17/12/2021
*भव्य राज्यस्तरिय स्पर्धा संपन्न*
हिंगोली येथील जीनियस स्पोर्ट्स अॅकॅडमी येथे कै. रमेशचंद्रजी जोशी व सुभाषचंद्रजी साबू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक अकरा व बारा डिसेंबर रोजी भव्य बॅडमिंटन डबल्स( पुरुष) स्पर्धा पार पडल्या. या आंतरराज्य स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला . या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते . मुख्य अतिथी म्हणून श्री विशाल राठोड साहेब, अजय कुरवाडे साहेब ,श्री अशोक अग्रवाल , श्री गोविंदजी चौधरी ,सुरेश आप्पा सराफ ,दिलीप जी जोशी , श्रीमती वसंताबाई साबू हे मान्यवर उपस्थित हाेते. या स्पर्धेमध्ये ओपन ग्रुपमधून पुण्याचे तेजस खोमणे व उमेश सारगे यांनी प्रथम पारितोषिक रु. २१०००/- व मानाचे चषक पटकावले तर द्वितीय पारितोषिक रु १५०००/- व मानाचे चषक हिंगोलीचे कार्तिक यादव व गणेश सपकाळ या संघास प्राप्त झाले व तृतीय पारितोषिक रु ११००० /- व मानाचे चषक अथर्व लाटे व प्रणव शिंदे पुने या संघाने मिळवले . वेटरंस +४० या ग्रुपमध्ये प्रथम पारितोषिक रु २१०००/- व मानाचे चषक जयेंद्र डोले व आशिष खेडीकर नागपूर या संघाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक रु १५०००/- व मानाचे चषक पंकज राठोड व अतुल बोरकर हिंगोली या संघास मिळाले व तृतीय पारितोषिक रु ११०००/- व मानाचे चषक सचिन चौधरी व रूपेश सोनी हिंगोली या संघाने मिळवले . पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री गणेश वाघ साहेब , विशाल राठोड , गोविंदजी चौधरी ,दिलीपजी जोशी ,अशोकजी अग्रवाल ,विनोद मुथा व बसंताबाई साबू उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ योगेश नलवार यांनी केले तर आभार श्री राजेंद्र साबू यांनी मानले . स्पर्धेच्या बक्षिसाचे आयोजक आसाराम घुगे (अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शन हिंगोली), आयुष विशाल राठोड ,श्री अशोक अग्रवाल , विवेक चिलमुल ,डॉ निता मनीष बगडिया, डॉ शीतल आमोल धुमाळ , अॅड. सुनील भुक्तर मित्र मंडळ हिंगोली व डुब्बेवार असोसिएट्स यांनी सहकार्य केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री रविराज दरक , डॉ श्रीधर कंदी, सूर्यकांत खाडे , सुनील राठोड, चंदन अग्रवाल, आनंद चांडक, अंकित राठोड , नवाज , अनिल शिंदे , अनिल घुगे , मुनिर मुंनिवाले, दीपक अग्रवाल , प्रदीप अग्रवाल , डॉ नितीन अग्रवाल, श्याम नेनवाणी, शैलेश तापडिया , सुरेश संचेती ,आनंद सारडा ,राजेश नेनवाणी ,दीपक नेनवाणी , पाटील सर, नेहा अलग , शिवानी लदनिया , रवी पाटील व सर्व खेळाडूनी अथक परिश्रम घेतले .