Sagroli Sunrise Athlete

Sagroli Sunrise Athlete Sanskriti Samvardhan Mandal launched the project Sagroli Sunrise in 2005. Sagroli Sunrise is a caref

सगरोळी सनराईज प्रकल्पाच्या खेळाडूंचे टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये घवघवीत यश सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्पातील अभिषेक जाधव व उम...
20/01/2026

सगरोळी सनराईज प्रकल्पाच्या खेळाडूंचे टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये घवघवीत यश
सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्पातील अभिषेक जाधव व उमाकांत ठोंबरे या खेळाडूंनी टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा गौरव वाढवला आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
हाफ मॅरेथॉन (२१ किमी) प्रकारात अभिषेक जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १६३८ धावपटू मधून ६ वा क्रमांक पटकावला. तसेच 18 ते 24 वयोगटात २ क्रमांक मिळवून त्यांनी सगरोळी सनराईज प्रकल्पाचा नावलौकिक उंचावला. त्यांनी ही शर्यत 1 तास 13 मिनिटे 03 सेकंद या वेळेत पूर्ण केली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीचा त्यांचा वेळ 1:25:25 होता; यावर्षी त्यांनी तब्बल 12 मिनिटांची लक्षणीय सुधारणा नोंदवली आहे.
त्याचप्रमाणे उमाकांत ठोंबरे यांनीही हाफ मॅरेथॉनमध्ये 1 तास 24 मिनिटे 15 सेकंद असा वेळ नोंदवत 18 ते 24 वयोगटात 7 वा क्रमांक पटकावला. गेल्या वर्षीच्या 1:26:50 वेळेच्या तुलनेत त्यांनी यंदा 2 मिनिटांची सुधारणा साध्य केली आहे.
दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 मध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातील नामांकित धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी हाफ मॅरेथॉन प्रकारात सुमारे 16,000 पेक्षा अधिक (ऑन-ग्राउंड व व्हर्चुअल) धावपटू नोंदणीकृत होते, अशा अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात हे यश अधिक प्रेरणादायी ठरते.
या यशामागे खेळाडूंचा सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षक अभिजित मस्कार, भगवान नागरगोजे, ज्ञानेश्वर कोंडलाडे, तसेच एकलव्य क्रीडा अकादमीचे प्रमुख नंदूकिशोर जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि संस्था व्यवस्थापनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.
या सर्व खेळाडूंच्या प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐
तसेच या यशामागे योगदान देणाऱ्या सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक व संस्था व्यवस्थापनाचेही विशेष अभिनंदन 💐

सगरोळी सनराईज प्रकल्पाअंतर्गत क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड चाचणी – 28 व 29 जून रोजी आयोजनसंस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या ...
25/06/2025

सगरोळी सनराईज प्रकल्पाअंतर्गत क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड चाचणी – 28 व 29 जून रोजी आयोजन

संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या एकलव्य क्रीडा अकॅडमी अंतर्गत सुरू असलेल्या सगरोळी सनराईज प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. माफक दरात निवास व प्रशिक्षण इथे दिले जाते. यापूर्वी प्रकल्पातील अनेक खेळाडूंनी टाटा मुंबई मारेथोन स्पर्धेसह खेलो इंडिया सारख्या विविध राष्ट्रीय यश मिळवले आहे.

या प्रकल्पात धावणे – 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 3000 मीटर, 5000 मीटर, उड्या – लांब उडी, तिहेरी उडी, उंच उडी, तसेच फेक प्रकार – गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक अशा विविध क्रीडा प्रकारांत प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळते.

या क्रीडा उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळतो, तसेच शैक्षणिक गुणांमध्ये ५% पर्यंत सवलतही मिळते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला या क्षेत्रात प्रोत्साहित करावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

निवड चाचणीचे आयोजन 28 व 29 जून 2025 रोजी शारदा नगर, सगरोळी येथील सनराईज मैदानात करण्यात आले आहे. खेळात गती असलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*’खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स’ मध्ये ‘सगरोळी सनराईज प्रकल्पातील विष्णू लव्हाळेचा सहभाग : गुवाहटी येथे १० किमी धावणे स्...
25/02/2024

