Crickadda Turf Services

Crickadda Turf Services Crickadda Turf – Pandharpur
Premium Cricket Turf Ground �
� Mechanical Line, Pandharpur

*ॲकॅडमी विशेष बाल क्रिकेट स्पर्धा २०२६* *नवीन आणि लहान खेळाडूंसाठी सुवर्णसंधी!*आमचल्या ॲकॅडमीतील जे लहान मुले अजून लेदर ...
27/05/2026

*ॲकॅडमी विशेष बाल क्रिकेट स्पर्धा २०२६*

*नवीन आणि लहान खेळाडूंसाठी सुवर्णसंधी!*

आमचल्या ॲकॅडमीतील जे लहान मुले अजून लेदर बॉलवर खेळत नाहीत, त्यांच्यासाठी खास *'सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे*. या स्पर्धेमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना प्रत्यक्ष सामन्याचा अनुभव मिळेल.

🏟️*स्पर्धेचे मुख्य आकर्षण*
मैदान: भव्य टर्फ ग्राउंड (Turf Ground)
टी-शर्ट: सर्व सहभागी खेळाडूंना आकर्षक स्पर्धा टी-शर्ट मोफत.
बक्षिसे: खेळणाऱ्या सर्व लहान मुलांसाठी भरपूर बक्षिसे.

📋 *सामन्याचे स्वरूप*
एकूण संघ: ५ संघ (5 Teams)
खेळाडू: प्रत्येक संघात ७ खेळाडू (7 Players)
(बाकीचे सर्व नियम व्हॉट्सॲप ग्रुपवर दिले जातील.)

*प्रवेश फी आणि नाव नोंदणी*
*एकूण फी: फक्त ₹५००/-*

अंतिम तारीख: *२6 मे २०२६ पर्यंत (फी भरूनच नाव निश्चित करणे बंधनकारक आहे*.)

*स्पर्धा 29 मे रोजी असेल*

📞 अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क:
मोबाईल नंबर: 8275447877

🏏🌟 WBPL – Women’s Box Premier League 2026 🌟🏏पंढरपूरमध्ये प्रथमच महिलांसाठी खास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!क्रिकेटची आवड असल...
24/05/2026

🏏🌟 WBPL – Women’s Box Premier League 2026 🌟🏏

पंढरपूरमध्ये प्रथमच महिलांसाठी खास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

क्रिकेटची आवड असलेल्या महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. Crickadda Turf Services & NS Cricket Academy यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Women’s Box Premier League (WBPL) मध्ये सहभागी होऊन आपल्या क्रिकेट कौशल्याला नवी ओळख द्या.

📌 स्पर्धेची वैशिष्ट्ये:
✅ एकूण 4 संघ
✅ प्रत्येक संघाचे 2 लीग सामने
✅ प्रत्येक संघात 7 महिला खेळाडू
✅ आकर्षक बक्षिसे
✅ प्रवेश पूर्णपणे विनामूल्य

📅 महत्त्वाच्या तारखा:
📝 नोंदणीची अंतिम तारीख – 5 जून
🏏 स्पर्धेची तारीख – 5 जूननंतर जाहीर केली जाईल
⭐ प्रथम नोंदणी करणाऱ्या 4 संघांना प्राधान्य

📍 स्थळ:
Crickadda Turf Services, मेकॅनिकल लाईन, अनिता कोल्ड स्टोरेज जवळ, पंढरपूर.

📞 संपर्क:
श्री. सागर देशपांडे – 9850826717
श्री. नागेश साळुंखे सर – 8275447877

💪❤️ महिला शक्तीचा उत्सव साजरा करूया!
लवकर नोंदणी करा, संघ मर्यादित आहेत.
चला मैदान गाजवूया! 🏏🔥

आजपासून सुरू होत असलेल्या फ्रेंडशिप बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेस सर्व खेळाडू आणि संघांना हार्दिक शुभेच्छा! 🏏🤝"मैत्रीचा बंध...
21/05/2026

आजपासून सुरू होत असलेल्या फ्रेंडशिप बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेस सर्व खेळाडू आणि संघांना हार्दिक शुभेच्छा! 🏏🤝

"मैत्रीचा बंध, खेळाची शान,
फ्रेंडशिप बॉक्स क्रिकेट लीगने रंगणार मैदान!"

"जिंकणे-हरणे हा खेळाचा भाग,
पण मैत्री, एकता आणि क्रीडाभावना हाच खरा विजय!"

