कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 24-2025

  • Home
  • India
  • Ichalkaranji
  • कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 24-2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 24-2025 महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग व कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित.

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीयखो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू किशोर विभाग
31/03/2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय

खो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू किशोर विभाग

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीयखो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू महीला विभाग
31/03/2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय

खो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू महीला विभाग

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीयखो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष विभाग
31/03/2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय

खो-खो स्पर्धा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष विभाग

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीयखो-खो स्पर्धा किशोरी विभाग अंतिम सामना निकाल.
31/03/2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय

खो-खो स्पर्धा किशोरी विभाग अंतिम सामना निकाल.

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीयखो-खो स्पर्धा किशोर विभाग अंतिम सामना निकाल.
31/03/2025

कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय
खो-खो स्पर्धा किशोर विभाग अंतिम सामना निकाल.

विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महारा...
31/03/2025

विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री ना. श्री दत्तात्रय भरणे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, स्वागताध्यक्ष माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पुरुष गटात कोल्हापूर, महिला गटात धाराशिव, किशोर गटात कोल्हापूर आणि किशोरी गटात सांगली या संघांनी अजिंक्यपद पटविले. तर अनुक्रमे मुंबई उपनगर, पुणे, सांगली व पुणे हे संघ उपविजेते ठरले.

यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे, उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त सुषमा शिंदे, कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, सुनिल पाटील, शेखर शहा आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी 40 संघातील 800 हुन अधिक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्याचबरोबर पंचांना आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या वतीने स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यात आले.

*कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा २०२४-२५ मध्ये सहभागी झालेल्या ८०० हून अधिक खेळाडूंना आमदार डॉ. राहुल प्रक...
26/03/2025

*कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा २०२४-२५ मध्ये सहभागी झालेल्या ८०० हून अधिक खेळाडूंना आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या वतीने प्रोत्साहनपर स्मार्टवॉच प्रदान!*

राज्यस्तरीय खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा खेळ अधिक सुधारता यावा, या उद्देशाने *कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा २०२४-२५* मध्ये सहभागी झालेल्या *८०० हून अधिक खेळाडूंना स्मार्टवॉच वाटप* करण्यात आले. *आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या विशेष पुढाकाराने* आयोजित या उपक्रमात खेळाडूंना स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.

स्मार्टवॉच वाटप समारंभात प्रमुख मान्यवर, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि महिला प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत खेळाडूंना हे प्रेरणादायी पारितोषिक सुपूर्त करण्यात आले. या उपक्रमामुळे युवा खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्पर्धकांना मिळालेल्या या पाठबळामुळे, त्यांनी आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपल्या क्रीडाप्रतिभेचा ठसा उमटवावा, हीच सदिच्छा!

माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांनी कै. भाई नेरुळकर खो-खो स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी...
26/03/2025

माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांनी कै. भाई नेरुळकर खो-खो स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी, त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या नियोजित दौऱ्याचा आढावा घेतला आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपशीलवार पाहणी केली. तसेच, स्पर्धेच्या सुयोग्य नियोजनाबद्दल माननीय श्री प्रकाशआण्णा आवाडे व आमदार श्री राहुल आवाडे साहेब यांच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांनी कै. भाई नेरुळकर खो-खो स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी...
26/03/2025

माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांनी कै. भाई नेरुळकर खो-खो स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी, त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या नियोजित दौऱ्याचा आढावा घेतला आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपशीलवार पाहणी केली. तसेच, स्पर्धेच्या सुयोग्य नियोजनाबद्दल माननीय श्री प्रकाशआण्णा आवाडे व आमदार श्री राहुल आवाडे साहेब यांच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Address

Ichalkaranji
416115/17

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 24-2025 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category