महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ - राजे ग्रुप, महादेव गल्ली, घोसरवाड.

  • Home
  • India
  • Ichalkaranji
  • महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ - राजे ग्रुप, महादेव गल्ली, घोसरवाड.

महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ - राजे ग्रुप, महादेव गल्ली, घोसरवाड. Mahesh Arts, Sports & Cultural Academy, Ghosarwad. महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ, ( राजे ग्रुप, महादेव गल्ली ) घोसरवाड.

 #आभार👏🏻
21/01/2021

#आभार👏🏻

May you be blessed with the freedom of mind, thought and spirit! Happy Independence Day!
14/08/2018

May you be blessed with the freedom of mind, thought and spirit! Happy Independence Day!

28/04/2017

श्री छ. शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज...

या महान राजांनी समाज्याला नव्या दिश्या दिल्या.त्यांचा जन्म लाखो लोकांच्या कामी आला. अश्या या थोर व्यक्तींच्या जयंतीबद्दल त्यांना मानाचा मुजरा!!
_/\_

08/03/2017

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व माता भगिणीना शुभेच्छा !

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाटअभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाटलाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताटपणत्या...
28/10/2016

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.

शुभ दिपावली!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!

30/09/2016

कालच्या घटने बद्दल उन्माद नको आणि द्वेषही नको. दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धातली ती एक लढाई होती. हे युद्ध आता सुरु झालेलं आहे. संपलेलं नाही.. शत्रूचा इतिहास बघता तो कधीही समोरून हल्ला करत नाही. तो सामान्य माणसांवर हल्ला करून सूड उगवतो. पुढच्या काही दिवसात मुंबईत झाले ते पुन्हा कुठेही होऊ शकते. अश्यावेळी आपण कायम सतर्क राहुयात.

आता आपल्या पैकी प्रत्येकालाच थोडाफार सैनिक व्हायची गरज आहे. सतत सरकारवर टीका आणि पुढच्या सेकंदाला त्यांनी काही करण्याच्या अवास्तव अपेक्षा सोडून देऊयात.. प्रत्येक गोष्टीत भावनिक अतिरेक टाळायचा प्रयत्न करूयात.. सरकार उत्तम काम करायचा प्रयत्न करत आहे हे त्यांनी गेल्या दोन वर्षात सिद्ध केले आहे..त्यांचं काम त्यांना करू द्यात.आता देश म्हणून एकत्र राहून आपली जबाबदारी आपण पार पाडूयात.

Hind

13/09/2016

जिओ किंवा पतंजली विषयी आपण जागरूक झालो तेवढं कोलगेट पासुन गुडनाईट पर्यंत झालो का?

सात दिवसात गोरं बना, दिवाळीला कॅडबरी बॉक्स वाटा, भेटकार्ड हॉलमार्कचेच द्या, वाढदिवसानिमित्त केक कापा , थंडीगारठ्यात पण कोल्ड्रींक्स प्या अशा कित्येक मुर्खपणाच्या कृती आपण लहानपणापासून करत आलो आहोत ज्यांना काही अर्थ नाही कि आपल्याला फायदा नाही.

युग जाहिरातींच आहे हे मान्य केलं तर मग कालपर्यंत आपल्या भावनांशी विदेशी कंपन्या खेळत होत्या आज रामदेव बाबा त्याच गोष्टी वापरून विदेशी कंपन्यांशी खेळत आहे.

शेवटी ज्याच प्रॉडक्ट चांगले, स्वस्त , टिकाऊ आणि उपयोगी असेल तो टिकेल.

13/09/2016

देव्हाऱ्यातील गणपती रस्त्यावर, चौकात बसवून त्या भक्ती मार्गातुन समाजात एकोपा रहावा, बंधुत्व टिकाव आणि त्यातुन राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती करणारी तरुण पिढी निर्माण व्हावी या उदार हेतुने आरंभिलेला गणेशोत्सव आज पुन्हा इर्षेच्या, स्वार्थाच्या जाळ्यात अडकलाय.

परमेश्वर एकच पण माझा गणपती मोठा कि तुझा, माझा नवसाला पावतो तुझा नाही, आमचं मंडळ मोठं तुमची काय ४ जणांची भरती, आम्ही DJ च लावतो मिरवणुकीत आमचा नाद नाय करायचा, भयंकर आवाज ओकणारे ते स्पीकर आणि या सगळ्या क्लोळात आपला मूळ हेतु दूर लोटला गेला आहे.
राष्ट्रीयत्व, देशप्रेम शब्दांपुरत मर्यादित आहे.

गड्यांनो राष्ट्र म्हणुन जर आपल्याला टीकायचं असेल तर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे, वैयक्तिक गणपती घरात बसवून आपण आपल्या कुटुंबा करता शांती मागतो खरी पण राष्ट्र शांतीची प्रेरणा हि सार्वजनिक संघटनेतुनच निर्माण होईल यात तीळ मात्र शंका नाही.. !
जयतु हिंदुराष्ट्र.

सौजन्य - प्रविण कामठे.

