14/08/2026
अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏
आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून, या पदाकडे मी केवळ पद म्हणून नव्हे तर एक मोठी जबाबदारी म्हणून पाहतो. संघटनेची एकता, सर्वांचा विश्वास आणि हित जपत प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे काम करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळालेली ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. आपला विश्वास हीच माझी ताकद आणि आपली एकजूट हीच आपली खरी शक्ती!