29/08/2026
🥋🏆 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा गौरव सोहळा! 🏆🥊
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नांदेड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संस्थेचे तसेच आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि यशाचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
याच प्रसंगी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
खेळाडूंमध्ये क्रीडाभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि देशासाठी खेळण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
🏅 खेळाडूंच्या यशाला सलाम!
🥊 खेळाडू घडवूया, देश घडवूया!
🇮🇳 जय हिंद! जय क्रीडा!
शिहान प्रतिक ज. कारंडे
प्रशिक्षक आणि प्रसिद्धी प्रमुख
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया
अध्यक्ष थायबॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहर
९९३०२२३६६९