शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर हिंदवी स्वराजाचे संस्थापक व मराठी सा?

🚩शिवगर्जना आखाड्याची उत्तुंग कामगिरी 🚩🚩सण दिवाळीचा ,अभिमान शिवरायांचा|🚩 या अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या ...
12/05/2026

🚩शिवगर्जना आखाड्याची उत्तुंग कामगिरी 🚩
🚩सण दिवाळीचा ,अभिमान शिवरायांचा|🚩
या अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या माध्यमातून युनेस्को अंतर्गत येणाऱ्या 12 किल्ल्यांचा समावेश असलेला किल्ल्यांच्या प्रतिकृती स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था यांनी सहभाग नोंदवत सिंधुदुर्ग या किल्ल्याची उबेहूब प्रतिकृती साकारली.
किल्ला बांधणीचे महत्त्व तटबंदी, मुख्य दरवाजे, जंग्या, चोर दरवाजे, बुरुज, मंदिर, विहिरी, पाण्याच्या टाक्या कशा असाव्यात या स्थापत्य शास्त्राचा अभिमान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला .या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांचा हाताचा व पायाचा ठसा किल्ला बांधणीच्या वेळेस चुन्यामध्ये उमटवलेला आहे. मोरयाचा धोंडा येथे केलेले पाया पूजन सर्वकाही हुबेहूब शिवगर्जनाचा रणरागिनी आणि मावळ्याने साकारले.तसेच परीक्षकांना गडाची इथ्यभूत माहिती दिली आणि याचाच परिणाम म्हणजे आज या गड प्रतिकृतीस वेगवेगळ्या स्पर्धात तीन बक्षीस मिळाली.
त्यापैकी भाजपा कोल्हापूर यांनी तृतीय क्रमांकाचे सन्मान चिन्ह रोख 25,000 रुपये असे मानाचे बक्षीस देऊन शिवगर्जनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
सर्व रणरागिनी आणि मावळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असेच शिवगर्जनाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
🚩 आपली शिवगर्जना, आपली जबाबदारी🚩

उन्हाळी शिबिर 2026 आजच नोंदणी करा
24/04/2026

उन्हाळी शिबिर 2026

आजच नोंदणी करा

10/04/2026

Send a message to learn more

⚔️🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे युवानेते मृत्युंजय संजय गा...
17/02/2026

⚔️🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न 🚩⚔️

बुलढाणा, दि. १६/०२/२०२६ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कोल्हापूर येथील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे संचालक श्री संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या प्रदर्शनीत शिवकालीन विविध शस्त्रांचे आकर्षक व ऐतिहासिक दर्शन घडविण्यात आले. स्वराज्य स्थापनेच्या काळातील शौर्य, पराक्रम व रणनितीची साक्ष देणारी तलवारी, भाले, ढाली व अन्य शस्त्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
या प्रदर्शनीचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व शौर्याचा गौरव करत युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद सभापती, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवकालीन इतिहासाचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जय शिवराय! 🚩

06/11/2025
🚩 🚩शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आयोजित किल्ले सिंधुदुर्ग प्रतिकृती उदघाटन व दीपावली उत्सव पारंपारिक वेशात...
23/10/2025

🚩 🚩शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आयोजित किल्ले सिंधुदुर्ग प्रतिकृती उदघाटन व दीपावली उत्सव पारंपारिक वेशात साजरा करण्याचा आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. सुजितभाऊ चव्हाण (अध्यक्ष श्री शिवाजी तरुण मंडळ, शिवसेना जिल्हाप्रमुख)
श्री. अजिंक्य चव्हाण (मा. नगरसेवक, मा.स्थायी समिती सभापती)
श्री. किरण पवार (अध्यक्ष वाघाची)
श्री. विजयसिंह खाडे पाटील
श्री. दिलीप कदम सर (मास्टर श्री)
श्री. बबनराव मुसळे
श्री. मनोज नलवडे
श्री. संजय पाटील
श्री. जयदीप सर्वदे
सौ ऐश्वर्या देसाई
यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

तसेच इंग्रजी विषयात पी.एच.डी मिळवल्याबद्दल सौ हेमलता मुसळे, खाटीक समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ .सुनिता ताई घोडके व श्री दिलीप कदम सर यांचा सत्कार करण्यात आला. ततप्रसंगी आखाड्याचे अध्यक्ष श्री.नाना सावंत यांनी प्रास्ताविक पर भाषणात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास कथन केला. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी राजेश पाटील, सागर लोहार ,राहुल भोसले, अजय सांगडे, अतुल निंबाळकर, शुभम सनगर, युवराज टाक, मल्हार सावंत ,पूजा पाटील ,अवधूत लोहार ,पूर्वा भोसले ,ईश्वरी भोसले, जानवी लोहार, आर्यन कामते, दर्श सावंत ,अर्जुन वाडेकर, यश गवळी, प्रतीक दिवटे ,परी लोहार यांनी कष्ट घेतले.

