterFly Counseling Centre, Pune.

BetterFly Counseling Centre is an initiative by Step up foundation to provide counseling and training services for adolescents/ teenagers, parents and teachers.

*कोरोनामुळे चिंता वाटतेय, नैराश्य आलेय? मग बोला आमच्याशी. समुपदेशनासाठी खुले व्यासपीठ*सध्याची परिस्थिती आपल्या कोणालाच न...
01/05/2021

*कोरोनामुळे चिंता वाटतेय, नैराश्य आलेय? मग बोला आमच्याशी. समुपदेशनासाठी खुले व्यासपीठ*

सध्याची परिस्थिती आपल्या कोणालाच नवीन नाही. अशा परिस्थिती मध्ये शारीरिक आरोग्य जितक महत्वाचं आहे तितकंच मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. सध्याच्या काळात अनेक नकारात्मक विचार येत असतात. आपल्याला कोविड होईल का म्हणून भीती , जवळच्या व्यक्तींना झाला तर त्यांची काळजी, बरे होतील का, बेड मिळेल का , ऑक्सिजन मिळेल का याची चिंता, लॉकडाउन मुळे सगळं आयुष्य कोंडल्या सारखं वाटणं, त्यातून नैराश्य येणं अशा सगळ्या नकारात्मक भावना दिसतायेत. कोविड मधून बरे झाल्यानंतरही बऱ्याच जणांना मानसिक त्रास होताना दिसतात. कोविड मधून जाणं हे एक दिव्यच. त्यामुळे या ओढवलेल्या परिस्थितीचा धक्का बसणं, चिडचिड होणं, उदास वाटणं हे होऊ शकत.
मोठ्या माणसांबरोबरच मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आत्ता महत्वाचं आहे. विशेषतः किशोरवयीन ( teenager ) मुलांची. त्यांचासाठी घरी बसून राहणं, त्यामुळे स्क्रीन चा वाढलेला वापर, पालकांबरोबरचा तणाव, परीक्षांची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी ताण वाढवणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसात बरीच मुलं आली ज्यांचा मध्ये अती चिंता, भीती, उदासीनता, एकटेपणा अशा भावना प्रामुख्याने दिसून आल्या.
जेव्हा अशा प्रकारच्या नकारात्मक भावना सतत येत असतील, तेव्हा समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. त्याचबरोबर प्रयत्नपूर्वक स्वतःला कोणत्यातरी कामामध्ये किवा आवडत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायला हवं.
अशा समस्यांबाबत समुपदेशन करण्यासाठी या क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करणारी *स्टेप‌‌‌ अप फाउंडेशन* व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
आपण आमच्याशी तुमच्या समस्यांबाबत मनमोकळे बोलू शकता, त्यासाठी 9823723451 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आनंदी जगण्यासाठी मनमोकळा संवाद. धन्यवाद 🙏

We are coming with something new...Stay connected...
28/09/2020

We are coming with something new...Stay connected...

23/09/2020

तुमचा उत्तर कमेंट मध्ये जरूर लिहा...
21/09/2020

तुमचा उत्तर कमेंट मध्ये जरूर लिहा...

14/09/2020

4th episode...Must watch...Stay connected...

25/07/2020
23/07/2020
09/07/2020
Do participate...
08/07/2020

Do participate...

Register now...
02/07/2020

Register now...

24/05/2020

मुलांना जबाबदारी घेऊ देत...
सध्या लॉक डाउन मूळे आपण सगळे घरी आहोत. घरातली सगळी कामसुद्धा आपण आपलीच करत आहोत. काम करायला लागलो की बऱ्याचदा घरातली लहान मुलं मधेमधे लुडबुड करायला लागतात. आपण जे करू ते त्यांना ही करायचा असतं.
घरातला संवाद- बाबा फरशी पुसायला घेतो तसं सहा वर्षांचा रोहन पण हातात एक फडकं घेऊन येतो आणि म्हणतो मी पण पुसणार.
बाबा- अर्रे नको मी पुसलंय तिकडंच. तू परत सगळं पाणी सांडवून ठेवशील.
रोहन- बाबा मला कळतं. मी पण फरशी पुसणार म्हणजे पुसणारच.
रोहन चा हट्ट बघून बाबा चा आरडाओरडा सुरू होतो. कारण त्याला पटपट काम आवरायचं असतं आणि लुडबुड पसारा नको असतो. तितक्यात आई बाबा ला असुदे म्हणून खुणावते.
आई – रोहन जरा ते कोपऱ्यातल पुसतोस का रे तू...तिकडे खूपच घाण झालंय रे...
आई नि असं म्हणल्यावर रोहन चा चेहरा इतका खुलतो आणि प्रचंड मोठी जबाबदारी मिळाल्याच्या अविर्भावात तो आपल्या कामगिरीवर निघून जातो. पुढची पंधरा वीस मिनिटं तो त्याच कोपऱ्यात मस्त रमतो.
बऱ्याचदा आपल्याला कामं उरकायची असतात म्हणून किंवा मुलांनी काम नको करायला म्हणून आपण मुलांना बाजूला करतो.
पण मला वाटतं की अगदी लहानपणापासून मुलांना थोडी थोडी ही काम करू दिली पाहिजेत. काम म्हणून नाही तरी त्यांना गम्मत म्हणून तरी. झाडांना पाणी घालणं, जेवायला ताट घेणं, आपली खेळणी किंवा वस्तू आपण उचलून ठेवणं हे मुलं आवडीने करतात. नक्कीच या गोष्टी जबरदस्तीने करायला लावल्या जाऊ नयेत. पण मुलांना आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये सहभागी करून घ्यायला नक्कीच हरकत नाही.
तुम्ही नीट बघितलं असेल तर लक्षात येत मुलं हे गम्मत म्हणून नाही करत. त्यांना खूप मस्त वाटत असतं की आपण आई बाबांची मदत करतोय. आई बाबांना आपली मदत हवी आहे / मदत लागतीये यात त्यांना खूप भारी वाटत असतं. जेव्हा आपण त्यांचं थोडंसं कौतुक करतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असतो. हेच तर असतं ना सेल्फ इमेज वगैरे घडवणं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. मुलांशी संवाद, मुलांवर संस्कार, मुलांना जीवनमूल्ये शिकवणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना जबाबदारी ची जाणीव करून देणे, gender eqaulity- अमूक काम मुलाचं किंवा तमुक काम मुलीच असं न म्हणता सगळ्या प्रकारची आणि जमतील ती कामं करण्याची सवय आणि आवड आपण आपल्या मुलांमध्ये निर्माण करू शकतो. या छोट्या गोष्टींमधून मुलांचा वेळ पण चांगला जातो आणि स्क्रीन टाइम पण कमी होतो. सुट्टीचा चांगला उपयोग ही जीवन कौशल्य शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो.

गौरी वैद
अध्यक्षा, स्टेप अप फौंडेशन
+919823723451
BetterFly Counseling Centre

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919823723451

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BetterFly Counseling Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share