05/05/2026
व्हीसीए अर्थात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्यावतीने विदर्भातील सर्व जिल्हे आणि शहरांसाठी बॉलर्स की खोज म्हणजेच वेगवान तसेच फिरकी महिला-पुरुष गोलंदाजांकरिता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निवडचाचणी चंद्रपूर जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमात निवड झालेल्या गोलंदाजांना नागपूर येथे वरिष्ठ प्रशिक्षणांकडून विशेष प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षण फिटनेस यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर निवड चाचणीकरिता वयोमर्यादा पुरुषांकरिता 16 ते 25 तथा महिलांकरिता 15 ते 23 असून इच्छुक गोलंदाजांनी क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखात येणे आवश्यक असून सोबत जन्म दाखला आणि आधार कार्ड आणावे. सदर निवडचाचणी दिनांक ९/५/२०२६ ला ३:३० वाजता यूथ क्रिकेट अकॅडमीचा ग्राउंड रामनगर चंद्रपूर ला होणार आहे.
या संधीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पुरुष व महिला गोलंदाजांनी फायदा घ्यावा असे आव्हान विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा समितीचे चेअरमन नितेश उपाध्याय आणि चंद्रपूर जिल्हा संयोजक शैलेंद्र भोयर यांनी केली.