11/12/2025
वानखेडेचा सुवर्ण महोत्सव असो वा ISPL पर्व तीन मधील खेळाडूंचा लिलाव. एक उंचपुरा इसम प्रसन्न मुद्रेत आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसतो. तो म्हणजे आमचा प्रस्सन दादा. एक भारदस्त आवाज आणि समोरच्यांना जागेवर खिळवून ठेवणे हि त्याची लकब.
चेंडू थेट वावराच्या बाहेर... अगदी मराठीतला साज अन नजाकत समलोचन करत IPL मध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा.... ISPL च्या तिसऱ्या पर्वातील लिलाव बेधडक अन देधडक यशस्वी करत आपली एक वेगळी छाप पाडणारा... बडे मिया तो बडे मिया... छोटे मिया देखील आपल्या दादूसच्या पावलांवर पाऊल ठेवणारा अर्थातच चैतन्य संत
संत बंधू आणि नॉर्थ स्टॅन्ड गँग अगदी जवळच भावनिक नात. अगदी प्रसन्नच्या भाषेत बोलायच तर हार्ट बिट ऑफ नॉर्थ स्टॅन्ड गँग. तुमची कौतुकाची थाप नेहमीच आमच्या पाठीशी असते. काल तुम्हा दोघा बंधूना बघून
आमच मन प्रसन्न झाल आणि मनात एक वेगळंच चैतन्य निर्माण झाल. असेच मस्त हसत खेळत रहा. लब यु बोथ ❤️
लेखन ✍️: