Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी

  • Home
  • India
  • Pune
  • Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी

Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी ‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’
यांचा स्वतःशी आणि परस्परांशी
नव्यानं संवाद होण्यासाठी...
मासिक नव्हे चळवळ!

समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसे स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात आणि समाजात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी या हेतूने महाराष्ट्रातील स्त्री चळवळीत अग्रेसर असणार्‍या पत्रकार आणि कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक १९८९ साली सुरू केले.

नावातून सहकार, बांधिलकी आणि मैत्रभाव ध्वनित होणारे ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक सामाजिक आहे, तसेच साहित्यिकही. विविध सामाजिक प्

रश्नांचे विश्लेषण करणार्‍या लेखनाबरोबरच कथा, कविता, ललित लेख आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जीवनाचा अर्थ शोधताना आलेल्या आणि घेतलेल्या अनुभवांची आत्मकथने – हे सगळं वाचकांपर्यंत पोचवणारा एक जिवंत झरा म्हणजेच ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक होय!

मागील बत्तीस वर्षांच्या वाटचालीत 'मिळून सार्‍याजणी'ने मराठी वैचारिक-सांस्कृतिक विश्वात आणि सामाजिक चळवळींच्या अवकाशात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अनेक जणांना लिहिते आणि बोलते केले आहे. 'मिळून सार्‍याजणी' म्हणजे मासिकाच्या रूपाने सुरु असलेली एक वैचारिक-सामाजिक चळवळच आहे. आजच्या तंत्रज्ञानयुगात तरुण आणि नवनवीन समाजमाध्यमे या दोघांशी जोडून घेत, बहुविध उपक्रमांच्या माध्यमातून मासिकाची कालसुसंगत वाटचाल करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.

‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’
यांचा स्वतःशी आणि परस्परांशी
नव्यानं संवाद होण्यासाठी...
मासिक नव्हे चळवळ!
.अशी टॅगलाईन असलेले ‘मिळून सार्‍याजणी’ फक्त छापिल मासिक एवढेच मर्यादित नाही तर आता ‘मिळून सार्‍याजणी’ समाज-माध्यमांवर देखील बहुविध प्रकारे संवाद साधत आहे.. मिसा ऑनलाईन, मिसा फेसबुक पेज, मिसा इंस्टाग्राम, मिसा यूट्यूब चॅनेल, मिसा ट्विटर!


| मिळून सार्‍याजणी | मराठी मासिक | आरंभ - ऑगस्ट १९८९ |
| संस्थापक संपादक - स्मृतिशेष विद्या बाळ |
| संपादक - गीताली वि. मं. |


अधिक माहितीसाठी विद्याताई व गीतालीताई यांच्या ब्लॉगलाही नक्की भेट द्या

https://vidyabal.wordpress.com/

https://geetalivm.wordpress.com/

25/04/2026

विषमता निर्मूलन निर्धार वर्ष 2026
सस्नेह निमंत्रण,*
Gen Z साठी खास –मिळून साऱ्याजणी मासिकाच्या सप्टेंबर अंकात Gen Z आणि फेमिनिझम या विशेष विभागात लेखन करण्या साठी दिल से आमंत्रण!** ✨

प्रिय तरुण मित्रमैत्रिणींनो,

आजची Gen Z पिढी बदल घडवणारी, प्रश्न विचारणारी आणि स्वतःचा आवाज ठामपणे मांडणारी आहे. हाच आवाज अधिक प्रभावीपणे पुढे आणण्यासाठी आपण आपल्या मिळून साऱ्याजणी मासिकाच्या सप्टेंबर अंकात खास तुमच्या नजरेतून फेमिनिझम कडे बघण्याचा प्रयत्न करत आहोत.

🎤 तुम्ही कथा, कविता,लेख,ब्लॉग असं काही लिहिता का?
🎨 तुम्हाला तुमची कला व्यक्त करायची आहे का?
💭 समाजातील फेमिनिझम,लिंग समानता, ओळख, स्वातंत्र्य, किंवा वैयक्तिक अनुभव यावर तुमचे मत मांडायचे आहे का?

तर हा अंक तुमच्यासाठीच आहे!

आम्ही Gen Z च्या नजरेतून आजचा समाज कसा दिसतो, कसा अनुभवला जातो आणि तुमची पिढी कसा बदल घडवू बघते, फेमिनिझम विषयी तुम्हाला काय वाटतं हे सांगण्यासाठी लेख, कविता, कथा, फोटो आणि वैयक्तिक अनुभवांचे आम्ही स्वागत करतो.

🌈 *थीम:* “Gen Z, फेमिनिझम आणि नव्या युगाचे जगणे”
अंक प्रकाशन: सप्टेंबर तरुणाईचा विशेष अंक, तरुणाईच्या नजरेतून.

