Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी

  • Home
  • India
  • Osmanabad
  • Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी

Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी सत्य , निर्भीड , निष्पक्ष , रोखठोक.
संपर्क :- 94 23 774 674

11/04/2026

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पत्रकार परिषद.

ठिकाण : तुळजापूर
#मल्हारपाटील #रामचंद्ररोचकारी #आनंदकंदले

ठाकरेंचा वाघ आता एकनाथ शिंदेंच्या जाळ्यात..?धाराशिवच्या रणात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची डरकाळी..!चहाच्या टपरीपासून ते थेट ज...
11/04/2026

ठाकरेंचा वाघ आता एकनाथ शिंदेंच्या जाळ्यात..?

धाराशिवच्या रणात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची डरकाळी..!

चहाच्या टपरीपासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकच चर्चा आहे " आता पुढचा नंबर कोणाचा..?"

धाराशिवच्या राजकारणात सध्या तापमान वाढवणारे वारे वाहत आहेत. एकीकडे धाराशिवचे संपर्कमंत्री असलेले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा दौरा करीत ऑपरेशन टायगरचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून गुप्त बैठकीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वावटळ उठवून मोठी खळबळ माजवली आहे. ​धाराशिवच्या मातीत सध्या उन्हाळ्याच्या झळांपेक्षा राजकीय 'ऑपरेशन'ची उष्णता जास्त जाणवत आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.यांनी काल जिल्ह्यात पाऊल ठेवताच, "भाकरी आता फिरणारच" असा स्पष्ट संकेत दिला. त्यांच्या 'ऑपरेशन टायगर'च्या घोषणेने अनेकांच्या पोटात गोळा आणला आहे. "लवकरच मोठे मासे गळाला लागणार," असे म्हणत त्यांनी जिल्ह्याच्या राजकीय तलावात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

शिंदेंची 'भाकरी' आणि आबिटकरांचा 'तवा'

​एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी कंबर कसली असताना, धाराशिवमध्ये त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मंत्र्यांनी दिलेले संकेत आणि शिंदेंची रणनीती पाहता, जिल्ह्यातील काही प्रतिनिधी 'नॉट रीचेबल' होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
​"राजकारण हे गणितापेक्षा केमिस्ट्रीवर जास्त चालते," असं म्हणतात. धाराशिवमध्ये आता ही 'केमिस्ट्री' जुळवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

​काय आहे हे 'ऑपरेशन'?

​'ऑपरेशन टायगर' म्हणजे केवळ पक्षप्रवेश नव्हे, तर समोरच्या गोटातील 'वाघ' आपल्या पिंजऱ्यात आणण्याची ही एक सुप्त मोहीम आहे. जुन्या निष्ठावंतांची धाकधूक वाढली आहे."आम्ही बोलत नाही, करून दाखवतो" या स्टाईलने त्यांनी विरोधकांना बॅकफूटवर नेले आहे.
आगामी काळातील राजकीय रणनीती डोळ्यासमोर ठेवून 'भाकरी' करपण्याआधीच ती फिरवण्याचा चंग शिंदेच्या शिवसेनेने बांधला आहे.

थोडक्यात पण 'तिखट'

​धाराशिवच्या चहाच्या टपरीपासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकच चर्चा आहे " आता पुढचा नंबर कोणाचा?" काहींना सत्ता खुणावतेय, तर काहींना अस्तित्वाची भीती वाटतेय. पण एक मात्र नक्की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे धाराशिवचा स्वतःला एकनिष्ठ म्हणवून घेणारा 'टायगर' आता अधिक शिंदेच्या जाळ्यात जाणार.असल्याची चर्चा सर्वदूर पसरली आहे. ​आता पाहायचे हेच की, ही फिरलेली 'भाकरी' कुणाच्या ताटात पडणार आणि कोणाचा 'तवा' रिकामा राहणार! धाराशिवकरांसाठी हे राजकीय नाट्य एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीला ठाकरे सेनेच्या आठ खासदारांपैकी सहा खासदारांनी प्रत्यक्ष आणि दोन जणांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आता शिंदेंच्या समोर हजेरी लावणाऱ्या वाघांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील ठाकरेंचा वाघही उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती कलाटणी देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

धाराशिव काँग्रेसमध्ये नाराजी तीव्र; जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांवर अपयशाची छाया, बदलाची चर्चा..!निवडणुकांतील अपयश, संघटनात्म...
11/04/2026

धाराशिव काँग्रेसमध्ये नाराजी तीव्र; जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांवर अपयशाची छाया, बदलाची चर्चा..!

