03/06/2023
युनिक फिटनेस क्लबच्या सात स्पर्धेकांचा राज्य स्तरीयत स्पर्धेत डंका
शिवसेनेचे युवासेना महाराष्ट्र सहसचिव नंदुरबार जिल्हा विस्तारक . अँड पंकज भाऊ गोरे आणि बंटी भाऊ गोरे
*धुळे | प्रतिनिधी
शहरातील गल्ली नं. ६ मधील युनिक फिटनेस क्लबच्या सात मुलांनी मुंबई ( बदलापूर )येथे झालेल्या राज्य स्तरीय पॉवर लिफ्टिींग स्पर्धेत सुवर्ण व रजत आणि सिल्वर पदक मिळवित शहराचे नावलौकिक केले. खेळाडूंचा नुकताच क्बलतर्फे शिवसेनेचे . अँड पंकज भाऊ गोरे आणि बंटी भाऊ गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी युनिक फिटनेस क्लबचे मालक भुपेंद्र(सर) सुर्यवंशी, प्रशिक्षक स्वराज( सर ) गोयर आदी उपस्थित होते. धुळयातील युनिक फिटनेस क्लबचे सुशांत खेचे ऋषीकेश जाधव, ओम कदम वरद नेवे , अभय वाघ , तेजस कोलते, स्वराज गोयर(सर) ,हे पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. त्यात सुशांत खेचे याने 200 किलो डेड लिफ्ट चालून TiTLE घेतले ऋषीकेश जाधव याने डेड लिफ्ट प्रकारात १४० किलोमध्ये सुवर्णपदक आणि बेेंच प्रेसमध्ये ७० किलोमध्ये देखील सुवर्ण पदक पटकावले. विशेष म्हणजे ऋषीकेश हा दिव्यांग असून त्याने हे यश मिळविले. तर वरद जितेंद्र नेवे याने डेड लिफ्टमध्ये १४० किलोत सुवर्ण व बेंच प्रेसमध्ये ५० किलोत रजत पदक मिळविले. वरद हा अवघा १४ वर्षाचा युवक आहे. तेजस एकनाथ कोलते याने बेंच प्रेसमध्ये ९० किलोमध्ये सुवर्णपदक तर ओम कदम याने डेड लिफ्ट प्रकारात 130 किलो वजन उचलून सुवर्ण पदक व बेंच प्रेसमध्ये ६० किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. अभय वाघ याने 70 किलो बेंचप्रेस उचलून रजत पदक पटकावले स्वराज( सर ) गोयर याने 100 किलो बेंचप्रेस उचलू रजत पदक प्राप्त केले . काल त्यांचा युनिक फिटनेस क्लबतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना महाराष्ट्र सहसचिव नंदुरबार जिल्हा विस्तारक अँड पंकज भाऊ गोरे आणि बंटी भाऊ गोरे यांच्या हस्ते सात ही मुलांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रसंगी पंकज गोरे यांनी सात पोरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पॉवर लिफ्टर खेळाडूंना प्रशिक्षक स्वराज(सर) गोयर, भुपेंद्र(सर) सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले*
.20 .7111_ .96k