Laxmi-Vaibhav Gas Agency

Laxmi-Vaibhav Gas Agency Laxmi-Vaibhav Gas Agency, is a Bharatgas distributor in Karmala taluka since 1988. For us Business about earning trust.

भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या  आणि त्यासाठी कठोर यातना सहन करणाऱ्या प्रत्येक देशभक्तां व...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि त्यासाठी कठोर यातना सहन करणाऱ्या प्रत्येक देशभक्तां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!

आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत, त्यामागे पिढ्यानपिढ्यांचे बलिदान, संघर्ष आणि तपश्चर्या आहे.
राष्ट्रोदयासाठी शतकानुशतके गाळलेल्या घामाची, अश्रूंची आणि सांडलेल्या रक्ताची जाणीव भावी पिढ्यांच्या मनात जागी राहिली पाहिजे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन! आणि सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
*जय हिंद*🇳🇪🇳🇪
#करमाळा #जेऊर

सुप्रभात 🙏🏻🙏🏻गॅस ग्राहकांना घरपोच सिलेंडर (PDI ) चेक करून,पावती, वजन व गळती तपासून देताना लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी चे डिल...
23/07/2026

सुप्रभात 🙏🏻🙏🏻
गॅस ग्राहकांना घरपोच सिलेंडर (PDI ) चेक करून,पावती, वजन व गळती तपासून देताना लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी चे डिलिव्हरी स्टाफ...👏🏻

पायी दिंडी सोहळा 2026.❤️..करमाळा नगरी येथे सर्व भाविक वारकरी विठ्ठल भक्तांचे सहर्ष स्वागत...पाऊस आणि वारकरी.पावसाच्या पह...
17/07/2026

पायी दिंडी सोहळा 2026.❤️..
करमाळा नगरी येथे सर्व भाविक वारकरी विठ्ठल भक्तांचे सहर्ष स्वागत...
पाऊस आणि वारकरी.
पावसाच्या पहिल्या सरी पडल्या की अनेकजण आसरा शोधतात…
पण एक असा समाज आहे, जो पावसापासून पळत नाही, तर त्या प्रत्येक थेंबात विठ्ठलाचा आशीर्वाद शोधतो.
ओल्या मातीचा सुगंध, चिखलाने भरलेले रस्ते, अंगावर कोसळणारा मुसळधार पाऊस… तरीही त्यांच्या पावलांचा वेग कमी होत नाही. कारण त्यांचं ध्येय फक्त एकच असतं—पंढरीचा विठुराया!
आभाळ दाटून येतं, विजा कडाडतात, पावसाच्या सरी कोसळतात,
पण वारकऱ्यांच्या पावलांना कधीच अडवू शकत नाहीत.
कारण त्यांच्या पायात ताकद नसते, तर ताकद असते विठ्ठलावरील अढळ श्रद्धेची.
कोणाच्या डोक्यावर छत्री नसते,
कोणाच्या अंगावर पूर्ण भिजलेले कपडे असतात,
चिखलाने भरलेले रस्ते, थकलेले पाय…
तरीही ओठांवर एकच गजर घुमत राहतो—
"राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!"
त्यांचा हा प्रवास विना सायास पूर्ण व्हावा यासाठी
सर्व भक्तांना सिलेंडर चेक करून देताना लक्ष्मी वैभव परिवार... येथील काही क्षणचित्रे
पायी दिंडी सोहळा 2026❤️
#करमाळा #जेऊर

     #करमाळा  #जेऊर
13/07/2026

#करमाळा #जेऊर

नमस्कार सुप्रभात. जून महिन्यासाठी गॅस सिलेंडरचा दर आहे 956 रुपये. ग्राहकांनी सिलेंडर घेताना पावती वजन व गळती तपासून घेणे...
17/06/2026

नमस्कार सुप्रभात.
जून महिन्यासाठी गॅस सिलेंडरचा दर आहे 956 रुपये.
ग्राहकांनी सिलेंडर घेताना पावती वजन व गळती तपासून घेणे.
गॅस ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर PDI (pri- delivery inspection ) करून देताना लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी चे डिलिव्हरी स्टाफ.

🚩 ६ जून – शिवराज्याभिषेक दिन 🚩हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, रयतेचे राजे, धर्मरक्षक आणि आदर्श शासक छत्रपती शिवा...
06/06/2026

🚩 ६ जून – शिवराज्याभिषेक दिन 🚩
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, रयतेचे राजे, धर्मरक्षक आणि आदर्श शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगडावर संपन्न झाला. हा दिवस केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.
स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या महान युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम! 🙏
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, न्याय, शौर्य आणि स्वाभिमानाची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवूया.
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩 🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
#करमाळा #जेऊर

ज्यांच्या खांद्यावर राज्याचा आणि देशाचा डोलारा उभा आहे, त्या सर्व कष्टकऱ्यांच्या जिद्दीला आणि श्रमाला सलाम. महाराष्ट्र द...
01/05/2026

ज्यांच्या खांद्यावर राज्याचा आणि देशाचा डोलारा उभा आहे, त्या सर्व कष्टकऱ्यांच्या जिद्दीला आणि श्रमाला सलाम. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
# महाराष्ट्र दिन #करमाळा #जेऊर

भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस वितरणासाठी  नवीन नियम लागू  बुकिंग, ऑनलाइन पेमेंट व OTP प्रणाली अनिवार्य
20/04/2026

भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस वितरणासाठी नवीन नियम लागू बुकिंग, ऑनलाइन पेमेंट व OTP प्रणाली अनिवार्य

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील भारत गॅस एजन्सीमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वि......

*ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन.......*आजचा दिवस केवळ जयंती नाही, तर संघर्ष, स्वाभिमान आणि समानतेच्या लढ्याची आठ...
14/04/2026

*ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन.......*

आजचा दिवस केवळ जयंती नाही, तर संघर्ष, स्वाभिमान आणि समानतेच्या लढ्याची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. 💙
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी समर्पित केला.
अज्ञान, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी उभा केलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो.
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा त्यांचा संदेश प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीप आहे.
त्यांनी दिलेलं भारतीय संविधान आपल्याला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवतं.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त त्यांना अभिवादन न करता, त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवण्याचा संकल्प करूया.
समाजात प्रेम, बंधुता आणि समता निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकूया.
🙏 विनम्र अभिवादन!

*जय भीम! जय संविधान!जय भारत!!!*
#करमाळा #जेऊर

शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.. असा मुलमंत्र देणारे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे ...
13/04/2026

शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.. असा मुलमंत्र देणारे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून लक्ष्मी वैभव परिवारा कडुन..डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, करमाळा. याठिकाणी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल या सारख्या शालेय पूरक अश्या शैक्षणिक साहित्याचे व खाऊ चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवर, शाळेतील शिक्षक वृंद व लक्ष्मी वैभव मधील सदस्य यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ. रोहन पाटील सर व वैभव शेंडे साहेब या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले . मुलांनी या शालेय वयामध्ये खेळाबरोबरच.. बौद्धिक कष्ट करावेत म्हणजे भविष्यात जास्त शारीरिक कष्ट करण्याची गरज भासणार नाही.
बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा व एक सुधारित व समतावादी भारत घडविण्याचा संकल्प या जयंतीच्या अनुषंघाने करावा. असे आवाहन विद्यार्थ्याना करण्यात आले..मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले.त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे...
#करमाळा #जेऊर

Address

Jamkhed Road
Karmala
413203

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912182220450

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi-Vaibhav Gas Agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Laxmi-Vaibhav Gas Agency:

Shortcuts

Share