26/07/2025
*आनंददायी शनिवार*
डॉ. बी. एन. पुरंदरे बहुविध विद्यालय, लोणावळा व शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना क्लाइंबिंग या धाडसी खेळाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने लोणावळा नगरपालिकेच्या प्रियदर्शनी हॉल येथे शिवदुर्ग मित्र मंडळ व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेल्या प्रशिक्षण हॉलमध्ये विद्यार्थ्यांचे कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गावडे सर तसेच शिवदुर्ग मित्र मंडळ मध्ये कार्यरत प्रशिक्षक श्री योगेश सर आणि श्री रोहित वर्तक सर तसेच विद्यालयाची माझी विद्यार्थिनी व क्लाइंबिंग नॅशनल चॅम्पियन खेळाडू कुमारी श्रुती शिंदे व त्यांचे सहकारी यांनी क्लाइंबिंग या धाडसी खेळाविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी क्लाइंबिंग वॉल वरती उपस्थित विद्यार्थ्यांना क्लाइंबिंग चे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच क्लाइंबिंग करण्याचा अनुभव घेतला व अनेक विद्यार्थ्यांनी नियमित प्रशिक्षणाची इच्छा बोलून दाखवली.
शिवदुर्ग मित्र मंडळ यांच्यामार्फत दररोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत मोफत क्लाइंबिंग प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे समजल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणास येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.