Discover Sahyadree / डिस्कवर सह्याद्री

  • Home
  • India
  • Lonavala
  • Discover Sahyadree / डिस्कवर सह्याद्री

Discover Sahyadree / डिस्कवर सह्याद्री Discover Sahyadree Is A Pune Based Adventure Sports/ Travel / Activity Organiser.

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
19/02/2024

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.

शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!

तिकोना किल्लापंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून ज...
18/12/2023

तिकोना किल्ला
पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती.

रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.लिंगाणा हा ...
14/12/2023

रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती या गोष्टी त्यासाठी अतिशय अनुकूल आहेत.

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.

Appreciate👍 this Creator for this amazing Photo

साल्हेर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील साल्हेर गावाजवळ असलेले एक ठिकाण आहे. साल्हेरचे जुने नाव गव...
12/12/2023

साल्हेर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील साल्हेर गावाजवळ असलेले एक ठिकाण आहे. साल्हेरचे जुने नाव गवळगढ होते. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात उंच किल्ल्याचे ठिकाण आहे आणि महाराष्ट्रातील कळसूबाई नंतरचे १५५७ मीटर (५१४१ फूट) दुसरे सर्वोच्च शिखर आणि पश्चिम घाटातील ३२ वे सर्वोच्च शिखर आहे. हा मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक होता. सुरतेवर छापा टाकून मिळवलेले पैसे मराठ्यांच्या राजधानीच्या किल्ल्यांकडे जाताना प्रथम या किल्ल्यावर आणले गेले.

The festival of lights brings happiness and positivity. May the Goddess shower you with everything you need on this ausp...
09/11/2023

The festival of lights brings happiness and positivity. May the Goddess shower you with everything you need on this auspicious day. Happy Diwali! 🪔💥🥮

Address

Lonavala
410401

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 3pm

Telephone

+918390476100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Discover Sahyadree / डिस्कवर सह्याद्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Discover Sahyadree / डिस्कवर सह्याद्री:

Shortcuts

Share