*’खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स’ मध्ये ‘सगरोळी सनराईज प्रकल्पातील विष्णू लव्हाळेचा सहभाग : गुवाहटी येथे १० किमी धावणे स्पर्धेत पटकाविले चतुर्थ स्थान*

गेल्या अनेक वर्षाची केलेली कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन याचे फळ आता सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्पातील विष्णूला मिळत आहे असे म्हणता येईल. विष्णू लव्हाळे याने गेल्या सहा महिन्यात तीन पेक्षा अधिक मॅरेथॉन स्पर्धेत विजय मिळवत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला. सोबत AFI राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने आपले स्थान निश्चित केले. तर आज गुवाहाटी, आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स मध्ये सगरोळी सनराईज विष्णू लव्हाळेचा सहभागी होत १० किमी धावणे स्पर्धेत पटकाविले चतुर्थ स्थान मिळविले.

त्याच्या या यशाबद्दल विष्णूसह त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि हा क्रीडा प्रकल्प राबविणाऱ्या संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेचे अभिनंदन.....!

*सगरोळी सनराईजचा विष्णू पुन्हा एकदा अव्वल : बालाघाट हील मॅरेथॉन, बीड प्रथम तर वैजाग नेव्ही मॅरेथॉन, विशाखापट्टनम मध्ये त...
05/11/2023

*सगरोळी सनराईजचा विष्णू पुन्हा एकदा अव्वल : बालाघाट हील मॅरेथॉन, बीड प्रथम तर वैजाग नेव्ही मॅरेथॉन, विशाखापट्टनम मध्ये तृतीय*

*लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती....* या पंक्ती सगरोळी सनराईज क्रिडा प्रकल्पातील खेळाडू विष्णू लव्हाले याला अगदी समर्पक आहेत. मागील महिन्यात नामांकित असलेल्या रिझवी - मुंबई द्वितीय, अमरावती येथे प्रथम तर या आठवड्यात झालेल्या बालाघाट हील मॅरेथॉन बीड, प्रथम आणि वैजाग नेव्ही मॅरेथॉन, विशाखापट्टणम तृतीय या चारही मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन विष्णूने विजय मिळवला.

एशियन गेम्स मध्ये भारतास पदक मिळवून देण्याची इर्षा ठेवून विष्णू गेल्या चार वर्षांपासून मेहनत घेत आहे. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी संस्था पाठीशी उभी राहून प्रशिक्षण, डाएट यासारख्या सुविधा उपलब्ध करून देत आहे.

टाटा मुंबई मॅरॅथॉन २०२० मध्ये १० किमी प्रथम, तर २०२३ मध्ये तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विष्णूने यावेळी टाटा मुंबई मॅरॅथॉन २०२४ मध्ये २१ किमी स्पर्धेत सहभाग घेण्याचे ठरवले आहे.

Athletic Federation of India आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सनराईजर्सची उज्ज्वल कामगिरीAFI आयोजित महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर...
05/10/2023

Athletic Federation of India आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सनराईजर्सची उज्ज्वल कामगिरी

AFI आयोजित महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर U/20 अथलेटिक्स स्पर्धेत सगरोळी सनराईज प्रकल्पातील वेदांत बनबाले आणि लक्ष्मण कुत्ताबाजे यांसह हदगाव मधील दोन धावपटूंनी नाशिक येथे झालेल्या राज्य मैदानी स्पर्धेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून सहभाग घेत 4 X 400 मी. रिले या क्रीडा प्रकारात रौप्य पदक संपादन केले.

Athletic federation of india

सगरोळी सनराईजर्स ची उज्ज्वल कामगिरी : मुंबई येथील रिझवी मॅरेथॉन मध्ये पटकाविला अव्वल क्रमांकसंस्थेच्या सगरोळी सनराईज प्र...
02/10/2023

सगरोळी सनराईजर्स ची उज्ज्वल कामगिरी : मुंबई येथील रिझवी मॅरेथॉन मध्ये पटकाविला अव्वल क्रमांक

संस्थेच्या सगरोळी सनराईज प्रकल्पातील खेळाडू छगन बोंबले आणि विष्णू लव्हाळे यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या साकिब रिझवी मेमोरिअल Cancer awareness Half Marathon मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत छगन बोंबले याने २१ की मी अंतर १ : १२ : ५४ एवढ्या विक्रमी वेळामध्ये पूर्ण करुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर विष्णू लव्हाळे यांनी १० की मी ३२ : ०५ या वेळात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या वतीने दोन्ही खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक श्री. ज्ञानेश्वर कोंडलाडे यांचे हार्दिक अभिनंदन!