तर हा अंक कसा असावा, यात कोणकोणते विषय घ्यावेत हे ठरवण्यासाठी आपण भेटतो आहोत रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी 3 ते 6 वाजता.
पत्ता
गीताली - मुकुंद निवास
501, बी 2, कुमार प्राईड पार्क अपार्टमेंट,ऑफ सेनापती बापट रोड शिवाजीनगर,
पुणे 411016
जरूर या वाट पाहत आहोत.
आपले,
डॉ.गीताली वि.मं.
संपादक, मिळून साऱ्याजणी मासिक
दीपा देशमुख, जमीर कांबळे
सल्लागार, मिळून साऱ्याजणी मासिक

अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला लाल  सलाम...प्रतिभावंत लेखक, विचारवेधच्या माध्यमातून एक वे...
19/11/2025

अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला लाल सलाम...
प्रतिभावंत लेखक, विचारवेधच्या माध्यमातून एक वेगळीच चळवळ चालवणारा, पुरुषभान जागवण्यासाठी सतत संवाद करणारा, पुरुष उवाच अभ्यासवर्गात नेहमीच सहभागी असणारा मिळून साऱ्याजणीचा जिवाभावाचा मित्र आनंद करंदीकर याने काल जगाचा निरोप घेतला. अलविदा मित्रा...

पुरुष उवाच मासिक अभ्यास वर्गात पुरुष उवाच दिवाळी अंक 25 चं प्रकाशन करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, उजवीकडे...
31/10/2025

पुरुष उवाच मासिक अभ्यास वर्गात पुरुष उवाच दिवाळी अंक 25 चं प्रकाशन करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, उजवीकडे पत्रकार आणि कवी जितेंद्र मैद,संपादक मुकुंद किर्दत,संदीप बर्वे, लेखक अरविंद बुधकर डावीकडे संपादक गीताली वि.मं.,अभिजित कांबळे,प्रभू अभयवीर, अ. सादिक

डाव्याबाजूला सानिका, गीतालीताई, स्मिता हेमलता, पूर्वा, पूनम आणि अर्चना झेंडे!या साऱ्या सख्यांच्या परिश्रमातून मिळून साऱ्...
16/10/2025

डाव्याबाजूला सानिका, गीतालीताई, स्मिता हेमलता, पूर्वा, पूनम आणि अर्चना झेंडे!
या साऱ्या सख्यांच्या परिश्रमातून मिळून साऱ्याजणी दिवाळी अंक संपन्न झाला त्याचं घरच्या घरी प्रकाशन करण्यातला आनंद काही वेगळाच असतो....
अंक सर्व स्टॉल वर उपलब्ध आहे.जरूर विकत घ्या आणि वाचून अभिप्राय कळवा वाट पाहत आहोत...

काल माझा वाढदिवस होता .अनेक मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या त्याचा मनस्वी आनंद झाला... दिल से धन्यवाद डियर ऑल!पोच देण्...
14/10/2025

काल माझा वाढदिवस होता .अनेक मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या त्याचा मनस्वी आनंद झाला... दिल से धन्यवाद डियर ऑल!
पोच देण्यात उशीर झाला कारण मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुष उवाच दिवाळी अंक यांची शेवटची धामधूम चालू होती...वाढदिवसाची अमूल्य भेट म्हणजे हा मिळून साऱ्याजणी मासिकाचा दिवाळी अंक... बघा

2 ऑक्टोबर 2025सस्नेह नमस्कार, पुरुष उवाच गेली अठरा वर्ष दिवाळी अंक प्रकाशित करत आहे.अंक प्रकाशित करताना अनेक अडचणी येतात...
10/10/2025

2 ऑक्टोबर 2025
सस्नेह नमस्कार,
पुरुष उवाच गेली अठरा वर्ष दिवाळी अंक प्रकाशित करत आहे.अंक प्रकाशित करताना अनेक अडचणी येतात ,त्यातील एक मोठी समस्या म्हणजे आर्थिक स्थिती!त्यावर मात करण्यासाठी आपण सर्व नेहमी मदतीचा हात देत असता त्यामुळेच अंक प्रकाशित होऊ शकतो याची आम्हाला नम्र जाणीव आहे.यावर्षीही आपण सर्व आर्थिक सहाय्य कराल असा विश्वास वाटतो.
पुरुषांकडून स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचार आणि अत्याचाराच्या सततच्या वाढत्या घटना लक्षात घेता पुरुषांचं मानस बदलण्याची नितांत गरज आहे.
पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता बदलून पुरुषांची समतावादी मानसिकता तयार करण्यासाठी पुरुष उवाच दिवाळी अंक ही एक छोटीशी चळवळ आहे या भूमिकेतून गेली अठरा वर्षं प्रयत्न करत आहे. आपलाही समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर विश्वास आहे.
पुरुष उवाच दिवाळी अंकात ही मूल्य जपण्याच्या आणि वृद्धिंगत करण्याच्या आमच्या या प्रयत्नांना आपण आर्थिक साहाय्य करावं ही नम्र विनंती.

यावर्षीचा अंकही नेहमी प्रमाणे आशयघन लेख, नाविन्यपूर्ण अनुभवकथनं , कथा - कविता , देखणी रेखाटनं यांची रेलचेल असणारा 352 पानी भरगच्च ऐवज असणारा दिवाळी अंक आहे.या अंकासाठी आर्थिक योगदान करावं ही पुन्हा एक वार प्रेमाग्रहाची विनंती!

प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!