26/07/2016

कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजयाची पताका फडकविणा-या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता, ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले, त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना, आपणदेखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे, ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे.
कारगील युद्धात शहिद झालेल्या सर्व वीरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
"शौर्या तुला वंदितो"
#राष्ट्रप्रथम

15/07/2016

सर्वांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा!!!

|| पुंडलिक वरदे हरि विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की.. जय ||

07/07/2016

आपण कृषी संस्कृतीपासून दूर जात आहोत...

अलीकडेच बेंदूर आला आणि गेला. बैलपोळ्याला आमच्याकडे बेंदूर म्हणतात. गावाशेजारी साखर कारखाना झाला. जिरायती शेतीत उसाची लागवड वाढली. कारखान्यानेच पुढाकार घेऊन पाणीपुरवठा योजना सुरू केली. त्यामुळे ज्या शेतीला पाणी मिळत नव्हतं त्या शेतीला पाणी मिळू लागलं. उसाला जिरायतीपेक्षा कष्ट कमी असतात. उसामुळे शेतकरी समाजाकडे एक रकमी पैसा आला. गावाचंही शहरीकरण होऊ लागलं. नवी पिढी वेगवेगळ्या नोकरी - व्यवसायात जाऊ लागली. शेतात काम करणारा शेतकरी वर्ग कमी कमी होत गेला. मूळ मालक हे बांधावरचे शेतकरी बनले. उसाबरोबर गावात राजकारणही घुसलं. पूर्वीचं गावाचं स्वरूप बदलत गेलं. नदीकाठी गाव असल्याने हे घडलं. नदीवर धरण झाल्यामुळे बारमहा पाणी मिळू लागलं. चाळीस वर्षांतील हा बदल आहे.

आपली भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. शेतीसाठी जनावरांची पूर्वी मोठी गरज भासत होती. त्या जागी यंत्रं आली. विजेमुळे मोठा बदल झाला. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी होती. मोठ्या शेतकऱ्याकडे आठ-आठ बैल असत. एक दिवस हा बैलाचा असायचा तो म्हणजे बेंदूर. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. हा सण बैलाचा होता. त्या दिवशी बैलाच्या खांद्यावर जू ठेवला जात नव्हता. त्याची पूजा केली जात होती. त्याला नैवेद्य दिलं जात होतं. वर्षभर शेतीत बैल काम करतो त्यामुळे आपण अन्न खातो ही जाणीव शेतकऱ्यांना होती. स्वतःच्या शेतीत जे पिकतं तेच तो खात होता. जादा जे होतं ते तो विकत होता. त्यातून त्याला फार काही पैसे मिळत नव्हते. पण, त्या वेळी पैशाला किंमत होती. बराच व्यवहार तो धान्य देऊनच करीत होता. त्याचं जीवन तुलनेने गरिबीचं असलं तरी समाधानी होतं. दरवर्षी बेंदुराला बैलांची मिरवणूक वाजतगाजत निघत होती. त्यात सगळं गाव सामील होत होतं. आता ही परिस्थिती राहिली नाही. जे काही थोडे हौसे शेतकरी आहेत ते आपल्यापुरती मिरवणूक काढतात.आता शेतकऱ्यांना बैल पाळणं परवडत नाही. बैलांसाठी एक माणूस लागतो. पूर्वी घरातील एक माणूस हे काम करीत होता.

आमच्याकडे कर तोडण्याची पद्धत होती. पाटलांचा बैल नसला तरी तो आपल्या भावकीतील बैल कर तोडण्यासाठी तयार ठेवीत असत. काही अंतरावर बेलाच्या फांद्या रचत असत. दोन्ही बैलं एकाच वेळी धावत असत. जो पहिल्यांदा बेलाच्या फांद्या ओलांडेल त्यानी कर तोडलं असं जाहीर करीत. त्या बैलांची मग मिरवणूकही काढत असत. ही प्रथा आमच्याकडे गाव वसल्यापासून चालू होती. ती आता पूर्णपणे बंदही झाली आहे. गावातील नवीन पिढीला याची कल्पनाही नाही. अलीकडच्या पिढीला यात आता रसही राहिला नाही. तशी आता गावातही परिस्थिती नाही. आपण आता कृषी संस्कृतीपासून दूर जात आहोत याची खंत राहिली नाही. पूर्वीपेक्षा प्रगती झाली आहे. आता कौलारू घरंही कमी झाली आहेत. कारण कौलं तयार करणारा कुंभार आता वेगळा कामधंदा करतो आहे. गावातील जो पारंपरिक कारागीर होता तो आता बेकार झाला आहे. काळाप्रमाणे त्यांनी मार्ग शोधला आहे. आता आपण आपल्या संस्कृतीला कृषी संस्कृती म्हणायचं का हा प्रश्न पडतो. आपण कृषी संस्कृतीपासून दूर जात आहोत...

21/04/2016

दख्खनचा राजा श्री जोतिबा चैत्र यात्रेच्या
सर्व भाविकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

|| जोतिबाच्या नावानं चांगभलं ||

Address

Next To Sidheshwar Temple, At Post/Ghosarwad, Tal/Shirol, Kolhapur
Ichalkaranji
416107

Telephone

9370101463

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ - राजे ग्रुप, महादेव गल्ली, घोसरवाड. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महेश कला, क्रीडा व सांस्कुतिक मंडळ - राजे ग्रुप, महादेव गल्ली, घोसरवाड.:

Shortcuts

Share

Category