*36 व्या राज्य स्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धेत सगरोळी सनराईज सहभागी : राज्यातील ५६ खेळाडूमध्ये प्रकल्पाचे तीन खेळाडू अंत...
29/08/2022

*36 व्या राज्य स्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धेत सगरोळी सनराईज सहभागी : राज्यातील ५६ खेळाडूमध्ये प्रकल्पाचे तीन खेळाडू अंतिम फेरीत क्रमवारीत अव्वल*

प्रिय दर्शनी पार्क, मुंबई येथे १९-२१ऑगस्ट दरम्यान झालेल्या ३६ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर मैदानी स्पर्धेत सगरोळी सनराईज प्रकल्पातील तीन खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील वेदांत बानबले याने २०० मी. व ४०० मी. धावणे प्रकारात विक्रमी वेळेची नोंद करून सहावा क्रमांक मिळविला. तर लक्ष्मण कुत्ताबाजे याने १०० मी. व २०० मी. धावणे प्रकारात सहावा क्रमांक मिळविला. गोविंद सोळुंके याने ८०० मी. धावणे प्रकारात पाचवा क्रमांक मिळविला. संपूर्ण महाराष्ट्रातील ५६ खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता.

ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता दाखवता यावी यासाठी सगरोळी सनराईज क्रीडा प्रकल्प २००५ पासून राबविला जातो. चाचणी घेऊन प्रतिवर्षी ५० खेळाडूंची निवड केली जाते. NIS प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली नियमित सरावाचे नियोजन केले जाते. निवास व योग्य पूरक आहारासह वैद्यकीय तपासण्या येथे केल्या जातात. आजपर्यंत या प्रकल्पातील अनेक खेळाडूंनी जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सहभाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये दोन वेळेस प्रथम क्रमांक मिळवून नाव मिळविले आहे.

सगरोळी सनराइज क्रीडा प्रकल्पातील लांब पल्ल्याचा खेळाडू विष्णू लव्हळे याने आज देगलूर येथे खासदार प्रतापराव पाटील वाढदिवसा...
02/08/2022

सगरोळी सनराइज क्रीडा प्रकल्पातील लांब पल्ल्याचा खेळाडू विष्णू लव्हळे याने आज देगलूर येथे खासदार प्रतापराव पाटील वाढदिवसानिमित्त झालेल्या मॅराथॉन स्पर्धेत १० की. मी. अंतर ३३.५० मी. एवढ्या विक्रमी वेळेत पार करून द्वितीय क्रमांक येण्याचा मान मिळविला.

विष्णु व प्रशिक्षक ज्ञानेश्वर कोंडलाडे यांचे क्रीडा विभागातर्फे हार्दिक अभिनंदन 💐💐👍🚩

Marathon Nike Run Club

Happy to Share
16/03/2022

Happy to Share

Nelson Mandela, former president of South Africa and Nobel Laureate, once said: "Sport has the power to change the world." A small village in Maharashtra bears testimony to Mandela’s statement.A school started by a philanthropist in Sagroli village in the Nanded district of Maharashtra is providin...

04/03/2022

RSCS Sainiki School Entrance Examination 2022-23 guidance for online registration

संस्थेच्या सैनिकी विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
04/03/2022

संस्थेच्या सैनिकी विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांत नेतृत्व गुण, साहसी क्रीडा, विज्ञान व स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेणारे बहुपरीचीत राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ प्रवेश पूर्व परीक्षा २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

प्रवेश पूर्व परीक्षेच्या Online Registration साठी www.ssmandal.net या संकेतस्थळाला भेट द्या अथवा खालील लिंक वर क्लिक करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZ1BQgRdRoVoCwnmG_ounuk6Imz6TSAOye-487ldBF5x6r2Q/viewform

Address

Sagroli
Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagroli Sunrise Athlete posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sagroli Sunrise Athlete:

Share

Category