30/12/2018
स्वच्छता जनजागृती अभियान ठाणे जिल्हा सायकल रॅली
मुंबई विद्यापीठ व राष्ट्रीय सेवायोजना यांचा उपक्रम
टिटवाळा:- सध्या संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. याच धर्तीवर मुंबई विद्यापीठ व राष्ट्रीय सेवायोजना यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी स्वच्छाता अभियान जन जागृती सायकल रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीचे खडवली येथील जीकेएस काॅलेजच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
देशात सुरू असणार्या भारत स्वच्छता अभियानाचे सर्वच स्थरातून चागंल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधीजी यांच्या जन्माला 150 वर्षे झाली या निमित्ताने आणि आपणही याचा एक भाग बनावे हा सुप्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवायोजना यांच्या विद्यामाने शनिवारी स्वच्छाता अभियान जन जागृती सायकल रॅली काढण्यात आली आहे. विठ्ठल वाडी येथील वेदांत विद्यालयातून सुरूवात झाली. या रॅलीत 30 महाविद्यालयातील 27 विद्यार्थ्यी व 3 विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत.प्रा. बाबासाहेब बिडवे मुम्बई यूनिवर्सिटी NSS विभाग प्रमुख प्रशांत सवाडेकर जिल्हा प्रभारी हे देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत. आपल्या देशात आजही अस्वच्छा आहे ती कमी झाली पाहीजे. प्लास्टिकचा वापर व उपयोग कमी होणे गरजेचे आहे. आज आपण जो कचरा टाकतो त्याचे विघटन देखील करणे गरजेचे आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर झाला पाहीजे. हाच संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी येथील वेदांत विद्यालयातून या रॅलीला सुरूवात झाली. दुपारी सरद रॅली खडवली येथे पोहचली असता या रॅलीचे येथील जीकेएस महाविद्यालयाने अतिशय चागंल्या प्रकारे रॅलीचे स्वागत केले. या ठिकाणी या रॅलीने स्वच्छता देखील केली. जीकेएस महाविद्यालयाच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती. या नंतर ही रॅली वासिंद, शहापूर, किन्हवली, सरळगांव, मुरबाड, म्हसा, बराडपाडा, बदलापुर व उल्हासनगर असा प्रवास करत 31 तारखेला येथील एस एस महाविद्यालय अंबरनाथ येथे होणार आहे.
या रॅलीत जागोजागी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच यावेळी गांधीजीची फिल्म देखील आम्ही विसाव्याच्या ठिकाणी दाखविणार आहोत. लहान मुलांसाठी गांधी परिक्षा देखील घेणार आहोत. तीन दिवसीय या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी या रॅलीचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येत असून सर्वच स्थरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मत लोकमतशी बोलताना रॅली व्यवस्थापक व मुंबई विद्यापीठ एन एस एस विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब बिडवे यांनी व्यक्त केले.