01/02/2024
**12 वर्ष्या नंतर शेवट आज स्वप्न पूर्ती झाली शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णा पदक प्राप्त झाले**
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ झारखंड यांच्या माध्यमातून 67 वी राष्ट्रीय वुशू स्पर्धा दिनांक 23 ते 28 जानेवारी 2024 रोजी रांची झारखंड येथे झाले शालेय राष्ट्रीय वूशू स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 28 राज्यातील विविध शिक्षण संस्थामधून अनेक खेळाडूंची निवड झाली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व अकॅडमिक हाय अँड ज्युनिअर कॉलेज कुंडलच्या कु.मयुरी शरद वाईंगडे हिने केले. 65 किलो वजन गटांमध्ये तिने अतिशय उत्कृष्टपणे खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक🥇 प्राप्त केले.
कोणताही खेळ खेळताना त्या खेळाप्रती असणारी निष्ठा, उत्कृष्ट मार्गदर्शन व अफाट मेहनत या सर्वांच्या मिलाफाने यशाची उंच शिखरे पादाक्रांत करता येतात हे या विद्यार्थिनीने आपल्या यशातून दाखवून दिले. या खेळाडूंनी अतिशय झोकून देऊन केलेला सराव, प्रचंड आत्मविश्वास व तितकीच घेतलेली मेहनत याचेच हे फलित. वूशू स्पर्धेत मिळालेले यश हे संस्थेच्या शिरपेचात खोवलेले सुवर्णपीस आहे. संस्थेसाठी व आपल्या महाराष्ट्रातसाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक ऍड प्रशांत पवार सर यांनी केले. संस्थेचे मार्गदर्शक सत्यविजय बँकेचे अध्यक्ष श्री.प्रकाशराव पवार, व्यवस्थापक सौं.सुप्रिया पवार, सचिव मा. श्री. बाबासाहेब पवार,प्राचार्या सौं.नमिता गावडे मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक गणेश यादव सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.