15/08/2026
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंडेपेंडेंट क्रिकेट क्लब वेलिंग तर्फे सरकारी प्राथमिक विद्यालय वेलिंग शाळेमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कचरा पेट्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेची सवय लागावी आणि शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर रहावा हा या उपक्रमागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छ शाळा सुंदर शाळा आणि निरोगी परिसर यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कचरा योग्य ठिकाणी टाकणे.ओला व सुखा कचरा वेगळा करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केवळ कचरा पेट्या देण्यापुरता मर्यादित नसून स्वच्छता आणि पर्यावरणा बद्दल जबाबदारीची भावना निर्माण करणारा एक छोटासा पण महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरला.