नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन

  • Home
  • India
  • Nashik
  • नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन, Sports, Chhatrapati Shivaji Maharaj Stadium, CBS, Nashik.

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
09/08/2026

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रबोधिनीच्या खेळाडूंचा शैक्षणिक प्रवास शिष्यवृत्ती परीक्षा ते पदवी पर्यंत.नुकताच ७ वी चा राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा आण...
29/07/2026

प्रबोधिनीच्या खेळाडूंचा शैक्षणिक प्रवास शिष्यवृत्ती परीक्षा ते पदवी पर्यंत.
नुकताच ७ वी चा राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल जाहीर झाला.
कुठचाही क्लास न लावता आमची राज्य स्तरीय खेळाडू राधिका काकडे हिने चौथी प्रमाणे ७ वी मध्ये सुद्धा परीक्षा पास होऊन शिष्यवृत्ती मिळवणारी
राधिका प्रबोधिनीची पहिली विद्यार्थी ठरली.
TYBA ची परीक्षा A ग्रेड मध्ये उत्तीर्ण होणारी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती वृषाली भोये ही प्रबोधिनीची पहिली पदवीधर खेळाडू ठरली.
राधिका नाशिक जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळा नाशिकची तर वृषाली लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी यांची विद्यार्थी आहे.
राधिका आणि वृषाली तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

25/07/2026

*महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहा निमित्त नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन च्या वतीने आज खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप*नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने स्व. सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीच्या खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्ताने सदर कार्यकामाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक मर्चंट बँकेचे संचालक , नाशिक म्हाडाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक महानगर अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्रसंगी नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व क्रीडा प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रदीप पवार यांनी केले आहे.
*कार्यक्रमाची वेळ*
शुक्रवार दिनांक 25/7/26
सायंकाळी 5.00 वाजता.
*स्थळ* :- स्व. सुरेखाताई भोसले खो-खो प्रबोधिनी,फावडे लेन रविवार पेठ, नाशिक

राष्ट्रीय खो खो पटू आणि त्यांचे पालक सन्मान सोहोळा.नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित स्व सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो ...
16/06/2026

राष्ट्रीय खो खो पटू आणि त्यांचे पालक सन्मान सोहोळा.
नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित स्व सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीने यंदा आठ वर्षे पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान सोहोळा महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री आ. माणिकराव कोकाटे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुनंदा पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खैरनार उपस्थित होते.

15/06/2026
14/06/2026
आभाळा इतक्या उंचीचा            देव माणूस जशी आपण मैदानाची मशागत करतो तशीच मनाची सुद्धा करायची असते. त्यासाठी सराव करण्या...
16/05/2026

आभाळा इतक्या उंचीचा
देव माणूस
जशी आपण मैदानाची मशागत करतो
तशीच मनाची सुद्धा करायची असते. त्यासाठी सराव करण्यापूर्वी अथवा सामन्यापूर्वी मनाचा वॉर्मिग अप नक्की कसा करायचा याची माहिती आनंदयात्री डॉ आनंद नाडकर्णी सर आमच्या प्रबोधिनीतील खेळाडूंना वर्षभर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी
देत असत.
We miss you Sir forever.

Address

Chhatrapati Shivaji Maharaj Stadium, CBS
Nashik

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category