08/01/2025
ब्रम्हरथोत्सव जत्रा
आत्मीय समाज बांधवांना आदरपूर्वक नमस्कार
अखिल भारतीय वैश्य समाजाचे आध्यात्मिक केंद्र असलेल्या हळदीपुर श्री गुरु मठामध्ये आपल्या सनातन संप्रदायाप्रमाणे दरवर्षी अनेक सण-उत्सव होतात. त्यात महारथोत्सव विशेष आहे. या क्रोधिनाम संवत्सराच्या उत्तरायणात, शिशिर ऋतुमध्ये माघ शुक्ल त्रयोदशी सोमवार दिनांक 10 फेब्रुवरी 2025 से माघ पौर्णिमा बुधवार दिनांक 12 फेब्रुवरी 2025 पर्यंत श्री गुरु मठामध्ये ब्रम्हरथोत्सव जत्रा संपन्न होणार आहे.
रथस्थां देवतां दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते
अर्थात् रथामध्ये विराजमान झालेल्या देवांचे दर्शन केले तर मोक्ष प्राप्ती होऊन पुनर्जन्म येणार नाही, अशी पूर्वजांची उक्ती आहे.
या महापर्वकाळी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण सहकुटुंब सहभागी होऊन श्री गुरु आणि श्री मठाच्या आराध्य देवतांच्या कृपाशिर्वादाला पात्र व्हावे ही
विनंती.
कार्यकारिणी समिती,
वैश्य गुरुमठ, हलदीपुर