निवडणुकांतील अपयश, संघटनात्मक दुर्लक्ष..!

धाराशिव जि.प. समित्यांचा फैसला आज ; 10 समित्यांवर लागणार सदस्यांची मोहोर..!अध्यक्षांच्या दालनात घडामोडींना वेग..!       ...
10/04/2026

धाराशिव जि.प. समित्यांचा फैसला आज ; 10 समित्यांवर लागणार सदस्यांची मोहोर..!

अध्यक्षांच्या दालनात घडामोडींना वेग..!

#जिल्हापरिषद

"100 कोटींचा रस्ता हंप-जंप ; प्रशासन झोपेत, नागरिक हैराण!""मुदत संपली तरी काम अपूर्ण ; प्रशासन गुत्तेदाराच्या पाठीशी ?  ...
09/04/2026

"100 कोटींचा रस्ता हंप-जंप ; प्रशासन झोपेत, नागरिक हैराण!"
"मुदत संपली तरी काम अपूर्ण ; प्रशासन गुत्तेदाराच्या पाठीशी ?

#सार्वजनिकबांधकामविभाग
#सार्वजनिकबांधकामविभागधाराशिव

धाराशिव नगरपालिकेत आघाडीला तडा ; दोन काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश..!धाराशिव प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहे...
09/04/2026

धाराशिव नगरपालिकेत आघाडीला तडा ; दोन काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश..!

धाराशिव प्रतिनिधी :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांनी धाराशिव नगरपालिकेची निवडणूक एकत्र आघाडी म्हणून लढवली होती. निवडणुकीनंतर काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. मात्र आता या तिघांपैकी दोन नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मागासवर्गीय सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक गटनेते अमित शिंदे, नगरसेवक राहुल काकडे , अभिजित पतंगे उपस्थित होते.

या घडामोडीमुळे काँग्रेस गटात फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून, नगरपालिकेतील आघाडीची ताकद कमी झाली आहे.
विशेष म्हणजे, तीनपैकी दोन नगरसेवक एकत्रितपणे पक्षांतर करत असल्याने ‘गटफूट’ म्हणून ही हालचाल गणली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचा अडथळा या प्रकरणात येणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या बदलामुळे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आघाडी टिकवणे आणि उर्वरित संघटन मजबूत ठेवणे हे आता त्यांच्या समोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, आगामी काळात आणखी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#उस्मानाबाद #धाराशिव

दुर्दैवी घटना: बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यूकेज (प्रतिनिधी): केज तालुक्याचे तहसी...
09/04/2026

दुर्दैवी घटना: बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू

केज (प्रतिनिधी):
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातावेळी ते वाहनात एकटेच असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान, एका कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा आकस्मिक निधनामुळे महसूल प्रशासनासह केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

#धाराशिव #उस्मानाबाद #बीड #केज #महसूल

धाराशिवात उबाठा पक्षाला मोठा धक्का..!बेंबळीचे शहरप्रमुख श्याम पाटील यांचा शहरप्रमुख पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा..!...
08/04/2026

धाराशिवात उबाठा पक्षाला मोठा धक्का..!

बेंबळीचे शहरप्रमुख श्याम पाटील यांचा शहरप्रमुख पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा..!

#धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवशिवसेना

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प :- दत्ता भाऊ कुलकर्णीधाराशिव येथील भ...
06/04/2026

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प :- दत्ता भाऊ कुलकर्णी

धाराशिव येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे भाजपा चा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला. आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी खंडेराव चौरे, सुरेश देशमुख, नितीन काळे, अॅड. अनिल काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, सौ. अस्मिता कांबळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ प्रितीताई कदम हे मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक बुथवर एखादा तरी छोटा मोठा उद्योजक तयार करण्याचा संकल्प यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

४६ वर्षामध्ये पक्ष संघटनेच्या अनेक मान्यवरांनी आपल्या त्याग, परिश्रम व अथक प्रयत्नातून पक्षाचे विचार तळागळात पोहचवण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण जिल्ह्यात, प्रदेशात व केंद्रात सत्तेवर आहोत,असे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी विचार मांडले.

