शिवसेना तालुका प्रमुख मुक्ताईनगर

  • Home
  • India
  • Jalgaon
  • शिवसेना तालुका प्रमुख मुक्ताईनगर

शिवसेना तालुका प्रमुख मुक्ताईनगर शिवसेना तालुका प्रमुख मुक्ताईनगर

03/09/2023

'मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महत्वपूर्ण बैठक..

'आपल्या सर्वांचे लाडके मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे वाढदिवसानिमित्त बैठक आयोजित केली आहे.तरी समस्त शिवसेना
पदाधिकारी, महिला आघाडी, सर्व शाखा प्रमुख, शिवसैनिक ,युवासेना सैनिकांनी बैठकीला हजर राहावे ही विनंती.


दिनांक - ०४/०९/२०२३
वेळ-दुपारी ठीक ०४:०० वा.
ठिकाण- मंगलम रेसिडेन्सी जवळ

_मा.श्री.छोटू भाऊ भोई
(शिवसेना तालुकाप्रमुख मुक्ताईनगर)

आज शिवसेना तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई यांच्या उपस्थितीत कु-हा वडोदा जि. प. गटाची मीटिंग झाली या मीटिंग मध्ये विविध विषयां...
24/06/2021

आज शिवसेना तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई यांच्या उपस्थितीत कु-हा वडोदा जि. प. गटाची मीटिंग झाली या मीटिंग मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली व या वेळी छोटुभाऊ, उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल, गट प्रमुख विनोद पाटिल, गण प्रमुख नारायण पाटिल, मा युवासेना जिल्हाप्रमुख सतीश नागरे यांनी मार्गदर्शन केले या वेळेस गटातील सर्व *पदाधिकारी ,शाखाप्रमुख, नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच ,ग्राम पंचायत सदस्य व शिवसैनिक हजार होते.

 #मुक्ताईनगरशिवसेना महिला आघाडीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या व मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतच्य...
05/09/2020

#मुक्ताईनगर
शिवसेना महिला आघाडीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या व मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
#शिवसेना परिवार मुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उच्चप्रतीची ऑक्सिजन प्रणाली यंत्रणेचे आमदारांच्या हस्ते लोकार्पणमुक्ताईनगर येथील उप...
11/08/2020

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उच्चप्रतीची ऑक्सिजन प्रणाली यंत्रणेचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण
मुक्ताईनगर
येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत 40 लक्ष रुपये खर्च करून आणलेल्या उच्च प्रतीच्या ऑक्सिजन प्रणाली यंत्रणेचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले असून सदर मशीन हे ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णाला 30 मीटर पेक्षा जास्त वेगाने प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजन पुरवठा करु शकत असल्यामुळे व्यक्तीला व्हेंटिलेटरची गरज राहणार नाही व त्याच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल अशी प्रणाली या हाय ऑक्सिजन सिस्टीम मध्ये असून त्याचे चार मशीन आणण्यात आल्याने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक सोयी असलेला जळगाव जिल्ह्यातील एकमेव ग्रामीण भागातील रुग्णालय बनलेले आहे
त्याच सोबत दोन मल्टी प्यारा, एक ईसीजी मशीन, 25 बेड ,बारा आईसीयू बेड, फॉगिंग मशीन, सेक़षन मशीन ,मास्क आणि सैनी टायझर एवढ्या मोठ्या यंत्रणा आज मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आल्या असून त्यांचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयुष्य विभागाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे सुद्धा लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून आयुष्य विभागाची सेवा रुग्णांसाठी खुली करण्यात आली आहे.
या प्रसंगी तालुका शिवसेनाप्रमुख छोटू भोई एडवोकेट मनोहर खैरणार प्रफुल्ल पाटील गटनेता राजेंद्र हिवराळे स्वीय सहायक प्रवीण चौधरी गणेश डांगे डॉक्टर योगेश राणे डॉक्टर स्वप्नील इम्रान खान डॉक्टर भारत भूषण डॉक्टर हेमंत जाधव प्रमोद भारंबे बाळा भालशंकर कमलेश जैन सुनील पाटील अफसर खान शुभम शर्मा गोपाळ सोनवणे वसंत भले संतोष माळी महेंद्र में डाले हे प्रमुख उपस्थित होते।.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा मुक्ताईनगर शिवसेनातर्फे कर्नाटक सर...
10/08/2020

