03/04/2026
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र (HAM)
अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की,
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र चे महासचिव
आणि हॅण्डबॉल फेडरेशन इंडिया चे सहसचिव
श्री. रणधीर सिंग यांचे लाडके सुपुत्र श्री. शैलेन्द्र
यांचे ३ एप्रिल २०२६ रोजी एका दुर्दैवी अपघातांनंतर
अतिशय तरुण वयात निधन झाले.
एचएफआयच्या वतीने, महासचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा
यांनी व हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष अतुलजी सावे यांच्या वतीने
शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या असून,
हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याचे
सामर्थ्य व धैर्य मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
संपूर्ण हॅण्डबॉल विश्व या दुःखद प्रसंगी कुटुंबासोबत
खंबीरपणे उभे आहे.
दिवंगत आत्म्यास शांती लाभो.
शोकाकुल
हॅण्डबॉल फेडरेशन ऑफ इंडिया
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र