18/09/2024
मुंबई उपनगर जिल्हास्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा जल्लोषात संपन्न
सायन येथे मुंबई उपनगर जिल्हास्तरीय पिंच्याक सिलॅट असोसिएशन च्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातील 135 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा रेग्यु, तुंगल, गंडा, फाईट व सोलो इत्यादी इव्हेंट मध्ये पार पढली. या स्पर्धेत ठाणे पिंच्याक सिलॅट असोसिएशन चे आंतरराष्ट्रीय खेळाडू रामचंद्र बदक, कृष्णा पांचाळ व सोमनाथ सोनवणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यंग मास्टर्स स्पोर्ट्स क्लब संघाने मिळवाला तसेच द्वितीय क्रमांक आर्ट डिफेन्स अकॅडमी संघा ने मिळवला व तृतीय क्रमांक राष्ट्रीय ज्युडो कराटे संघाने मिळवला. अशी मुंबई उपनगर जिल्हास्तरीय पिंच्याक सिलॅट असोसिएशन चे सचिव व आयोजक आकाश जाधव यांनी दिली. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुंबई उपनगर जिल्हास्तरीय पिंच्याक सिलॅट असोसिएशन चे अध्यक्ष श्री निलेश मस्करे, सचिव आकाश जाधव, खजिनदार कल्याणी देशमुख व स्पर्धा समन्वयक पंचशीला पगारे यांच्या उपस्थितीत पार पढला.
पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून (१) इंडिंग (फाईड) (२) तुगल (सिंगल रेगु (ग्रुप काता) काता) (३) रेगु (ग्रुप (४) गंडा (डेमो फाईट), (५) सीलो (इव्हेंट) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० हा या सखेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५ टक्के राखिव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संच, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिम्पिक कांउसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम, भारतीय विश्वविदयालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता.
जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळलेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. ही माहिती
निलेश मस्करे यांनी दिली.