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा मुक्ताईनगर शिवसेनातर्फे कर्नाटक सरकारचा मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवन्यात आला.यावेळी उपस्थित आ.चंद्रकांतभाऊ पाटील तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई, जिल्हानियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक राजेंद्र हिवराळे,अफसर खान, शहर प्रमुख गणेश टोंगे,सरपंच भास्कर पाटील,शहर संघटक वसंत भलंभले,गोपाळ सोनोवणे, स्विय सहायक प्रवीण चौधरी,संतोष कोळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनोवणे,तालुका प्रमुख पंकज राणे मितेशराजे पाटील युवासेना तालुका प्रसिद्धी प्रमुख,प्रसिद्धी प्रमुख राणा.सुमेरसिंग राजपूत,संतोष माळी,गणेश पाटील,गणेश पालवे व आदी शिवसैनिक उपस्थित होते

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक...****...
02/07/2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक...
***********************
बैठकीत मुक्ताईनगरात शहर रविवार , सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कडकडीत बंदसह जनता कर्फ्यु चा निर्णय ...
***********************
मुक्ताईनगर शहरात गुरुवारी दहा जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. शहरातील परिस्थितीचा आढावा घेत या संकटावर मात करणे करीता काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. प्रसंगी तहसिलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष नजमा तडवी, तालुका वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, गोपाळ सोनवणे, जाफर अली, शकील सर, राजेंद्र हिवराळे, दीपक पवार, वसंता भलभले, प्रफुल्ल पाटील, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी व संतोष कोळी, उपस्थित होते.

मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज दहा रुग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची तात्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यात वाढत असलेल्या रुग्णांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व काही निर्णय घेण्यात आले. शहरातील शीट फार्म एरिया पूर्णपणे सील करण्यात यावा.तसेच याठिकाणी असलेल्या दाट वस्तीतील प्रत्येक नागरिकांचा परिसरात सर्वे करून स्वॅब घेण्यात यावे, तसेच दोन दिवसानंतर रविवार ,सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कळकळीचा जनता कर्फ्यू म्हणून तीन दिवस गाव बंद ठेवावे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. अशी ही जनजागृती प्रत्येक नागरिकाने करावी, कोरोना सेंटर विषयी असलेल्या नागरिकांच्या तक्रारी ही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोविड सेंटर संबंधी समस्या जाणून घेतल्या. त्याप्रमाणे अत्याधुनिक आयसोलेशन कक्ष येत्या आठ दिवसात उभारणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आढावा बैठकीत सांगितले त्यात 50 बेडच्या वाढीव कक्षासह दहा बेडचा आयसोलेशन कक्ष तसेच या कक्षा करीता लागणारी अत्याधुनिक सामुग्री जसे व्हेंटीलेटर, डिजिटल एक्स-रे मशीन अशा सुविधा येत्या आठ दिवसात अत्याधुनिक साधनसामुग्री सह आयसीयु कक्ष उभारण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
जय महाराष्ट्र!..संतोष कोळी (आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय्य सहाय्यक)

बोदवड तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी घेतली तातडीची आढावा बैठक...बोदवड ...
02/07/2020

बोदवड तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी घेतली तातडीची आढावा बैठक...
बोदवड शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत., आज रोजी ८० च्या पुढचा आकडा कोरोना रुग्णांनी शहरासह तालुक्यात गाठला आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी आज बोदवड येथील शासकीय विश्रामगृहात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, शहरातील व्यापारी वर्ग, पोलिस प्रशासन, डॉक्टर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. सर्व जनतेने दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी नागरीकांना यावेळी केले. त्याप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे., व जो कोणी नियम पाळणार नाही किंवा प्रशासनाला सहकार्य न करता विनामास्क फिरतांना आढळून आल्यास किंवा व्यावसायिकांनीही प्रशासनाला सहकार्य न करता नियम न पाळल्यास अश्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी नगरपालिका व पोलिस प्रशासनाला यावेळी केल्या.
जय महाराष्ट्र!..संतोष कोळी (आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय सहाय्यक)

आज मुक्ताईनगर चे दमदार आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी आषाढी एकादशी चे निमित्ताने सहपरिवार प.पु.गुरुमाउलींचे आशीर्वा...
02/07/2020

आज मुक्ताईनगर चे दमदार आमदार श्री.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी आषाढी एकादशी चे निमित्ताने सहपरिवार प.पु.गुरुमाउलींचे आशीर्वाद घेऊन देशासह महाराष्ट्रावर आलेल्या कोंरोना सारख्या महामारीचे संकट दूर व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना केली..
🙏श्री स्वामी समर्थ 🙏

केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात मुक्तानगर तहसीलदार श्याम वाडेकर यांना महाविकास आघाडी तर्फे नि...
30/06/2020

केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात मुक्तानगर तहसीलदार श्याम वाडेकर यांना महाविकास आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना तालुका प्रमुख मुक्ताईनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category