प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था 21 वा वर्धापन दिन व गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पारंपारिक भजन गायन स्पर्धा, फेटा बांधणे...
19/08/2025

प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था 21 वा वर्धापन दिन व गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पारंपारिक भजन गायन स्पर्धा, फेटा बांधणे स्पर्धा ,श्लोक पठण स्पर्धा ,तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची व डोळे बांधून मडके फोडणे स्पर्धा पडली.स्पर्धेतील विजय खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत मनोळे. संजय पाटील, बबनराव मुसळे, शिवाजीराव घाटगे ,अरुणराव साळुंखे, अमर नकाते, जयराज निंबाळकर सरकार, अंजली जाधव, अमर चौगुले,सचिन वाकरेकर,धनाजी कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
🚩फेटा बांधणी स्पर्धा🚩
1. स्वानंद गंधवाले
2. शुभम सनगर
3. गौरव कुंभार
4. युवराज टाक

🚩संगीत भजन गायन स्पर्धा
1.रोहिणी मेथे
2.कांचन काटवे/ शितल पाटील
3.मृणाल फडणीस/संध्या कटके( विभागून)
4.धनश्री पोवार

🚩श्लोक पठण स्पर्धा
1.ओंकार पोळ
2.अवनीश मोरे /जान्हवी लोहार
3.ईश्वरी भोसले/ ईरा पोवार
4.पूर्वा भोसले.
महिलांसाठी घेण्यात आलेल्या खेळांमध्ये श्रुती भोसले, धरती लोहार ,राधिका भोसले ,अंजली पोफळे यांनी यश मिळवले. तर बालचमूंनी दहीहंडी उत्साहात फोडली.
स्पर्धेचे परीक्षण गुरुवर्य अंजनाताई कुलकर्णी, श्वेताताई बोरकर व बबनराव मुसळे यांनी केले
कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नाना सावंत ,राजेश पाटील, सागर लोहार, राहुल भोसले अतुल निंबाळकर, रवींद्र सावंत, अमित मोरे ,प्रशांत भोसले, शुभम सनगर ,युवराज टाक, मल्हार सावंत, पूर्वा भोसले, ईश्वरी भोसले ,स्वानंद गंधेवाले, अर्जुन वाडकर ,वृंदा सावंत, जानवी लोहार, दर्श सावंत, मंजिरी लाड ,परी लोहार, शर्वरी बिजगरकर ,यश गवळी ,पांडुरंग जाधव, अजय सांगडे, धरती लोहार, अनिता सावंत, मानसी सावंत यांनी सहकार्य केले

शिवगर्जना प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्था व शिवगर्जना महिला भजनी मंडळ जरग नगर यांच्या विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या औचित...
13/07/2025

शिवगर्जना प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्था व शिवगर्जना महिला भजनी मंडळ जरग नगर यांच्या विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून परिसरातील महिला व मुलींसाठी फेटा बांधणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्तुंग प्रतिसाद देत 100 महिलांनी सहभाग नोंदवला शिबिरासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून शुभम सनगर ,ईश्वरी भोसले, जान्हवी लोहार, स्वानंद गंदवाले, युवराज टाक, पूर्वा भोसले,मल्हार सावंत यांनी कार्य पाहिले.
शिबिराची सुरुवात एडवोकेट सविता कर्णिक, संगीत गुरुवर्य श्वेता बोरकर, आध्यात्मिक गुरुवर्य अंजनाताई कुलकर्णी , महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष सौ अनिता सावंत व ऐश्वर्या देसाई यांच्या शुभहस्ते शिवप्रतिनेशी पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री नाना सावंत, राजेश पाटील, सागर लोहार, राहुल भोसले, अजय सांगडे, यश गवळी ,अतुल निंबाळकर, पूजा पाटील ,मयूर जरग, मानसी सावंत, स्नेहल कदम, वृंदा सावंत यांनी केले.

वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्विसेस या सामाजिक व सेवाभावी संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील समाजपयोगी कार्याबद्दल कार्यतत्पर व्...
22/05/2025

वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्विसेस या सामाजिक व सेवाभावी संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील समाजपयोगी कार्याबद्दल कार्यतत्पर व्यक्तिमत्वांना अधिक स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी या उद्देशाने पुरस्कार नामांकन केले जाते चालू वर्षाच्या शिवकालीन युद्धकला व इतिहास पर कार्याबद्दल "कर्तुत्वान धर्मसेवा पुरस्कार 2025"हा राज्यस्तरीय पुरस्कार आपल्या शिवगर्जना आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप उर्फ नाना सावंत यांना सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. नाना सरांच्या कार्याला कर्तुत्वाला सलाम.
मनःपूर्वक अभिनंदन सर

12/05/2025

शिबिराच्या प्रारंभी सुभाषराव घोलकर यांनी दिलेले स्वागतपर भाषण उपस्थितांना प्रेरणा देणारे ठरले.

04/05/2025

उन्हाळी शिबिराचा पहिला दिवस | थरारक लाईव्ह डेमो – जूडो, थांग-टा, रायफल शूटिंग!

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share