Mountaineers Association Dombivli

Mountaineers Association Dombivli Thinking of joining an Adventure club? Sure, Get yourself outside and active, get to learn new skills. Get good health and fitness. What are you waiting for?

Get to go on cool adventures and meet new, like-minded people. join up to our club now!

07/01/2026
*साहसी खेळांशी संबंधित सर्वांसाठी सुवर्णसंधी — तीही पूर्णतः विनामूल्य!**गिर्यारोहण व साहसी खेळांच्या क्षेत्रात उल्लेखनीय...
18/12/2025

*साहसी खेळांशी संबंधित सर्वांसाठी सुवर्णसंधी — तीही पूर्णतः विनामूल्य!*

*गिर्यारोहण व साहसी खेळांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या
महाराष्ट्रातील १२ कर्तृत्ववान नवदुर्गा मुलींना प्रत्यक्ष भेटण्याची अनोखी संधी

माउंटन स्पोर्ट्स अकादमी आणि
रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने
“१२ नवदुर्गा – डेस्कटॉप कॅलेंडर” प्रकाशित होत आहे.

आजच नोंदणी करा!
कार्यक्रम तपशील
दिनांक : शनिवार, २० डिसेंबर २०२५
वेळ : सायंकाळी ५.०० ते ९.००
स्थळ : डॉ. भानूबेन नानावटी कलागृह,
नंदादीप हायस्कूल, गोरेगाव (पूर्व), मुंबई

- अधिक माहितीसाठी संपर्क
९८९२०४२७०४ / ८६५५९९२७०४

आयोजक
माउंटन स्पोर्ट्स अकादमी
सह्याद्री मित्र संमेलन
रोटरी क्लब ऑफ कल्याण

Mountaineers Association Dombivli Adventure And Educational Camp26th Dec.25 to 28th Dec.25Contact 9833195830/9820775354
17/12/2025

Mountaineers Association Dombivli
Adventure And Educational Camp
26th Dec.25 to 28th Dec.25
Contact 9833195830/9820775354

International Mountain Day गुरुवार दिनांक : 11 डिसेंबर 2025स्थळ : स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक विद्यालय, साकडबाव स्वा...
11/12/2025

International Mountain Day
गुरुवार दिनांक : 11 डिसेंबर 2025
स्थळ : स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक विद्यालय, साकडबाव स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक विद्यालय साकडबाव येथे हा दिवस 11 डिसेंबर 2025 रोजी माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली या संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 अशी होती.
या कार्यक्रमास माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवलीचे प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते.
यामध्ये संस्थापक अध्यक्ष माननीय सतीशजी गायकवाड,(डॅडी)
संस्थेचे सचिव माननीय दिलीपजी भगत सर,
सदस्य श्री. भूषण दादा ठाकूर ,सौ. मनीषा झगडे मॅडम,
सौ.मंगला वझे मॅडम यांचा विशेष समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमास सुयोग्य अशी सुरुवात मिळाली. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश गायकवाड सरांनी, आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे महत्त्व, पर्वतांचे पर्यावरणीय योगदान तसेच मुलांमध्ये गिर्यारोहणाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी प्रेरणादायी माहिती अतिशय सुंदर शब्दांत मांडली. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना पर्वत, पर्यावरण आणि साहस क्रीडा याबद्दल नवीन दृष्टीकोन प्राप्त झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पडवळ मॅडम यांनी केले तर आभार श्री सुरोशी सर यांनी मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक—
श्री. दिनेश सुरोशी सर, श्रीमती कविता पडवळ मॅडम,
श्रीमती सुरेखा भोये मॅडम,श्रीमती दीपिका खारीक मॅडम
तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरण विषयक प्रभावी शब्द कार्यक्रमाने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि पर्वत संरक्षण, पर्यावरण संवर्धन याबद्दल विद्यार्थ्यां मध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

10/12/2025

सस्नेह नमस्कार,

११ डिसेंबर २०२५ हा 'जागतिक पर्वत दिन' मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आपणा सर्वांना आवाहन करीत आहोत.

राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी; शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी अशा सर्वांनी याप्रसंगी आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त पर्वत प्रेमींना सहभागी करून घ्यावे असे आवाहन महासंघातर्फे करण्यात येत आहे.

यानिमित्ताने पर्वतांचे महत्त्व, त्यांची आजची स्थिती, पर्वतांचे सवर्धन यांच्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याबाबतचा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहचेल अशी आशा आहे.
पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून हा दिवस उत्साहाने साजरा करूयात.

धन्यवाद,
उमेश झिरपे, अध्यक्ष
डॉ. राहुल वारंगे, सचिव
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

10/12/2025

अ. म. गि. म. अध्यक्ष श्री उमेश झिरपे यांचा महाराष्ट्र टाइम्स मधील लेख ७ डिसेंबर २०२५
Maharashtra Times, 7 December 2025

08/12/2025

Address

A201, Shreedhar Sudama SoC , RM 8, Sudama Nagar, MIDC Nivasi Vibhag, MIDC Dombivli East
Dombivli
421203

Telephone

+919833195830

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mountaineers Association Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mountaineers Association Dombivli:

Share