या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व भागांतील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 #धाराशिवात झेंड्यांवरून राजकीय  #खडाजंगी; अभिजीत पतंगे यांचा संजय भोरे यांना पलटवार..!“आधी तुमच्या  #खासदारांना विचारा,...
05/04/2026

#धाराशिवात झेंड्यांवरून राजकीय #खडाजंगी; अभिजीत पतंगे यांचा संजय भोरे यांना पलटवार..!

“आधी तुमच्या #खासदारांना विचारा, #शिंदे गटाचा झेंडा #घरावर कधी लावणार?” – अभिजित पतंगे

धाराशिव प्रतिनिधी :
धाराशिवमध्ये राजकीय #वातावरण पुन्हा एकदा तापले असून झेंडा लावण्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एका #सोशल_मीडिया पोस्टमधून केलेल्या टीकेला #प्रत्युत्तर देताना भाजपचे धाराशिव नगरपालिकेचे #नगरसेवक अभिजीत पतंगे यांनी #उबाठा गटाचे कार्यकर्ते #संजय_भोरे यांना जोरदार शब्दांत सुनावले.

संजय भोरे यांनी भाजप चे युवा नेते #मल्हार_पाटील यांच्या घरावर पक्षाचा झेंडा लावण्याबाबत सवाल उपस्थित करत टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना #अभिजित_पतंगे म्हणाले की, “इतरांना #सल्ला देण्यापूर्वी स्वतःच्या घरातील #स्थिती पाहावी.

खासदार #ओमराजे_निंबाळकर यांच्या शिवसेना #एकनाथ_शिंदे गटात #प्रवेशाच्या शक्यतेवरून #जिल्हाभरात विविध #तर्क-वितर्क लावले जात असतानाच उबाठा गटाच्या संजय भोरे यांनी आधी त्यांच्या #खासदार #ओमराजे यांना #विचारावे की, ते शिंदे गटाचा #झेंडा घरावर कधी लावणार?”

या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला #उधाण आले असून दोन्ही गटांतील #संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवर झेंड्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता मोठ्या #राजकीय संघर्षात #परिवर्तित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

05/04/2026

बेंबळी ग्रामविकास ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी तसेच उदगीर लायन्स आय नेत्रालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने

बेंबळी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

धाराशिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी मानले संयोजकाचे आभार

“या शिबिरात सुमारे साडेतीनशे ते चारशे नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.”

धाराशिव शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते व जिल्हाप्रमुखांचे फोटो गायब; जिल्हाभरात चर्चेला उधाण..!सभापतीपदातून डावलल्याच्या ...
04/04/2026

धाराशिव शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते व जिल्हाप्रमुखांचे फोटो गायब; जिल्हाभरात चर्चेला उधाण..!

सभापतीपदातून डावलल्याच्या नाराजीतून #युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष #आनंद_पाटील यांची भूमिका चर्चेत..!

धाराशिव (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील #वातावरण ढवळून निघाले आहे. #शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अंतर्गत कार्यरत असलेले युवासेना #धाराशिव #लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांच्या मातोश्रींना सभापतीपदाच्या शर्यतीतून डावलण्यात आल्याच्या चर्चेनंतर त्यांची नाराजी उघड होताना दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी आनंद पाटील यांच्या मातोश्रींचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, ऐनवेळी #स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात तणावाचे #वातावरण निर्माण झाले.

या पार्श्वभूमीवर, श्री शंभो महादेव यात्रेनिमित्त आयोजित ‘एकनाथ केसरी’ #बैलगाडा शर्यतीच्या बॅनर्सवरून काही प्रमुख नेत्यांचे फोटो वगळल्याचे समोर आले आहे. यामध्ये माजी #खासदार_रवींद्र_गायकवाड, शिवसेनेचे #उपनेते तथा माजी #आमदार ज्ञानराज #चौगुले आणि #जिल्हाप्रमुख मोहन पनूरे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे उमरगा-लोहारा परिसरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात राजकीय चर्चांना #उधाण आले असून, पक्षांतर्गत #मतभेद उघडकीस येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात या घडामोडींवर पक्ष नेतृत्वाची #भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#उमरगा #लोहारा #आकांक्षाचौगुले

Address

Osmanabad
413501

Telephone

+9595626210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tv7 marathi - टीव्ही सेव्हन मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share