09/11/2025
*PCOD ची कारणे आणि उपाय...*
*१) हार्मोन्स चे असंतुलन -* Estrogen, Testosterone, Insulin हे हार्मोन्स यासाठी जबाबदार असतात.
*२) तणाव -* Cortisol हार्मोन यासाठी जबाबदार असतात.
*३) आहार पद्धती -* चुकीची आहार पद्धती ज्यामध्ये जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, जास्त गोड खाणे व खाण्यामध्ये फायबर व प्रोटीन चे अल्प प्रमाण.
*४) झोप-* आपणास रोज ७-८ तास झोप झाली पाहिजे ते ही योग्य वेळी.
*५) शारीरिक हालचाली -* थोडी थोडी का होईना परंतु शरीराची हालचाल झाली पाहिजे. चालणे, धावणे, योगा इ. साठी वेळ द्यायला हवा.
*६) अनुवंशिकता -* हे असण्याची शक्यता फार कमी असते परंतु यामुळे ही होऊ शकते.
*PCOD चे परिणाम*
१) वजन वाढते
२) Infertility - गर्भधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो.
३) Type 2 Diabetes - इन्सुलिन रजिस्टन्समुळे डायबिटीस होण्याची शक्यता वाढते.
४) थायरॉईड - PCOD नंतर थायरॉईड होण्याची शक्यता वाढते.
५) डिप्रेशन, चिडचिडपणा यामध्ये वाढ होते.
६) झोपे संदर्भात तक्रारी वाढतात.
७) गर्भाशयाचा कर्करोग होण्याची संभावना वाढते.
८) केस गळती वाढते.
९) मासिक पाळी अनियमित होते.
१०) शारीरिक थकवा जाणवतो व चेहऱ्यावर पुरळ उठतात तसेच शरीरावर नको तिथे पुरुषांसारखे केस उगवतात.
*PCOD पासून सुटका कशी होऊ शकते*
हे दोन प्रकारे होऊ शकते.
एक म्हणजे वैद्यकीय मदत घेऊन व
दुसरी म्हणजे जीवनशैली बदलणे ज्यामुळे आपणास कायम स्वरुपी इलाज मिळू शकतो.
यासाठी काय करावे 👇🏻
*१) आहार:-* आपल्या आहारामध्ये बदल करा शक्य तेवढे पौष्टिक खाणे निवडा.
२) Chromium, Amino acids, Protein असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा.
३) Low Glycemic index असलेल्या अन्नाचा समावेश करा.
४) जंक फूड, फास्ट फूड टाळा.
५) योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी.
६) हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करा.
७) तान तणावावर नियंत्रण मिळवायला शिका.
८) आपली रोज ७-८ तास झोप पूर्ण होते का ते पहा.
९) TV, Mobile चा स्क्रिन टाईम कमी करा.
१०) आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे.
*PCOD पासून सुटका हवी असेल तर जीवनशैली बदलने हा एकमेव उपाय आहे*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:-
जीवनशैली सल्लागार दिपक सर
092845 18892