Rashtrakul Kusti Sankul

Rashtrakul Kusti Sankul to serve wrestling and sports in India

17/12/2023
*निवासी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*स्थळ: राष्ट्रकुल कुस्ती संकुल कोल्हापूरशिबिर कालावधी: 1 ते 25 मे 2023   ...
27/04/2023

*निवासी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

स्थळ: राष्ट्रकुल कुस्ती संकुल कोल्हापूर

शिबिर कालावधी: 1 ते 25 मे 2023

अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणारी तालीम म्हणून संपुर्ण देशभर ओळख असणाऱ्या राष्ट्रकुल कुस्ती संकुल कोल्हापूर येथे निवासी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती शिबिराद्वारे नवोदित व होतकरू मुलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे व त्यांना आधुनिक कुस्तीची माहिती मिळावी यासाठी सदर शिबिर वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

*प्रशिक्षण शिबिराची वैशिष्ट्ये*👉🏾
▫️ आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅट
▫️ नामांकित तज्ञांचे कुस्ती विषयी मार्गदर्शन.
▫️ सकस आहार तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था.
▫️ व्यायामासाठी प्रशस्त ग्राउंड व उत्कृष्ट मार्गदर्शन.

*शिबिर शुल्क:*
⭕ 14 वर्षा खालील मुले: 6000/-
⭕ 14 वर्षा वरील मुले: 7500/-
⭕सर्व वयोगटतील मुलींच्या करीता: 6000/-

*अधिक माहितीसाठी संपर्क*👉🏾
9422044320/
9594995065

अधिक माहितीसाठी WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏾https://chat.whatsapp.com/HylIOW4xo8dG1MgPRgi6Pq

29/01/2022

खराडी येथील ऐतिहासिक कुस्ती मैदानात राम सारंग सर यांचा चांदीची गदा देऊन गौरव.

१९८२ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारे कोल्हापूरचे सुपूत्र पैलवान राम सारंग सर यांचा खराडी येथील कुस्ती मैदानात चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. कुस्तीतील दानशूर कर्ण अर्थात आदरणीय पंढरीनाथ पठारे आण्णा यांच्या ७४ व्या वाढदिवसा निमित्ताने चंदननगर खराडी, पुणे येथे ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडले. या मैदानात राज्यातील महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्या अनेक मल्लांचा सन्मान करण्यात आला पण पठारे अण्णांनी राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिकूल परिस्थितीत पदक मिळवून देणारे पैलवान रघुनाथ पवार , राहुल आवारे व राम सारंग सर यांचा प्रत्येकी दोन किलो चांदीची गदा व रोख ३१ हजार रुपये देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

राम सारंग सर यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले नंतर कुस्ती पंढरी कोल्हापूर येथे गेल्या चार दशकापासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पैलवान घडवण्याचे काम केले आहे. आजही ग्रामीण भागातील कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी सारंग सर नेहमी प्रयत्न करत करत असतात. पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर शहरात सारंग सरांनी लोक वर्गणीतून राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभा केले असून भविष्यात चांगले खेळाडू इथल्या मातीत तयार व्हावे यासाठी आजही दिवसरात्र मुलांना कुस्ती प्रशिक्षण देण्याचे काम आहेत. पैलवान पंढरीनाथ अण्णांनी कुस्तीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या एका तपस्वी व्यक्तीचा सन्मान केले बद्दल कुस्ती शौकीन वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

धन्यवाद
*कुस्ती हेच जीवन सोशल मीडिया टीम.*

Champions 🏆
18/01/2022

Champions 🏆

Address

Rashtrakul Kusti Sankul More Mane Nagar
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 5am - 11am
3pm - 9pm
Tuesday 5am - 11am
3pm - 9pm
Wednesday 5am - 11am
3pm - 9pm
Thursday 5am - 11am
3pm - 9pm
Friday 5am - 11am
3pm - 9pm

Telephone

+917020626726

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtrakul Kusti Sankul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rashtrakul Kusti Sankul:

Share

Category