क्रिकअड्डा टर्फ सर्व्हिसेस व NS क्रिकेट अकॅडमी आयोजित फ्रेंडशिप बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभो व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडो, हीच शुभेच्छा! 🏆✨

🏏🤝🏆

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या अभिमानाच्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा सुवर्ण दिवस.शौर्य, परंपरा आणि क्रीड...
01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अभिमानाच्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा सुवर्ण दिवस.
शौर्य, परंपरा आणि क्रीडा संस्कृतीने नटलेला आपला महाराष्ट्र सदैव प्रेरणादायी आहे.
या खास दिवशी आपल्या Crickadda Turf Services तर्फे सर्व खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा!
चला, एकत्र येऊन खेळाच्या माध्यमातून एकतेचा आणि उत्साहाचा संदेश पसरवूया.
जय महाराष्ट्र! 🟠⚽🏏

उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर हे तरुण खेळाडूंना त्यांच्या कौशल्यांना धार लावण्याची एक उत्तम संधी आहे. आमच्या टर्फवर आय...
21/04/2026

उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर हे तरुण खेळाडूंना त्यांच्या कौशल्यांना धार लावण्याची एक उत्तम संधी आहे. आमच्या टर्फवर आयोजित या शिबिरात अनुभवी प्रशिक्षकांकडून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे सखोल मार्गदर्शन दिले जाते. आधुनिक सराव पद्धती, फिटनेस ट्रेनिंग आणि सामन्यांचा अनुभव यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. शिस्त, टीमवर्क आणि स्पर्धात्मक भावना यांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जातो.

हे शिबीर 20 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत आयोजित केले असून, सर्व इच्छुक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा. तुमच्या क्रिकेटच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी हे शिबीर एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. 🏏

महत्मा फुले जयंती विशेष – Crickadda Turf Servicesआज Mahatma Jyotirao Phule यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या महान कार्य...
11/04/2026

महत्मा फुले जयंती विशेष – Crickadda Turf Services

आज Mahatma Jyotirao Phule यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या महान कार्याला अभिवादन करतो.
त्यांनी शिक्षण, समानता आणि समाजसुधारणेचा मार्ग दाखवला.
अज्ञान, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
त्यांचे विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात.

Crickadda Turf Services तर्फे, आम्ही त्यांच्या विचारांचा आदर करतो.
आमच्या Turf वर प्रत्येक खेळाडू समान आहे.
इथे जात, धर्म किंवा कोणताही भेदभाव नाही.
फक्त खेळ, टीमवर्क आणि मैत्रीला महत्व आहे.

खेळ आपल्याला एकत्र आणतो आणि एकतेचा संदेश देतो.
आजच्या दिवशी आपणही त्यांच्या विचारांप्रमाणे वागण्याचा संकल्प करूया.
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एकत्र येऊया.

🙏 महात्मा फुले जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
— Crickadda Turf Services

08/04/2026
हनुमान जयंतीच्या पवित्र आणि मंगलमय शुभेच्छा! 🚩श्री हनुमंताची शक्ती, धैर्य आणि निष्ठा आपल्या सर्वांच्या जीवनात प्रेरणा दे...
02/04/2026

हनुमान जयंतीच्या पवित्र आणि मंगलमय शुभेच्छा! 🚩
श्री हनुमंताची शक्ती, धैर्य आणि निष्ठा आपल्या सर्वांच्या जीवनात प्रेरणा देत राहो. या पवित्र दिवशी Crickadda Turf Services तर्फे सर्व क्रिकेटप्रेमींना हार्दिक शुभेच्छा! 🏏
जसे बजरंगबलीने पराक्रमाने सर्व अडचणींवर मात केली, तसेच आपणही आपल्या खेळात आणि आयुष्यात यशस्वी व्हा हीच शुभेच्छा.

चला, या उत्साहपूर्ण दिवशी क्रिकेटचा आनंद द्विगुणित करूया आणि एकत्र येऊन खेळाची खरी मजा अनुभवूया! 🔥

राम नवमीच्या पवित्र आणि मंगलमय उत्सवानिमित्त, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्माचा आनंद साजरा करताना आम्ही C...
26/03/2026

राम नवमीच्या पवित्र आणि मंगलमय उत्सवानिमित्त, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्माचा आनंद साजरा करताना आम्ही CrickAdda Turf Services तर्फे सर्व क्रिकेटप्रेमींना हार्दिक शुभेच्छा! श्रीरामांसारखी शिस्त, संयम आणि एकजूट यांची प्रेरणा घेऊन आपल्या मित्रांसोबत मैदानावर दमदार खेळाचा आनंद घ्या. या राम नवमीला फक्त पूजा नाही, तर चौकार-षटकारांच्या जल्लोषातही सण साजरा करा. चला तर मग, या खास दिवशी CrickAdda Turf वर खेळा, जिंका आणि सुंदर आठवणी तयार करा! 🏏✨

पाडव्याच्या शुभेच्छा 🙏🙏
19/03/2026

पाडव्याच्या शुभेच्छा 🙏🙏

Address

Mechanical Line Near Anita Cold Storage Pandharpur
Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Crickadda Turf Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category