गीताली वि. मं.
संपादक पुरुष उवाच दिवाळी अंक
सोबत खाली बँक डिटेल्स देत आहे
सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद

Our Bank details:
Current Account name: *Purush Uvach*
Current a/c no: 72810200000114
Bank:Bank of Baroda.
Branch: Shivaji Hsg Soct. Pune 16
RTGS/IFSC Code: BARB0DBSHIJ
(5 th character is Zero)

Contact phone: 9822746663 / 9822552263

08/09/2025

*'मिळून साऱ्याजणी'चा ऑक्टोबर-नोव्हेंबर (जोडअंक) २०२५* खास विभाग: *तळा मुळातला स्त्रीवाद...* (मागोवा तळा मुळातल्या स्त्रीवादाचा, अर्थात ग्रासरूट फेमिनिझमचा!) अतिथी संपादक: *लक्ष्मी यादव*

ढ़ोल गँवार शूद्र पशू नारी
सकल ताड़न के अधिकारी
या ओळींमधून तुलसीदासांनी समाज मनाचा आरसा लोकांना दाखवला. स्त्री, पुरुष, पारलिंगी यांच्यातील शारीरिक भेदांना सामाजिक भेद बनवलं गेलं आणि माणसा-माणसांची जाचक उतरंड तयार केली. वंचितांना माणूस म्हणून जगण्याचा नैसर्गिक अधिकार नाकारला. जात, धर्म, लिंगाच्या आधारावर भेदाभेद करून हिंसा पेरली गेली. त्या विरोधात ‘ज्यांचे प्रश्न त्यांची उत्तरे’ याच्या धर्तीवर तळातल्या लोकांनी आपला लढा उभारल्यानं काही प्रमाणात का होईना स्त्रिया, पारलिंगी यांच्यावरील हिंसेची जागा बुद्धाच्या करुणेनं घेतली. 'मिळून सार्‍याजणी'च्या २०२५ च्या दिवाळी अंकात आपण मागोवा घेणार आहोत - तळा मुळातल्या स्त्रीवादाचा अर्थात ग्रासरूट फेमिनिझमचा. या अंकात सर्वसामान्य स्त्रिया आणि पारलिंगींचं जग बदललं आहे का, त्यांचा उत्कर्ष आणि संघर्ष काय आहे? त्यासाठी पुरुषांची साथ लाभते आहे का? हे सगळं जाणून घेऊयात.

*ललित:* सुजाता खांडेकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, सक्षणाताई सलगर, तमन्ना इनामदार, संगीता ठोसर, कविता वारे, दीपा पवार, रेश्मा ठोसर, सुनील गजकोश, निकीता मुख्यदल, राजश्री पगारे, सरिता पवार, प्रविण सिंधू, लक्ष्मी यादव, सचिन आशा सुभाष, भाग्यश्री लेकामी, निकीता बाफना, सुनिता पाटील, तनुजा येल्ले आणि इतर

*कविता:* सुनिता झाडे, योजना यादव, साहिल कबीर
*अनुवादित कविता:* भरत यादव
*मुलाखत:* भीम रासकर मुलाखातकार: साधना तिप्पनाकजे --------------------------------------------------------------- *याशिवाय अंकात* विषमता, हिंसेच्या पार, स्त्रीवादी दृष्टी आणि कार्यास येऊ दे धार: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या *मेधा पाटकर*
सांप्रदायिक हिंसाचार राजकारणातील तिचे वास्तव: *शैला सातपुते*
१९९६ ते २००५ या दशकातील स्त्रीचळवळीच्या प्रभावामुळे झालेले कायदे व इतर बदल: *अ‍ॅड. निशा शिवूरकर*
पर्यावरण, नागरीकरण आणि स्त्रिया: *सुलक्षणा महाजन*
अंगाई गीतांचा लळा: *नीला भागवत*
पुरुषांच्या कवितेतील स्त्रीसंवेदन: *अंजली कुलकर्णी*
रक्तपिपासू हुकूमशहाला हरवणारी पत्रकार मारिया रेसा: *अरुंधती देवस्थळे*
ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ *माधव गाडगीळ* लिहिताहेत हवामान शास्त्रज्ञ सुलोचना गाडगीळ या आपल्या दिवंगत पत्नीविषयी पुस्तकांच्या मनात: 'तर... अशी सारी गम्मत' या चित्रा पालेकर यांच्या पुस्तकाविषयी लिहिताहेत *सरिता आवाड*

कथेच्या दालनात: निरवस्पर्श: *रेवती भागवत* कवितेच्या दालनात: *प्रज्ञा दया पवार, आश्लेषा महाजन* आणि इतर. तसंच, नेहमीची सदरं
संपादक: गीताली वि. मं. किंमत: रु.१०० । पाने: १२०

Address

101, Nachiket, 33/25, Fourth Lane, Prabhat Road
Pune
411004

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 12am - 5pm
Wednesday 12am - 5pm
Thursday 12am - 5pm
Friday 12am - 5pm

Telephone

+917447449664

Alerts

Be the first to know and let us send you an email when Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Miloon Saryajani - मिळून साऱ्याजणी:

Shortcuts

Share