07/10/2022
महाराष्ट्राचे ३रे राज्यस्तरीय आईनबॉल प्रशिक्षण व निवड चाचणी शिबीर आर. सी. पटेल फार्मसी व एच. आर. पटेल फार्मसी, शिरपूर येथे उत्साहात संपन्न...
धुळे - आईनबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने महाराष्ट्राचे ३रे राज्यस्तरीय आईनबॉल प्रशिक्षण आणि बिहार येथे होणाऱ्या ४थ्या राष्ट्रीय आईनबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी शिबिर दिनांक ०१ ते ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी आर. सी. पटेल व एच. आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च, शिरपूर येथे उत्साहात पार पडले.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एस. बी. बारी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. नितीन हासवाणी, उपप्राचार्य डॉ. ए. ए. शिरखेडकर, आईनबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे सचिव श्री. चंद्रकांत भदाणे, राष्ट्रीय सल्लागार डॉ. आनंद पवार, राज्य सल्लागार डॉ. भालचंद्र मोरे, धुळे जिल्हा आईनबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम, उपाध्यक्ष प्रा. प्रणेता देसले, सचिव श्री. विश्वास पाटील, प्रा. भुपेंद्र मालपुरे, प्रा. विजय पाटील, श्री. संदीप शिंदे, श्री. गणेश काटकर, श्री. अकिल शेख, श्री. चंद्रशेखर मोरे, श्री. मोसीम शेख आणि श्री. जगदीश वाणी, डॉ. मनोज गिरासे, प्रा. सोपान कुंभार, फुटबॉल प्रशिक्षक श्री. अयाज अहमद, श्री. मोहम्मद शफिक, तलवारबाजी प्रशिक्षक सौ. निकिता पाटील, रजिस्टार श्री. जितेश जाधव, रजिस्टार श्री. संजय बागुल, प्रा. अमोल अहिरे, प्रा. योगेश ठाकूर, प्रा. निंबाजी राठोड, क्रीडा संचालक एस.ई.एस. यांच्या उपस्थितीत झाले.
प्रशिक्षण आणि निवड चाचणी शिबिरासाठी महाराष्ट्रातील ६५ खेळाडू उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मध्यप्रदेश राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. संतोष कुमार आणि श्री. रोहीत बर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. आईनबॉल खेळाबद्दल माहिती देऊन व प्रात्यक्षिक दाखवून निवड चाचणी केली. या शिबिरात निवड झालेला महाराष्ट्र राज्याचा आईनबॉल संघ बिहार येथे होणाऱ्या ४थ्या राष्ट्रीय आईनबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शिबीर संपन्नतेसाठी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंग गिरासे यांनी शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचे आयोजन धुळे जिल्हा आईनबॉल असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम, उपाध्यक्ष प्रा. प्रणेता देसले, सचिव श्री. विश्वास पाटील, प्रा. भुपेंद्र मालपुरे, प्रा. विजय पाटील, श्री. संदीप शिंदे, श्री. गणेश काटकर, श्री. अकिल शेख, श्री. चंद्रशेखर मोरे, श्री. मोसीम शेख आणि श्री. जगदीश वाणी यांनी केले.
प्रास्ताविक प्रा. अमोल अहिरे, सूत्रसंचालन प्रा. योगेश ठाकुर यांनी केले तर आभार प्रा. सोपान कुमार यांनी मानले.